3 उत्तरे
3
answers
औद्योगिक क्रांती म्हणजे काय?
19
Answer link
1) 18 व्या शतकातील तांत्रिक विकासामुळे विकसित झालेल्या अद्ययावत उद्योगवादास "औद्योगिक क्रांती" असे म्हणतात.
2) औद्योगिक क्रांति हा एखादा उठाव किंवा अचानक झालेला बदल नव्हता,तर तो उत्पादनाच्या पद्धतीतील बदल होता.
3) इ. स 1750 ते 1850 या शतकातील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनातून नवीन यंत्रे निर्माण केली.
4) यंत्रयुग आल्याने जुन्या अवजारांची जागा नवीन यंत्रणांनी घेतली.
5) मनुष्यशक्ती आणि प्राणिशक्तीऐवजी बाष्पशक्ती व नंतर विद्युतशक्तीचा वापर सुरू झाला.
6) घरगुती उद्योगांची जागा शहरातील उद्योगांनी घेतली.
7) वाहतूक व संपर्कामध्ये यांत वेगाने प्रगती झाली. त्यामुळे उत्पादनाचा वेग वाढला.
8) मानवी जीवनात सर्वांगीण बदल घडवून आणणार्या तंत्रज्ञानातील या आमूलाग्र बदलास "औद्योगिक क्रांती" म्हणतात.....

0
Answer link
औद्योगिक क्रांती म्हणजे काय?
युरोपात अठराव्या शतकात मालनिर्मितीच्या क्षेत्रात जो प्रचंड बदल झाला, त्याला औद्योगिक क्रांती म्हणतात. ह्या औद्योगिक क्रांतीमध्ये विविध प्रकारची मालनिर्मिती, जी पूर्वी हाताने होत होती, त्याऐवजी आता नव्याने शोधून काढलेल्या यंत्रांच्या साह्याने होऊन लागली होती. त्याचे सामाजिक आणि आर्थिक जीवनावर खोलवर परिणाम झाले. औद्योगिक क्रांतीमुळे एकीकडे जुन्या माल निर्माण करण्याच्या पद्धती मागे पडल्या, तर दुसरीकडे नव्या यंत्राद्वारे मालाची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत गेली. अठराव्या शतकात म्हणजे १७६० नंतर औद्योगिक क्रांतीला प्रथम इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असली तरी पुढे लवकरच म्हणजे इसवी सन १८१५ पर्यंत पश्चिम युरोपीय देशात तिचा प्रसार सुरू झाला. त्यापुढे ती अधिक वेगाने पूर्वेकडे जर्मनी, इटली आणि रशियापर्यंत पोहोचली. विसाव्या शतकातही तिचा अंमल चालूच आहे. ह्यापुढेही अनेक शतके तो असाच चालू राहणार आहे..
0
Answer link
औद्योगिक क्रांती म्हणजे मानवी इतिहासातील एक महत्त्वपूर्ण बदल होता.
औद्योगिक क्रांती:
औद्योगिक क्रांती म्हणजे साधारणतः 1760 ते 1840 या काळात युरोप आणि अमेरिकेत झालेले मोठे तांत्रिक, सामाजिक, आणि आर्थिक बदल.
या काळात, हाथmachinery आणि पारंपरिक उत्पादन पद्धती जाऊन नवीन यंत्रसामग्री, कारखाने, आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झाले.
क्रांतीची कारणे:
- नवीन तंत्रज्ञान: वाफेचे इंजिन, textile machinery (कपड्यांसाठी यंत्रे), आणि लोखंड उत्पादन तंत्रज्ञानाचा विकास.
- नैसर्गिक संसाधने: कोळसा आणि लोखंडाच्या खाणींची उपलब्धता.
- लोकसंख्या वाढ: वाढत्या लोकसंख्येमुळे उत्पादनांची मागणी वाढली.
- राजकीय स्थिरता: काही प्रमाणात राजकीय स्थिरता आणि कायद्याचे राज्य.
परिणाम:
- उत्पादनात वाढ.
- शहरीकरण ( urbanization) वाढले.
- सामाजिक वर्गीकरण बदलले.
- पर्यावरणावर नकारात्मक परिणाम झाला.
औद्योगिक क्रांतीमुळे जगाच्या अर्थव्यवस्थेत आणि समाजात खूप मोठे बदल झाले, ज्याचा प्रभाव आजही दिसतो.