मराठी भाषा व्याकरण सर्वनाम

सर्वनामांचे प्रकार कोणते?

2 उत्तरे
2 answers

सर्वनामांचे प्रकार कोणते?

7
सर्वनामांचे एकंदर सहा प्रकार मानतातः

पुरुषवाचक सर्वनाम

दर्शक सर्वनाम

संबंधी सर्वनाम

प्रश्नार्थक सर्वनाम

सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम

आत्मवाचक सर्वनाम

१) पुरुषवाचक सर्वनामः

बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे तीन वर्ग पडतात

बोलणाऱ्यांचा

ज्यांच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्यांचा

ज्यांच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तींचा वा वस्तूंचा.

व्याकरणात यांना पुरुष असे म्हणतात. या तीनही वर्गांतील नामांबद्दल येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात.

बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथमपुरुषवाचक सर्वनामे .उदा. मी, आम्ही, आपण, स्वतः

ज्याच्याशी बोलावयाचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितीयपुरुषवाचक सर्वनामे उदा.तू, तुम्ही, आपण, स्वतः

ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती तृतीयपुरुषवाचक सर्वनामे उदा.तो, ती, ते, त्या

२) दर्शक सर्वनामेः

जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास ‘दर्शक सर्वनाम’ असे म्हणतात.उदा. हा, ही, हे, तो, ती, ते. उदा.ते घर सुंदर आहे.

३) संबंधी सर्वनामेः

वाक्यात पुढे येणा-या दर्शक सार्वनामाशी संबंध दाखविणा-या सर्वनामांना ‘संबंधी सर्वनामे’ असे म्हणतात.उदा. जो – जी – जे, जे ज्या.

प्रश्नार्थक सार्वनामे

ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो.त्यांना ‘प्रश्नार्थक सर्वनामे’म्हणतात.उदा. कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इत्यादी.

५) सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामेः

कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामांबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात. उदा.

कोणी कोणास हसू नये.

त्या पेटीत काय आहे ते सांगा.

या सर्वनामांना ‘सामान्य सर्वनामे’ असेसुद्धा म्हणतात.

६)आत्मवाचक सार्वनामेसंपादन करा

आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा ‘स्वतः’ असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते.यालाच ‘स्वतःवाचक सर्वनाम’ असेही म्हणतात. उदा.

मी स्वतः त्याला पाहिले.

तू स्वतः मोटार हाकशील का?

तो आपण होऊन माझ्याकडे आला.

तुम्ही स्वतःला काय समजता?

आपण व स्वतः – पुरुषवाचक सर्वनाम व आत्मवाचक सर्वनाम यांतील फरक

आपण व स्वतः ही दोन्ही सर्वनामे पुरुषवाचकही असतात.तेव्हा या दोहोंमध्ये फरक इतकाच की, पुरुषवाचक ‘आपण’ हे केवळ अनेकवचनात येते. आत्मवाचक ‘आपण’ हे दोन्ही वचनात येते. पुरुषवाचक ‘आपण ‘ हे ‘आम्ही’ व ‘तुम्ही’ या अर्थाने येते, तेव्हा ते पुरुषवाचक असते व ‘स्वतः’ या अर्थाने येते तेव्हा ते आत्मवाचक असते.
उत्तर लिहिले · 17/5/2018
कर्म · 20065
0

सर्वनामांचे प्रकार:

मराठीमध्ये सर्वनामांचे मुख्य सहा प्रकार आहेत:

  1. पुरुषवाचक सर्वनाम: बोलणाऱ्याच्या, ऐकणाऱ्याच्या किंवा ज्याच्याबद्दल बोलायचे आहे, अशा व्यक्तींच्या नावाऐवजी वापरले जाणारे शब्द.
    • उदाहरण: मी, तू, तो, आम्ही, तुम्ही, ते.
  2. दर्शक सर्वनाम: जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरले जाणारे शब्द.
    • उदाहरण: हा, ही, हे, तो, ती, ते.
  3. संबंधवाचक सर्वनाम: वाक्यांमधील संबंध दर्शवणारे शब्द.
    • उदाहरण: जो, जी, जे, ज्या.
  4. प्रश्नार्थक सर्वनाम: प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारे शब्द.
    • उदाहरण: कोण, काय, कोणाला, कोणास.
  5. अनिश्चित सर्वनाम: अनिश्चित किंवा नेमकेपणा नसलेल्या व्यक्ती किंवा वस्तू दर्शवणारे शब्द.
    • उदाहरण: कोणी, काही, कुणीतरी, काहीतरी.
  6. आत्मवाचक सर्वनाम: स्वतःबद्दल माहिती देताना वापरले जाणारे शब्द.
    • उदाहरण: आपण, स्वतः, स्वतःला.

अधिक माहितीसाठी, आपण ह्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता: सकाळ

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 2580

Related Questions

खालीलपैकी कोणत्या नामांची सर्वनामे होतात?
She चे सर्वनाम लिहा?
सर्वनामांचे प्रकार व त्यांचे उपयोग लिहा?
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा: मी शाळेतून आताच आलो?
ती दिसायला खूप छान होती. वाक्यातील सर्वनाम ओळखा?
सर्वनामाचे प्रकार व त्याचे उपयोग कसे लिहाल?
सर्वनामाचे प्रकार व त्यांचे उपयोग कोणते?