राजकारण पुणे महानगरपालिका स्थानिक राजकारण

नगरपालिका निवडणुकी विषयी माहिती?

2 उत्तरे
2 answers

नगरपालिका निवडणुकी विषयी माहिती?

4
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र

 (022) 22846720, 22886950, 22045075
 (022) 22846721
sec.mh@gov.in

Toggle navigation

स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था अधिनियम व निवडणूक नियम

1. स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था अधिनियम व नियमातील तरतूद

प्रश्‍न 1 महाराष्ट्रामध्ये नगरपरिषद अथवा नगरपंचायतीचे कामकाज कोणत्‍या अधिनियमानुसार चालते ?

उत्तर महाराष्ट्रामध्ये नगरपरिषद / नगरपंचायतीचे कामकाज हे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मधील तरतूदीनुसार चालते.

प्रश्‍न 2 नगरपरिषद अथवा नगरपंचायत यांच्या निवडणुका कोणत्या कायद्यानुसार व नियमानुसार पार पाडल्या जातात ?

उत्तर नगरपरिषदा / नगरपंचायतीच्या निवडणुका या महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 आणि त्याअंतर्गत महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम 1966 मधील तरतूदीनुसार पार पाडल्या जातात.

प्रश्न 3 नगरपरिषद अथवा नगरपंचायतीचे लोकसंख्येनुसार वर्गीकरण कसे केले आहे ?

उत्तर महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मधील कलम 4 नुसार पुढीलप्रमाणे वर्गीकरण करणेत आले आहे.
1 लक्ष पेक्षा जास्त लोकसंख्या - अ वर्ग लहान नागरी क्षेत्र
40 - 60 हजार लोकसंख्या - ब वर्ग लहान नागरी क्षेत्र
40 हजार पेक्षा कमी लोकसंख्या - क वर्ग

प्रश्‍न 4 नगरपरिषद अथवा नगरपंचायत सदस्‍यांची संख्‍या किती असते ?

उत्तर नगरपरिषदेच्या सदस्यांची संख्या लोकसंख्येशी संबंधित असते. वर्गनिहाय किमान व कमाल सदस्य संख्या खालीलप्रमाणे असते :-वर्गकिमानकमाल संख्याअ3865ब2337क1723नगर पंचायत 17

प्रश्‍न 5 नगरपरिषद अथवा नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदारयादी तयार करण्‍यासाठी अधिक्षण, संचालन व नियंत्रणाचे काम कोण पाहते ?

उत्तर नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मतदारयादी तयार करण्याचे संपूर्ण कामकाज जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली " प्राधिकृत " अधिकारी करीत असतात.

प्रश्‍न 6 नगरपंचायतीची सदस्‍य संख्‍या किती असते ?

उत्तर नगरपंचायतीमध्ये जास्तीत जास्त 17 सदस्य असतात.

प्रश्‍न 7 नगरपरिषद अथवा नगरपंचायतीची प्रभागामध्ये विभागणी कोण करते ?

उत्तर नगरपरिषदेचा वर्ग विचारात घेऊन शहराची विभागणी करण्याचे अंतिम अधिकार खालीलप्रमाणे.अवर्ग नगरपरिषदाराज्य निवडणूक आयोगबवर्ग नगरपरिषदाआयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासनकवर्गविभागीय आयुक्त नगर पंचायतीविभागीय आयुक्त

2. स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेचा कालावधी

प्रश्‍न 1 नगरपरिषद अथवा नगरपंचायतीचा कालावधी किती वर्षाचा असतो ? हा कालावधी केव्हापासून गणला जातो ?

उत्तर नगरपरिषदेचा कालावधी पाच वर्षांचा असतो. हा कालावधी नवीन निवडून आलेल्या सदस्यांच्या पहिल्या सभेपासून सुरुवात होतो.
(संदर्भ-महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 40 (1))

प्रश्‍न 2 विसर्जित / बरखास्‍त, विघटीत अथवा बरखास्तीनंतर त्यांचा कालावधी किती वर्षांचा असतो ?

उत्तर बरखास्तीनंतर बरखास्तपूर्व कालावधीचा विचार करून उर्वरीत कालावधी इतका असतो.
(संदर्भ-महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 40 (2))

3. सदस्‍यांचा पदावधी, राजीनामा व पोट निवडणूक

प्रश्‍न 1 निवडून आलेल्‍या सदस्‍यांचा सर्वसाधारण पदावधी किती वर्षाचा असतो ?

उत्तर निवडून आलेल्‍या नगरपरिषद अथवा नगरपंचायत सदस्‍यांचा सर्वसाधारण कालावधी 5 वर्षांचा असतो. परंतू, पालिका सदस्यांचा पदावधी हा पालिकेच्या मुदतीबरोबरच समाप्त होतो.
(संदर्भ-महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 41(1))

प्रश्‍न 2 जागा रिक्‍त झाल्‍यामुळे अथवा अन्‍य कारणांमुळे पोट निवडणूक झाल्‍यास निवडून आलेल्‍या सदस्‍याचा कालावधी किती असतो ?

उत्तर पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांचा कालावधी इतर सदस्यांच्या कालावधी इतकाच असतो.

प्रश्‍न 3 नगरपरिषद अथवा नगरपंचायतीमध्‍ये निवडून आलेल्‍या सदस्‍यांच्‍या कालावधीची सुरुवात केव्‍हापासून होते ?

उत्तर निवडून आलेल्‍या सदस्‍यांच्‍या कालावधीची सुरुवात पहिल्या सभेच्या दिनांकापासून होते.

प्रश्‍न 4 नगरपरिषद अथवा नगरपंचायतीमध्‍ये एकापेक्षा जास्‍त जागांवर निवडून आलेल्‍या सदस्‍याने काय करणे आवश्‍यक आहे ?

उत्तर एखादी व्यक्ती एकापेक्षा अधिक प्रभागामध्ये निवडून आली असेल तर, तिने निकाल प्रसिध्द करण्यात आल्याच्या तारखेपासून 7 दिवसांच्या मुदतीमध्ये स्वताच्या सहीची लेखी नोटीस जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाधीन करून, ज्या प्रभागात काम करण्याची इच्छा असेल त्या प्रभागाची निवड केली पाहिजे आणि अशी निवड अंतिम असेल.
(संदर्भ-महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 19 (2))

प्रश्‍न 5 एकापेक्षा जास्‍त जागांवर निवडून आलेल्‍या सदस्‍याने एक सोडून इतर जागांचा राजीनामा विहित केलेल्‍या अवधीमध्ये न दिल्‍यास काय परिणाम होतील ?

उत्तर एकापेक्षा जास्त प्रभागांवर निवडून आलेल्या सदस्याने एका प्रभागाची पसंती नियमानूसार दिलेल्या मुदतीमध्ये जिल्हाधिकारी यांना कळविली नाही तर,जिल्हाधिकारी अशा प्रभागांपैकी ज्या प्रभागामध्ये अशा सदस्याने काम करावे तो चिठठया टाकून ठरविला पाहिजे आणि जिल्हाधिकारी यांचा निर्णय अंतिम असेल. तसेच उर्वरित प्रभागामध्ये नवीन निवडणूका घेण्याबद्दल राज्य निवडणूक आयोगास अहवाल सादर करतील. (संदर्भ-महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 19 (4))

प्रश्‍न 6 एकापेक्षा जास्‍त जागांवर निवडून आल्‍यास एक सोडून इतर जागांचा राजीनामा देण्‍यासाठी विहित मुदत किती दिवस आहे ?

उत्तर अशा व्यक्तीने निकाल प्रसिध्द करण्यात आल्याच्या तारखेपासून 7 दिवसांच्या मुदतीमध्ये स्वत:च्या सहीची लेखी नोटीस जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाधीन केली पाहिजे.
(संदर्भ-महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 19(2))

प्रश्‍न 7 राजीनामा द्यावयाचा झाल्यास तो कोणाकडे द्यावा लागतो ?

उत्तर अशा व्यक्तीने निकाल प्रसिध्द करण्यात आल्याच्या तारखेपासून 7 दिवसांच्या मुदतीमध्ये स्वताच्या सहीची लेखी नोटीस जिल्हाधिकाऱ्यांकडे समक्ष स्वाधीन केली पाहिजे.
(संदर्भ-महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 19 (2))

प्रश्‍न 8 सदर राजीनामा केव्हापासून अंमलात येतो ?

उत्तर राजीनामा दिल्यापासून तात्काळ अंमलात येतो.

प्रश्‍न 9 पद रिक्त झाल्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला केव्हा कळवावे लागते ?

उत्तर पद रिक्त झाल्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला 15 दिवसांच्या आत मुख्याधिकारी यांनी कळविणे आवश्यक आहे.
(संदर्भ-महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 48 (2))

प्रश्‍न 10 पद रिक्त झाल्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला कळविण्याची जबाबदारी कोणावर असते ?

उत्तर पद रिक्त झाल्याबाबत कळविण्याची प्राथमिक जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सचिवाची म्हणजेच नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांची आहे.
(संदर्भ-महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 48(2))

प्रश्‍न 11 एखादा नगरपरिषद अथवा नगरपंचायतीचा सदस्य विधिमंडळाचा अथवा संसदेचा सदस्य म्हणून निवडून आल्यास त्याला नगरपरिषद अथवा नगरपंचायतीचे सदस्यत्व कायम ठेवता येते का ?

उत्तर संबंधित नगरपरिषद अथवा नगरपंचायतीच्या सदस्यास त्याचा नगरपरिषद सदस्यपदाचा कालावधी संपेपर्यत त्यास नगरपरिषद अथवा नगरपंचायतीचे सदस्यत्व कायम ठेवता येते.
(संदर्भ-महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 16(1)(l))

4. निवडणुकीसाठी मतदारयादी तयार करणे व अधिप्रमाणित करणे

प्रश्‍न 1 नगरपरिषद अथवा नगरपंचायत निवडणुकीकरिता कोणती मतदारयादी वापरली जाते ?

उत्तर नगरपालिका / नगरपंचायत निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयुक्त जी तारीख अधिसूचित करतील त्या तारखेस अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदारयादी वापरण्यात येते.
(संदर्भ-महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 15(1))

प्रश्‍न 2 मतदारयादी तयार करण्‍याच्‍या कामाचे सनियंत्रण कोण करते ?

उत्तर विधानसभेची यादी प्राप्त झाल्यानंतर शहरासाठी मतदारयादी तयार करण्याच्या कामाचे सनियंत्रण प्राधिकृत अधिकारी तथा मुख्याधिकारी करतात.

प्रश्‍न 3 कैदेची शिक्षा किंवा कारागृहात बंदिस्‍त किंवा पोलिसांच्या कायदेशीर ताब्‍यात असणारा व्यक्ती मतदान करु शकेल काय ?

उत्तर मतदानासाठी प्रत्यक्ष मतदान केंद्रामध्ये उपस्थित असणे आवश्यक आहे. प्रतिनिधीद्वारा मतदान करता येत नाही.
(संदर्भ-महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 13)

प्रश्‍न 4 मतदारयादी अधिप्रमाणित करण्याबाबत काय तरतूद आहे ?

उत्तर प्रभागनिहाय विभागणी केलेली मतदारयादी राज्य निवडणूक आयोग निर्देशित करेल त्या तारखेला " प्राधिकृत अधिकारी तथा मुख्याधिकारी " यांनी अधिप्रमाणित करण्याची तरतूद आहे.

5. निवडणुकीत मत देण्‍याचा अधिकार व मतदानाची पध्‍दत

प्रश्‍न 1 नगरपरिषद अथवा नगरपंचायत निवडणुकीमध्‍ये मत देण्‍याचा अधिकार कोणाला आहे ?

उत्तर महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 11 अन्वये ठेवलेल्या मतदारांच्या यादीमध्ये नाव असलेल्या प्रत्येक मतदारास मत देण्‍याचा अधिकार आहे.
(संदर्भ-महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 12(1))

प्रश्‍न 2 मतदानास पात्र होण्‍यासाठी व्‍यक्‍तीचे वय किती असावे लागते ?

उत्तर वय वर्षे 18 पूर्ण असणे आवश्यक आहे.
(संदर्भ- लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 चे कलम 19 (a))

प्रश्‍न 3 एखाद्या व्यक्तीचे एकापेक्षा जास्त वेळा एकाच प्रभागातील मतदारयादीत नाव असल्यास त्याला एकापेक्षा जास्त वेळा मतदान करता येईल का ?

उत्तर नाही.
(संदर्भ- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 14(1))

प्रश्न 4 एकापेक्षा जास्तवेळा मतदान केल्यास काय परिणाम होईल ?

उत्तर एकापेक्षा जास्तवेळा मतदान केल्यास संबंधित मतदाराची एक किंवा अनेक प्रभागामधील सर्व मते रद्द ठरतील आणि तिच्याविरूध्द गुन्हा दाखल होवू शकेल.
(संदर्भ- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 14 )

प्रश्न 5 एकापेक्षा जास्त प्रभागामधील मतदारयादीमध्ये नाव असलेली व्यक्ती एकापेक्षा जास्त प्रभागामध्ये मतदान करू शकेल काय ?

उत्तर नाही. (संदर्भ- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 14(2))

प्रश्‍न 6 निवडणुकीमध्ये मतदान करण्याची काय पध्दत असते ?

उत्तर एक सदस्य पध्दतीमध्ये एक मत देता येते. मतदान गुप्त पद्धतीने सर्वसाधारणपणे मतदान यंत्राद्वारे (EVM द्वारे) घेण्यात येते. प्रतिनिधीद्वारे (By Proxy) मतदान करता येत नाही.
(संदर्भ- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 13)

6. सदस्‍य म्‍हणून निवडून येण्‍यासाठी अर्हता

प्रश्‍न 1 सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी काय पात्रता असावी लागते ?

उत्तर अंतिम मतदारयादीमध्ये मतदार म्हणून नोंद असलेल्या व 21 वर्षे वय पूर्ण झालेल्या मतदारास सदस्य होता येते. इतर कोणत्याही कायद्याद्वारे अपात्र न ठरवलेली व्यक्ती सदस्य होण्यास पात्र असते.
(संदर्भ-महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 15(1))

प्रश्‍न 2 सदस्‍य म्‍हणून निवडणूक लढविण्यासाठी वयोमर्यादा किती असणे आवश्‍यक आहे ?

उत्तर सदस्‍य म्‍हणून निवडणूक लढविण्यासाठी नामानिर्देशनपत्र सादर करण्याकरिता निश्चित करण्यात आलेल्या अंतिम दिनांकाला 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
(संदर्भ-महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 15(1))

प्रश्‍न 3 सदस्‍य म्‍हणून निवडणूक लढविण्‍यासाठी त्या नगरपरिषद अथवा नगरपंचायतीच्या मतदार यादीत नाव असणे आवश्‍यक आहे काय ?

उत्तर होय.
(संदर्भ-महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 15(1))

7. सदस्‍य होण्‍यास अनर्हता (अपात्रता )

प्रश्‍न 1 राज्‍य निवडणूक आयोगाने निरर्ह (अपात्र) ठरविलेली व्‍य‍क्‍ती निवडणूक लढविण्‍यास पात्र आहे काय ?

उत्तर नाही. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूकीच्या खर्चाच्या संदर्भात निरर्ह (अपात्र) ठरविलेली व्यक्ती आयोगाच्या आदेशापासून आदेशामध्ये नमूद केलेल्या कालावधीपर्यंत निवडणूक लढविण्यास पात्र ठरत नाही.
(संदर्भ-महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 16 (1-D))

प्रश्‍न 2 नगरपरिषद अथवा नगरपंचायत सदस्य होण्यासाठी कोणत्या कायदयाखाली अपात्रता नमुद करण्यात आली आहे ?

उत्तर नगरपालिका / नगरपंचायत सदस्य होण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 16 मध्ये अपात्रता / अनर्हता नमूद करण्यात आली आहे.

प्रश्‍न 3 निवडणूक लढविण्‍यासाठी अथवा सदस्‍य म्‍हणून राहण्‍यास निरर्हतेचा (अपात्रतेचा) कालावधी किती?

उत्तर वेगवेगळ्या प्रकरणी तीन, पाच किंवा सहा वर्षापर्यंत असू शकतो.

प्रश्‍न 4 भारत निवडणूक आयोगाने निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविलेली व्यक्ती नगरपरिषद अथवा नगरपंचायतीची निवडणूक लढवू शकते काय ?

उत्तर नाही.

प्रश्‍न 5 निरर्ह (अपात्र) ठरविलेल्या व्यक्तींची यादी कोठे पाहता येईल ?

उत्तर निरर्ह (अपात्र) ठरविलेल्या व्यक्तींची यादी संबंधित जिल्हाधिकारी आणि नगरपरिषद अथवा नगरपंचायत यांचे कार्यालयामध्ये पाहता येईल.

प्रश्‍न 6 निरर्हता (अपात्रता) दूर करण्‍याचा अथवा निरर्हतेचा (अपात्रतेचा) कालावधी कमी करण्‍याचा अधिकार कोणाला आहे ?

उत्तर निवडणूकीमधील खर्चाच्या मुद्दयावरून अपात्र किंवा निरर्ह ठरविण्यात आल्यानंतर अपात्रता किंवा निरर्हता दूर किंवा कालावधी कमी करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगास आहे. (संदर्भ-महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 16 (1)(1-E))

8. सदस्‍य म्‍हणून पदावर राहण्‍यास असमर्थता (अपात्रता)

प्रश्‍न 1 नगरपरिषद अथवा नगरपंचायत सदस्‍यांच्‍या बाबतीतील कायदेशीर निरर्हता (अपात्रता) कोणती आहे ?

उत्तर नगरपरिषद अथवा नगरपंचायत सदस्‍यांच्‍या बाबतीतील कायदेशीर निरर्हता (अपात्रता) ही महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 16 मध्ये नमूद केल्यानुसार आहे.

प्रश्‍न 2 निरक्षरता हे निरर्हतेचे (अपात्रतेचे) कारण होऊ शकेल काय ?

उत्तर नाही.

9. अनर्हता / सदस्‍य पदावरुन काढून टाकणे

प्रश्‍न 1 नगरपरिषद अथवा नगरपंचायत सदस्‍यांना पदावरुन काढून टाकणे किंवा अनर्ह ठरविण्यासंदर्भात काय नियम आहेत ?

उत्तर महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 42, 44 व 55 (B) तसेच महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम 1986 मध्ये नगरपरिषद अथवा नगरपंचायत सदस्यांना पदावरून काढून टाकणे किंवा अनर्ह ठरविण्यासंदर्भात तरतूद नमूद केली आहे.

प्रश्‍न 2 नगरपरिषद अथवा नगरपंचायत सदस्‍यांना पदावरुन काढून टाकणे किंवा अनर्ह ठरविण्याचे अधिकार कोणाला आहेत ?

उत्तर प्रकरणपरत्वे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 42 व 55 (B) नुसार राज्य शासन आणि कलम 44 नुसार तसेच महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम 1986 नुसार जिल्हाधिकारी यांना नगरपरिषद अथवा नगरपंचायत सदस्यांना पदावरुन काढून टाकणे किंवा अनर्ह ठरविण्याचे अधिकार आहेत.

प्रश्‍न 3 नगरपरिषद अथवा नगरपंचायत सदस्‍यांना पदावरुन काढून टाकणे किंवा अनर्ह ठरविण्याच्या आदेशाविरुध्‍द कोणाकडे व किती दिवसात अपील करता येते ?

उत्तर महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 44 अन्वये अनर्ह ठरविण्याच्या आदेशाविरूध्द संबंधितास राज्य शासनाकडे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय मिळाल्यापासून 15 दिवसांमध्ये अपील दाखल करता येते. तसेच उक्त अधिनियमाच्या कलम 16 (1) (1-D) अन्वये अपात्र ठरविण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाविरूध्द संबंधितास राज्य निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय मिळाल्यापासून 15 दिवसांमध्ये अपील दाखल करता येते.
(संदर्भ-महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 16 (1) (1-D) आणि 44 (4))

10. अधिनियमात नमूद राज्‍य निवडणूक आयोगाचे अधिकार

प्रश्‍न 1 नगरपरिषद अथवा नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम कोणाकडून निश्चित केला जातो ?

उत्तर राज्य निवडणूक आयोगाकडून निश्चित केला जाते.
(संदर्भ-महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 10 अ(1))

प्रश्‍न 2 नगरपरिषद अथवा नगरपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम कोणाकडून जाहीर केला जातो ?

उत्तर राज्य निवडणूक आयोग हे निवडणूकीचा कार्यक्रम निश्चित करतात आणि आयोगाने प्रदान केलेल्या नियम 4 मधील अधिकारान्वये जिल्हाधिकारी हे निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करतात.
(संदर्भ- महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम 1966 चे नियम 4 आणि राज्य निवडणूक आयोगाकडील आदेश क्र. रानिआ-1094/164/1994, दिनांक 29/11/1994)

प्रश्‍न 3 निवडणुकीच्‍या तारीखवार कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्‍हा पातळीवर करण्‍याची जबाबदारी कोणाची आहे ?

उत्तर जिल्हाधिकारी.

प्रश्न 4 आरक्षित जागेवर उमेदवार निवडणुकीसाठी उमेदवार उपलब्ध न झाल्यास काय कार्यवाही केली जाते ?

उत्तर नव्याने निवडणूक प्रक्रिया सुरू करावी लागते.

11. निवडणूक नियमातील तरतूद

प्रश्‍न 1 नगरपरिषद अथवा नगरपंचायत निवडणुकीमध्ये एक किंवा अनेक प्रभागांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक कोण करतो ?

उत्तर राज्य निवडणूक आयोगाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करतात.
(संदर्भ- महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम 1966 चे नियम 5 आणि राज्य निवडणूक आयोगाकडील आदेश क्र. रानिआ-1094/164/1994, दिनांक 29/11/1994)

प्रश्‍न 2 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नेमणूक करण्‍याची तरतूद आहे काय ? व त्यांची संख्या जास्तीत जास्त किती असावी ?

उत्तर होय; नगरपरिषद अथवा नगरपंचायतीच्या निवडणूकीसाठी दोन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नेमणेबाबत निदेश आहेत. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे तहसिलदार संवर्गातील किंवा समकक्ष दर्जाचे असतील. (संदर्भ- महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम 1966 चे नियम 5(2)(a) आणि राज्य निवडणूक आयोग यांचेकडील आदेश क्र. रानिआ/मनपा /2011/प्र.क्र. 16/का 05 दिनांक 12/11/2011)

प्रश्‍न 3 मतदान केंद्राध्‍यक्षाची नेमणूक कोण करु शकतो ?

उत्तर निवडणूक निर्णय अधिकारी.
(संदर्भ- महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम 1966 चे नियम 9)

प्रश्‍न 4 मतदान केंद्राध्‍यक्ष म्‍हणून निवडणुकीत किंवा निवडणुकीच्‍या संबंधात एखाद्या उमेदवाराने किंवा त्‍याच्‍या वतीने कामावर लावलेल्‍या किंवा काम करणा-या व्‍य‍क्‍तीची नियुक्‍ती करता येईल काय ?

उत्तर नाही.
(संदर्भ- महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम 1966 चे नियम 9 (1))

प्रश्‍न 5 मतदान केंद्राध्‍यक्षाच्‍या अनुपस्थितीमध्‍ये त्‍याचे कामकाज पूर्ण करण्‍यासाठी काय पर्यायी व्‍यवस्‍था करावी लागते ?

उत्तर प्रथम मतदान अधिकारी मतदान केंद्राध्यक्ष म्हणून काम पार पाडतील.
(संदर्भ- महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम 1966 चे नियम 9 (3))

प्रश्‍न 6 उमेदवाराला मागणीप्रमाणे नामनिर्देशनपत्र पुरविण्‍याची जबाबदारी कोणाची आहे ?

उत्तर निवडणूक निर्णय अधिका-याची आहे.

धोरणे आणि अस्वीकारसाईटमॅपमदतवापरसुलभता

© राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.

एकूण दर्शक: ३४३४३६२    आजचे दर्शक: २५१९

शेवटचे पुनरावलोकन: १३-०७-२०१८



उत्तर लिहिले · 13/7/2018
कर्म · 2530
0

नगरपालिका निवडणूक:

नगरपालिका निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. भारतातील शहरांचे प्रशासन पाहणाऱ्या नगरपरिषदा आणि नगरपालिका सदस्यांची निवड करण्यासाठी ही निवडणूक घेतली जाते.

निवडणूक प्रक्रिया:

  1. प्रभाग रचना: निवडणुकीसाठी शहर विविध प्रभागांमध्ये विभागले जाते.
  2. उमेदवारी अर्ज: इच्छुक उमेदवार निवडणुकीसाठी अर्ज भरतात.
  3. मतदान: निवडणुकीच्या दिवशी मतदार मतदाना centersवर जाऊन मतदान करतात.
  4. मतमोजणी: मतदानानंतर, मतांची मोजणी होते आणि विजयी उमेदवारांची घोषणा केली जाते.

निकष:

  • उमेदवार भारताचा नागरिक असावा.
  • ठरलेल्या वयाची अट पूर्ण असावी.
  • तो त्या भागाचा रहिवासी असावा.

कार्यकाळ:

नगरपालिकेतील सदस्यांचा कार्यकाळ साधारणपणे ५ वर्षांचा असतो.

महत्व:

  • स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी या निवडणुका महत्त्वाच्या आहेत.
  • शहराचा विकास आणि नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सदस्यांची निवड केली जाते.

अधिक माहितीसाठी:

तुम्ही राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1760

Related Questions

चिपळूण तालुक्याचे पंचायत सभापती कोण?
चिपळूण तालुक्याचे पंचायत समिती सभापती कोण आहेत?
खासदार भावना गवळी जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था का करत नाही?
वृत्तांत लेखन: आपल्या शहरात सरकारचे आगमन?
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपला राजीनामा कधी देणार?
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आपला राजीनामा?
शिव स्थानिक संपर्क?