भारताचा इतिहास व्यक्तिमत्व भारतीय स्वातंत्र्य इतिहास

गांधीजी भारतात परत आले नसते तर भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याचे स्वरूप कसे असते?

2 उत्तरे
2 answers

गांधीजी भारतात परत आले नसते तर भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याचे स्वरूप कसे असते?

6
गांधीजींचा मार्ग तुम्हाला आवडो वा ना आवडो, त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान कुणीही नाकारू शकत नाही.  त्यांचा अहिंसेचा मार्ग एवढा लोकांना आपलंसा वाटला की  स्वातंत्र्य चळवळीत तळागाळातील लोक सामील झाले. मिठाचा सत्याग्रह , चंपारण मधील शेतमजुरांचा लढा यासारखे प्रश्न हाती घेऊन त्यांनी स्वातंत्रलढयाची नाळ सर्वसामान्यांपर्यंत जोडली. याच तत्वावर पुढे मंडेला , मार्टिन ल्युथर यांनी आपला लढा उभारला. एक काळ असा होता की गांधीजींचा देश म्हणजे भारत ही आपली जगात ओळख होती.
पण गांधीजी नसते तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालाच नसत किंवा उशिरा मिळालं असत किंवा फारच आधी मिळालं असतं अस म्हणणं चूक आहे. अहिंसेचा विचार न पटणारे हजारो तरुण मातृभू साठी आपलं रक्त सांडायला तयार होते, त्यांची संख्या नक्कीच वाढली असती. आणि पाठ्यपुस्तकातील क्रांतीकारकांना दुय्यम स्थान मिळाले नसते
१९३० च्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नेहरूंना हरवून सुभाष बाबू निवडून आले हॊते, पण गांधीजींना नेहरू अधिक जवळचे वाटत असल्याने त्यांनी सुभाष बाबूंना राजीनामा द्यायला लावला. माझ्यामते ही घटना काँग्रेसची धोरणे आणि त्यानंतरच्या इतिहासावर खुप परिणाम करणारी ठरावी. कदाचित पाहिले पंतप्रधान म्हणून नेहरू पुढे ही आले नसते. सुभाषबाबुनी आपला लढा भरतातूनच चालवला असता आणि त्या दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू ही झाला नसता. (याचा अर्थ गांधीजी त्यांच्या मृत्यूला जबाबदार आहेत असा अजिबात होत नाही).
गांधीजी नसते तर पाकिस्तानची निर्मिती ही झाली नसती असं म्हणणं ही चुकीच आहे. परंतु गांधीजींनी दंगलग्रस्त भागाचा दौरा करून जी हिंसा थांबवली तस कुणाला कदाचित करता आलं नसतं.
राजकारणात चालू राहिलेलं धार्मिक जातीय तुष्टीकरण ही कदाचित झालं नसतं. गांधीजींचं नाव घेऊन लबाडीच राजकारण करणारे पुढारीसुद्धा आले नसते
या सगळया झाल्या जर तर च्या गोष्टी. नक्की काय झालं असत हे नियतीच जाणे.
गांधीजींची कधी दलित विरोधी, हिंदू विरोधी , मुस्लिम विरोधी अशी प्रतिमा रंगविण्यात येते, अत्यंत चुकीच्या पद्धतीने टीकाही होते, हे मात्र नक्कीच चुकीच आहे.
उत्तर लिहिले · 14/5/2018
कर्म · 99520
0

महात्मा गांधी 1915 मध्ये भारतात परत आले. ते भारतात परत आले नसते, तर भारताच्या स्वातंत्र्याचे स्वरूप कसे असते याबद्दल निश्चितपणे काही सांगता येत नाही. मात्र, काही संभाव्य गोष्टींचा विचार करता येऊ शकतो:

1. स्वातंत्र्य मिळण्यास विलंब:
  • गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक नवी दिशा दिली. त्यांनी অসহযোগ आंदोलन, सविनय कायदेभंग आंदोलन यांसारख्या अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वामुळे स्वातंत्र्यलढा अधिक प्रभावी झाला. ते भारतात परत आले नसते, तर कदाचित भारताला स्वातंत्र्य मिळण्यास अधिक वेळ लागला असता.
2. क्रांतिकारकांचे वर्चस्व:
  • गांधीजींच्या अहिंसक आंदोलनामुळे जनतेचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला. ते नसते, तर कदाचित क्रांतिकारकांनी सुरू केलेल्या सशस्त्र लढ्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले असते.
3. जातीय आणि धार्मिक संघर्ष:
  • गांधीजींनी नेहमीच हिंदू-मुस्लिम एकतेचा पुरस्कार केला. ते नसते, तर जातीय आणि धार्मिक संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता होती, ज्यामुळे देशाचे विभाजन अधिक क्लेशदायक ठरले असते.
4. वेगळ्या प्रकारची राजकीय प्रणाली:
  • गांधीजींनी भारतासाठी ज्या राजकीय आणि सामाजिक विचारांचा पुरस्कार केला, जसे की ग्राम स्वराज्य, सर्वधर्म समभाव, ते विचार कदाचित प्रभावी ठरले नसते. त्यामुळे भारताने वेगळ्या प्रकारची राजकीय प्रणाली स्वीकारली असती.

Disclaimer: हे केवळ काही संभाव्य विचार आहेत. इतिहासात काय घडले असते हे निश्चितपणे सांगणे शक्य नाही.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 4280

Related Questions

भारत देश केव्हा स्वातंत्र झाला?
15 ऑगस्ट 1947 ला मध्यरात्रीच भारताला स्वातंत्र्य का दिले गेले? त्या वेळ आणि तारखे मागील इतिहास काय आहे?
कोणत्या योजनेच्या आधारे १८ जुलै १९४७ रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला?
स्वातंत्र्यासाठी १५ ऑगस्ट हाच दिवस का निवडला?