3 उत्तरे
3 answers

मला इतिहास संशोधक व्हायचे आहे, मी काय करू?

13
✅करीयर : इतिहास संशोधक व्हा✅


इतिहास आपल्याला खूप काही शिकवत असतो. भविष्यकाळाची आखणी इतिहासाच्या अभ्यासावर असते. इतिहास संशोधक व्हा. 

आधुनिक काळातही इतिहासाचं महत्त्व अबाधित आहे. कारण मानवाला आपल्या भूतकाळातील घटनांबाबत आकर्षण असतेच. अनेक वर्षांपूर्वीचा समाज, संस्कृती, चालीरीती, वास्तू, वस्तू याविषयी जाणून घेण्याच्या उत्सुकतेमुळे इतिहासाचं महत्त्व कायम राहणार आहे. त्यामुळे इतिहास संशोधन ही करियरची एक वेगळी वाट आहे. शिवाय या संशोधनाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी आहेत. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना संशोधन संस्था, संरक्षण दले, पर्यटन संस्था अशा ठिकाणीही उत्तम संधी मिळू शकतात.

हडप्पा- मोहेंजोदरोसारख्या लुप्त झालेल्या संस्कृतीचा शोध, जुने दस्तावेज, शिलालेख, नाणी, वास्तू, हस्तलिखितं आदींच्या आधारे तसंच कार्बन डेटिंगसारख्या आधुनिक तंत्राच्या साहाय्याने नामशेष झालेल्या संस्कृतीचा, समाजाचा अभ्यास पुरातत्त्व शास्त्रज्ञ किंवा इतिहास संशोधक लावतात. यासाठी प्रचंड शारीरिक मेहनतीची तयारी, चिकाटी, संशोधकवृत्ती, विपरित तापमानात काम करण्यासाठी तयारी या गुणांची आवश्यकता असते.

अभ्यासक्रम

इतिहास संशोधक किंवा आर्किओलॉजिस्ट होण्यासाठी इतिहास, ऍन्थोपोलॉजा या विषयात पदवी घेणं योग्य ठरतं. एम.ए. केल्यास उत्तम.

इतर कोर्सेस

इतिहास संशोधनाशी निगडीत इतरही काही शाखांची निवड आवडीनुसार करता येते.

मानववंशशास्त्र (ऍन्थ्रोपोलॉजी)

मानववंशशास्त्र हे मानवाचा उगम, विकास आणि संस्कृतीच तौलनिक अभ्यास करते. हे शास्त्र इतिहास, भूगोल, पुराणवस्तू, संशोधनशास्त्र, समाजशास्त्र, भाषाशास्त्र इत्यादींशी जोडलेले आहे. भरपूर वाचन, प्रभावी लेखन आणि संशोधनाची आवड असणाऱयांसाठी हे उत्तम क्षेत्र आहे. यात शिक्षण, संशोधन, सल्लागार अशा संधी प्राप्त होतात. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी बीएला हा विषय निवडता येतो. तसंच इतिहास, समाजशास्त्र, समाजसेवा, भूगोल, अर्थशास्त्र वा भाषा विषय घेऊन बीए केल्यावर पदव्युत्तर (एमए) शिक्षण घेता येते. आंतरराष्ट्रीय स्तरांवरील संशोधन क्षेत्रातही या विषयाच्या अभ्यासातून संधी प्राप्त होते.

अकार्यव्हिस्ट (दफ्तरपाल)

जुनी पुस्तकं, वर्तमानपत्रं, नकाशे, छायाचित्रं, फिल्म्स इत्यादी गोळा करून त्यांची नीट सूची बनवणं आणि संशोधकांना मार्गदर्शन हे दफ्तरपालचं काम असतं. सरकारी यंत्रणा, महामंडळं, शैक्षणिक संस्था, रुग्णालयं, वस्तूसंग्रहालयं, ग्रंथालयं, संशोधन संस्था, व्यक्ती व कुटुंबविषयक रेकॉर्ड्स जतन करण्याचं काम असतं.  

कॉन्झव्हेर्टर

पुरातन चित्रं, शस्त्रं, भांडी, वस्त्रं, फर्निचर, धातूच्या वस्तू इत्यादी ऐतिहासिक-सांस्कृतिक वारसा असणाऱया वस्तूंचं योग्य जतन होणं आवश्यक असते. वस्तूंचे मूळ रंग, रूप न बदलता ती दीर्घकाळ टिकावी या दृष्टीने प्रयत्न करणं, त्यासाठी आवश्यक ते दुरुस्ती काम करणं, नोंदी ठेवणं, प्रदूषणापासून दूर ठेवणं ही कामे कॉन्झव्हेर्टरला करावी लागतात.  

न्यूमिस्मॅटिक्स

पूवीच्या साम्राज्याचं-संस्कृतींचं वैशिष्टय़ म्हणजे विविध धातूंची आणि विशिष्ट कोरीव काम वा मुद्रा असणारी नाणी. या नाण्यांच्या अभ्यासावरून राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था, संस्कृतीचे आडाखे बांधता येतात.

म्युझिओलॉजी

यामध्ये वस्तुसंग्रहालयाचे संकलन, नोंदणी, संशोधन, रचना, माकार्ंटग, संरक्षण, व्यवस्थापन यांचा समावेश होतो. म्युझिओलॉजीच्या अभ्यासक्रमाला विज्ञानशाखेतील तसंच इतिहास, कला इतिहास, फाइन आर्ट वा आर्किओलॉजीचे पदवीधर प्रवेश घेऊ शकतात.

प्रशिक्षण आणि संस्था

डिप्लोमा इन अर्कायव्हल स्टडीज स्कूल ऑफ अर्कायव्हल स्टडीज, नवी दिल्ली, पात्रता – एमए (इतिहास),

कालावधी – 1 वर्ष

अर्कायव्हल ऍडमिनिस्ट्रेशन

कालावधी – 6 आठवडे

नॅशनल म्युझियम इन्स्टिटयूट ऑफ हिस्टरी ऑफ आर्ट, कॉन्झव्हेर्शन ऍण्ड म्युझिओलॉजी, नवी दिल्ली

या संस्थेत पदव्युत्तर तसेच डॉक्टरेट अभ्यासक्रम आहेत.

दिल्ली इन्स्टिटयूट ऑफ हेरिटेज रिसर्च अँड मॅनेजमेंट, दिल्ली

18-अ, सत्संग विहार मार्ग, कुतूब इन्स्टिटय़ुशनल एरिया, नवी दिल्ली- 110067.

पी जी डिप्लोमा इन म्युझिओलॉजी, एम ए (फाइन आर्ट) म्युझिओलॉजी, सटिर्फिकेट कोर्स इन म्युझिओलॉजी महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा
उत्तर लिहिले · 28/1/2019
कर्म · 569245
0
मला माफ करा, मी ते URL उघडू शकत नाही. मी फक्त तुमच्या इनपुटवर आधारित प्रतिसाद देऊ शकतो.
उत्तर लिहिले · 9/8/2018
कर्म · 5415
0

इतिहास संशोधक होण्यासाठी तुम्ही काय करू शकता यासाठी काही सूचना:

शिक्षण:
  • इतिहास विषयात पदवी (BA) मिळवा.
  • इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी (MA) मिळवा.
  • तुम्ही PhD देखील करू शकता, ज्यामुळे तुम्हाला उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात अधिक संधी मिळतील.
कौशल्ये:
  • संशोधन कौशल्ये: ऐतिहासिक कागदपत्रे, पुरावे आणि कलाकृतींचे विश्लेषण करण्याची क्षमता आवश्यक आहे.
  • विश्लेषणात्मक कौशल्ये: माहितीचे विश्लेषण करून निष्कर्ष काढण्याची क्षमता असावी.
  • लेखन कौशल्ये: संशोधन अहवाल, लेख आणि पुस्तके लिहिण्याची क्षमता असावी.
  • भाषा कौशल्ये: ऐतिहासिक कागदपत्रे वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी विविध भाषांचे ज्ञान आवश्यक आहे.
अनुभव:
  • संग्रहालये, अभिलेखागार आणि ऐतिहासिक स्थळांवर इंटर्नशिप करा.
  • संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी व्हा.
  • इतिहास परिषदांमध्ये आपले शोधनिबंध सादर करा.
नेटवर्किंग:
  • इतिहासकारांशी आणि इतर तज्ञांशी संपर्क साधा.
  • इतिहास संस्था आणि संघटनांचे सदस्य व्हा.
  • परिषदा आणि कार्यशाळांमध्ये भाग घ्या.
इतर महत्वाचे मुद्दे:
  • सखोल वाचन करा.
  • इतिहासाच्या विविध पैलूंचा अभ्यास करा.
  • नवीन संशोधन पद्धती शिका.
नोकरीच्या संधी:
  • प्राध्यापक
  • संग्रहालय क्युरेटर
  • अभिलेखपाल
  • इतिहास सल्लागार
  • लेखक/संपादक

टीप: इतिहास संशोधक होण्यासाठी कठोर परिश्रम, समर्पण आणि चिकाटी आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1080