शब्दाचा अर्थ
संस्कृती
नैतिकता
माणुसकी
ध्यात्म
दान
दानाचा खरा लाभ हा दान देणाऱ्याला होतो म्हणजे नक्की कसा?
4 उत्तरे
4
answers
दानाचा खरा लाभ हा दान देणाऱ्याला होतो म्हणजे नक्की कसा?
6
Answer link
दान देण्याचे खूप प्रकार आहे जसे अन्न दान, कन्या दान इत्यादी जर आपण कोणाला कोणत्या पण प्रकारचे दान देत असाल तर त्याचे फळ आपल्याला भेटेलच किंवा भेटलेच पाहिजे असा विचार न करता द्या कारण भगवद गीतेत श्रीकृष्ण म्हणतात तू कर्म करत रहा फळाची चिंता नोकोस करू । कारण तू जर चांगल केलस तर तुला चांगलच मिळेल आणि जर तू वाईट केल तर वाईट । संत कबीर पण हेच म्हणतात बोये पेड़ बबूल का तो अमवा कहासे पाय ।
म्हणून दान करता नेहमी आपले कर्म म्हणून करा ।
तुम्हाला त्याचे फळ मिळेल हे नकी ।
संत कबिरांची वरील ओवी त तुमच्या प्रश्नाचे शॉट मध्ये उत्तर आहे ।
म्हणून दान करता नेहमी आपले कर्म म्हणून करा ।
तुम्हाला त्याचे फळ मिळेल हे नकी ।
संत कबिरांची वरील ओवी त तुमच्या प्रश्नाचे शॉट मध्ये उत्तर आहे ।
5
Answer link
पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही दान देताना जर अपेक्षा ठेवून देणार असाल, तर तुमच्या त्या दानाला कुठलाही अर्थ राहत नाही. दान असे करावे की उजव्या हाताने केले तर डाव्या हाताला समजलें नाही पाहिजे. दान ही एक खूप सुंदर गोष्ट आहे, तुम्हाला जर मनःशांती हवी असेल तर खरोखर दान करून बघा, काही मेडिटेशन वगैरे गोष्टींची गरज नाही पडणार. एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू खुलवन ह्या पेक्षा अजून काय लाभ हवा.
0
Answer link
दान देण्याचा खरा लाभ दान देणाऱ्याला कसा होतो, हे अनेक दृष्टीने समजू शकतो:
१. मानसिक समाधान:
- जेव्हा आपण कोणाला मदत करतो, तेव्हा आपल्याला एक प्रकारचे मानसिक समाधान मिळते.
- आपण कोणाच्या तरी कामाला आलो, या भावनेने आनंद मिळतो.
२. सकारात्मक दृष्टिकोन:
- दान केल्याने आपल्या मनात सकारात्मक विचार येतात.
- आपण जगाकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहतो.
३. कृतज्ञता:
- आपल्याजवळ जे आहे, त्याबद्दल आपण अधिक कृतज्ञ होतो.
- आपल्याला जाणीव होते की आपण किती भाग्यवान आहोत.
४. अहंकार कमी होतो:
- दान केल्याने आपल्यातील अहंकार कमी होतो.
- आपण अधिक विनम्र बनतो.
५. सामाजिक संबंध सुधारतात:
- जेव्हा आपण दान करतो, तेव्हा आपले सामाजिक संबंध सुधारतात.
- समाजात आपली प्रतिमा सुधारते.
६.karma theory (कर्म सिद्धांत):
- चांगले कर्म केल्याने चांगले फळ मिळते, अशी मान्यता आहे.
- दान हे एक चांगले कर्म आहे, त्यामुळे त्याचे चांगले परिणाम मिळतात.
७. वैयक्तिक विकास:
- दान केल्याने आपला वैयक्तिक विकास होतो.
- आपण अधिक समजूतदार आणि जबाबदार नागरिक बनतो.