2 उत्तरे
2
answers
भुकेला कोंडा निजेला धोंडा या म्हणीचा अर्थ कोणता आहे?
1
Answer link
भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा अडचणीच्या वेळी कोणत्याही साधनाने गरज भागविण्याची माणसाची तयारी असते.
'भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा' अशी एक मराठीत म्हण आहे पण ती आता मोडीत निघाल्यागतच आहे.पोटात भुकेचा आगडोंब उसळला कि काहीही अन्न गोड लागते हि झाली भूत काळातील गोष्ट
आज माणसाला भूक लागते तिचे हि वेगवेगळे प्रकार असतात .खायच्या अनंत प्रकारात जेवढी विविधता तेवढीच माणसाच्या भूकेतही आहे
दोन वेळा घरी जेवताना भात भाजी आमटी पोळी कोशिंबीर वगैरे असतेच पण त्याने पोट भरल्यानंतर हि संध्याकाळी दूरदर्शनच्या पडद्यासमोर बसून मालिका पहाताना हे पदार्थ नाही चालणार तेव्हा कुरकुरे शेव फरसाण वेफर्स बिस्किटे ह्याचेच बोकाणे भरावे लागतात
बाजारात खुपसे shopping झाले कि श्रमपरीहारार्थ भेल पाणीपुरी फारतर रगडा patis यांनी भूक भागवावी लागते शेवटी सुक्की पुरी खाल्याशिवाय समारोप नाही होत
.सुट्टीच्या दिवशी चमचमीत चिकनची भूक लागली कि घासफूस नाही चालत
जेव्हा मनापासून diet सांभाळायचे असते तेव्हा फक्त सलाड्स ची भूक लागते
उपवासाच्या दिवशीउपास नसला तरी जेवणानंतर हि साबुदाण्याची खिचडी वडे थालीपीठ याची जबरदस्त भूक लागते
कधी माणसाला थंडगार आईस क्रीम ची भूक लागते तर कधी टणटण घंटी वाजवीत येणाऱ्या बर्फाच्या गाडीवरचा गोळा खुणावीत असतो
भर बाजारात सौसेस चा खमंग वास दरवळला कि भरल्या पोटी देखील गाडीवरील चायनीज भेळेची भूक लागते
हॉटेल मध्ये जावून आपण मारे मसाला डोसा मागवितो पण शेजार्याच्या टेबलावरील पावभाजीचा खमंग वास पावभाजीची order देण्यास भाग पडतो
सिह्गडावर गेल्यावर कांदाभजी, ताक, किवा झुणका भाकरच हवी
पावसाळ्यातकोणत्याही वेळ धुवाधार पावसात गरमागरम कांदाभजी आणि चहा हवाच
अडनिड्या वेळच्या भुकेला दोन मिनिटात होणारी magiच हवी असते
ह्या सार्या भुकांचे वैशिष्ट्य असे कि ह्या भरल्यापोटी लागणाऱ्या भुका असतात
पोटाला busy ठेवणे हा सर्वात महत्वाचा उद्योग ठरला आहे
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म हि संकल्पना आता नाही तर हा एक सुंदरसा time pass झालेला आहे
0
Answer link
अर्थ:
- भुकेलेल्या माणसाला झोप येत नाही आणि झोपलेल्या माणसाला भूक लागत नाही, म्हणजेच एकाला गरज असते तर दुसर्याला नसते.
- ज्या माणसाला भूक लागली आहे, तो शांतपणे झोपू शकत नाही आणि ज्या माणसाने खूप खाल्ले आहे, त्याला झोप येऊ शकत नाही.
इंग्रजीमध्ये:
- A hungry belly has no ears.
- Hunger is the best sauce.