
म्हणी व वाक्यप्रचार
0
Answer link
'जशी कुडी तशी पुडी' या म्हणीचा अर्थ खालीलप्रमाणे आहे:
अर्थ:
ज्याप्रमाणे मनुष्याचे शरीर असते, त्याप्रमाणे त्याची प्रवृत्ती असते. ज्या व्यक्ती जशा असतात, त्यांना त्याच प्रकारच्या गोष्टींमध्ये रस असतो.
उदाहरण:
- एखाद्या शक्तिशाली माणसाला ताकदवान कामे करायला आवडतात, तर कमजोर माणसाला सोपी कामे आवडतात, यालाच म्हणतात 'जशी कुडी तशी पुडी'.
1
Answer link
भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा अडचणीच्या वेळी कोणत्याही साधनाने गरज भागविण्याची माणसाची तयारी असते.
'भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा' अशी एक मराठीत म्हण आहे पण ती आता मोडीत निघाल्यागतच आहे.पोटात भुकेचा आगडोंब उसळला कि काहीही अन्न गोड लागते हि झाली भूत काळातील गोष्ट
आज माणसाला भूक लागते तिचे हि वेगवेगळे प्रकार असतात .खायच्या अनंत प्रकारात जेवढी विविधता तेवढीच माणसाच्या भूकेतही आहे
दोन वेळा घरी जेवताना भात भाजी आमटी पोळी कोशिंबीर वगैरे असतेच पण त्याने पोट भरल्यानंतर हि संध्याकाळी दूरदर्शनच्या पडद्यासमोर बसून मालिका पहाताना हे पदार्थ नाही चालणार तेव्हा कुरकुरे शेव फरसाण वेफर्स बिस्किटे ह्याचेच बोकाणे भरावे लागतात
बाजारात खुपसे shopping झाले कि श्रमपरीहारार्थ भेल पाणीपुरी फारतर रगडा patis यांनी भूक भागवावी लागते शेवटी सुक्की पुरी खाल्याशिवाय समारोप नाही होत
.सुट्टीच्या दिवशी चमचमीत चिकनची भूक लागली कि घासफूस नाही चालत
जेव्हा मनापासून diet सांभाळायचे असते तेव्हा फक्त सलाड्स ची भूक लागते
उपवासाच्या दिवशीउपास नसला तरी जेवणानंतर हि साबुदाण्याची खिचडी वडे थालीपीठ याची जबरदस्त भूक लागते
कधी माणसाला थंडगार आईस क्रीम ची भूक लागते तर कधी टणटण घंटी वाजवीत येणाऱ्या बर्फाच्या गाडीवरचा गोळा खुणावीत असतो
भर बाजारात सौसेस चा खमंग वास दरवळला कि भरल्या पोटी देखील गाडीवरील चायनीज भेळेची भूक लागते
हॉटेल मध्ये जावून आपण मारे मसाला डोसा मागवितो पण शेजार्याच्या टेबलावरील पावभाजीचा खमंग वास पावभाजीची order देण्यास भाग पडतो
सिह्गडावर गेल्यावर कांदाभजी, ताक, किवा झुणका भाकरच हवी
पावसाळ्यातकोणत्याही वेळ धुवाधार पावसात गरमागरम कांदाभजी आणि चहा हवाच
अडनिड्या वेळच्या भुकेला दोन मिनिटात होणारी magiच हवी असते
ह्या सार्या भुकांचे वैशिष्ट्य असे कि ह्या भरल्यापोटी लागणाऱ्या भुका असतात
पोटाला busy ठेवणे हा सर्वात महत्वाचा उद्योग ठरला आहे
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म हि संकल्पना आता नाही तर हा एक सुंदरसा time pass झालेला आहे
1
Answer link
गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली – एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच नाहीतर तिचा दुसरा काहीतरी उपयोग करून घेणे.
0
Answer link
आसमान से गिरा खजूर में अटका एक प्रचलित हिन्दी मुहावरा-लोकोक्ति आहे. ज्याचा अर्थ आहे - एका अडचणीतून बाहेर पडून दुसर्या अडचणीत अडकणे.
2
Answer link
पहिले राजा म्हणून जन्माला आलेले असतात.
नंतर फक्त काही एक न करता मौज मजा करीत राहतात. त्यात भरीस मग बाई ,बाटली व इतर व्यसनांनच्या आहारी जातात.
बस्स एवढंच भिकारी व्हायला कारणीभूत होते.
नंतर फक्त काही एक न करता मौज मजा करीत राहतात. त्यात भरीस मग बाई ,बाटली व इतर व्यसनांनच्या आहारी जातात.
बस्स एवढंच भिकारी व्हायला कारणीभूत होते.
18
Answer link
म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो -
एखाद्या वाईट गोष्टीचा पायंडा पडु नये याची खबरदारी घेणे, जसे आपण आपले काम लवकर होण्यासाठी सरकारी कर्मचा-याला लाच देतो, पण नंतर तो प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मागायला लागतो म्हणुन एखादं काम झालं नाहीतरी चालेल पण लाच देण्याची सुरुवातच करु नका तसे... आपलं काम झालं नाही तरी (म्हातारी मेली तरी ) चालेल पण एखाद्याला पैसे घेण्याची सवय लागु नये ( काळ सोकावु नये )...
एखाद्या वाईट गोष्टीचा पायंडा पडु नये याची खबरदारी घेणे, जसे आपण आपले काम लवकर होण्यासाठी सरकारी कर्मचा-याला लाच देतो, पण नंतर तो प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मागायला लागतो म्हणुन एखादं काम झालं नाहीतरी चालेल पण लाच देण्याची सुरुवातच करु नका तसे... आपलं काम झालं नाही तरी (म्हातारी मेली तरी ) चालेल पण एखाद्याला पैसे घेण्याची सवय लागु नये ( काळ सोकावु नये )...