शब्दाचा अर्थ
मराठी भाषा
मानसशास्त्र
म्हणी व वाक्यप्रचार
म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतोय, या म्हणीचा अर्थ काय आहे?
3 उत्तरे
3
answers
म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतोय, या म्हणीचा अर्थ काय आहे?
18
Answer link
म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो -
एखाद्या वाईट गोष्टीचा पायंडा पडु नये याची खबरदारी घेणे, जसे आपण आपले काम लवकर होण्यासाठी सरकारी कर्मचा-याला लाच देतो, पण नंतर तो प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मागायला लागतो म्हणुन एखादं काम झालं नाहीतरी चालेल पण लाच देण्याची सुरुवातच करु नका तसे... आपलं काम झालं नाही तरी (म्हातारी मेली तरी ) चालेल पण एखाद्याला पैसे घेण्याची सवय लागु नये ( काळ सोकावु नये )...

2
Answer link
एखादी व्यक्ती वार्धक्याने मरण पावली तरी दुःख होणे साहजिक असते. परंतु असे दुःख सग्या-सोयऱ्यांना होते तेव्हा जवळचे लोक सांत्वन करत समजावतात की वय झालं असल्याने मृत्यू होणे साहजिक आहे. मृत्यू हा अटळ आहे आणि वार्धक्याने झाला असल्याने फार दुःख करून उपयोग नाही. या म्हणीत काळ म्हणजे यम अर्थात मृत्यू आहे.
एखादी व्यक्ती वार्धक्याने मरण पावली तरी दुःख होणे साहजिक असते. परंतु असे दुःख सग्या-सोयऱ्यांना होते तेव्हा जवळचे लोक सांत्वन करत समजावतात की वय झालं असल्याने मृत्यू होणे साहजिक आहे. मृत्यू हा अटळ आहे आणि वार्धक्याने झाला असल्याने फार दुःख करून उपयोग नाही.
परंतु ज्यांच्या घरी हा मृत्यू झाला आहे ते लोकं ह्यावर असे उत्तर देत असत की
म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो
या म्हणीत काळ म्हणजे यम अर्थात मृत्यू आहे. सोकावतो म्हणजे त्याला चटक लागते. हा काळ अधिक लोकांचे जीव घेऊन जाणार ही भीती त्यामागे आहे. पूर्वीच्या काळात एक मृत्यू झाला की योगायोगाने लागोपाठ मृत्यू होत असत. कारणे काही असोत पण असे एकामागोमाग अनेक मृत्यू झाले तर काळ सोकावला असे म्हटले जाई.
या अर्थाने ही म्हण पडली आहे..
म्हणजे आमची म्हातारी वयोमानानुसार मृत पावली. आम्ही दुःख किंवा शोक करतो आहोत तो केवळ तिच्या मृत्युपुरता मर्यादित नाही. काळ अधिक लोकांना तर घेऊन जाणार नाही ना…? या भीतीचे दुःख अधिक आहे.
0
Answer link
म्हण: म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतोय.
अर्थ:एखाद्या गोष्टीचे नुकसान झाले तर त्याचे दु:ख नसते, पण भविष्यात असेच नुकसान होण्याची शक्यता वाटते, तेव्हा जास्त काळजी वाटते.
इंग्रजीमध्ये: It is not the death of the old woman that hurts, but the fear of what the future holds.