सरकार स्वच्छता पर्यावरण प्लास्टिक

प्लास्टिकच्या कोणत्या वस्तू बंद झाल्या आहेत?

4 उत्तरे
4 answers

प्लास्टिकच्या कोणत्या वस्तू बंद झाल्या आहेत?

20
प्लास्टिकच्या पिशव्या बाळगणाऱ्यांवर आज 23 जूनपासून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. चला तर जाणून घेऊयात नेमकी बंदी कशावर आणि काय वगळले?

👉 _*बंदी कशावर?*_

▫ प्लास्टिकच्या पिशव्या
▪ प्लास्टिकचे चमचे, कप, ग्लास, स्ट्रॉ
▫ थर्माकोल ताट, ग्लास, वाट्या
▪ उत्पादने साठवण्यासाठी असलेली प्लास्टिकची आवरणे
▫ द्रवपदार्थ साठवण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक
▪ अन्नपदार्थ साठवण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक
▫ प्लास्टिक व थर्माकोलचे डेकोरेशन

👉 _*बंदी कशावर नाही?*_

▫ अर्धा लिटरच्या पाण्याच्या बाटल्या
▪ औषधांचे वेष्टण
▫ कृषी क्षेत्रातील सामान साठवण्यासाठीचे प्लास्टिक
▪ नर्सरीमध्ये वापरात असलेले प्लास्टिक
▫ अन्नधान्यासाठी 50 मायक्रॉनवरील पिशव्या
▪ 50 मायक्रॉनवरील दुधाच्या पिशव्या
▫ रेनकोट
▪ कच्चा माल साठवण्यासाठी वापरात असलेले प्लास्टिक
▫ टीव्ही, फ्रिजसारख्या उत्पादनांसाठी वापरले जाणारे थर्माकोल
▪ बिस्टिक, चिप्स, वेफर पुड्याची वेष्टणे
उत्तर लिहिले · 25/6/2018
कर्म · 29340
12
यावर बंदी -

- प्लास्टिक पिशव्या (हॅंडल असलेल्या आणि नसलेल्या)
- प्लास्टिक चमचे
- प्लास्टिक कप, ग्लास, स्ट्रॉ
- थर्माकोल ताट, ग्लास आणि वाट्या
- उत्पादने साठविण्यासाठी असलेली प्लास्टिक
- अन्नपदार्थ साठविण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक
- प्लास्टिक व थर्माकोलच्या सजावटीच्या वस्तू


यावर बंदी नाही -

- रेनकोट
- नर्सरीमद्ये वापरले जाणारे प्लास्टिक
- टिफीन, डिस्पोजेबल बॅग
- अन्नधान्यासाठी ५० मायक्रॉनवरील पिशव्या
- ५० मायक्रॉनवरील दुधाच्या पिशव्या
- औषधांचे वेष्टन
-  अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या
- कृषी क्षेत्रातील सामान साठविण्यासाठीचे प्लास्टिक
- फ्रिज, टीव्ही उत्पादनांसाठी वापरले जाणारे थर्माकोल
- बिस्कीट, वेफर यांच्या पुड्यांचे वेष्टन

उत्तर लिहिले · 25/6/2018
कर्म · 26390
0

भारतामध्ये 1 जुलै 2022 पासून काही निवडक प्लास्टिक वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. या वस्तू खालीलप्रमाणे आहेत:

  • प्लास्टिकच्या स्टिक असणारे इअरबड्स
  • फुग्यांसाठी प्लास्टिकच्या स्टिक
  • प्लास्टिकचे झेंडे
  • कँडी स्टिक
  • आईस्क्रीम स्टिक
  • decoration साठी वापरले जाणारे थर्माकोल (Thermocol)
  • प्लेट्स (Plates)
  • कप (Cups)
  • ग्लास (Glasses)
  • काटे (Forks)
  • चमचे (Spoons)
  • चाकू (Knives)
  • स्ट्रॉ (Straws)
  • ट्रे (Trays)
  • 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक किंवा पीव्हीसी (PVC) बॅनर

या वस्तू पर्यावरण मंत्रालयाने (Ministry of Environment) प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम, 2016 (Plastic Waste Management Rules, 2016) अंतर्गत प्रतिबंधित केल्या आहेत.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5220

Related Questions

वायू प्रदूषण नियंत्रणासाठी एखादी व्यक्ती कोणती पाच उपाययोजना करू शकते ते लिहा?
पर्यावरण सरंक्षणासंबंधी म. गांधींची कल्पना BEd?
पर्यावरण व्यवस्थापनाचा अर्थ स्पष्ट करा. पर्यावरण व्यवस्थापनातील अडचणी व त्यावरील उपाययोजना स्पष्ट करा. BEd?
तुमच्या गावात इमारत बांधण्यासाठी काही लोक झाडे तोडत आहेत तुम्ही काय कराल?
पर्यावरण शिक्षणाचे महत्त्व (B.Ed. परीक्षेसाठी)?
पर्यावरण शिक्षणाचे महत्त्व?
पर्यावरण शिक्षणाचे महत्त्व (for BED) मुद्दे?