भारत भारतीय स्वातंत्र्य इतिहास महाराष्ट्राचा इतिहास

15 ऑगस्ट 1947 ला मध्यरात्रीच भारताला स्वातंत्र्य का दिले गेले? त्या वेळ आणि तारखे मागील इतिहास काय आहे?

2 उत्तरे
2 answers

15 ऑगस्ट 1947 ला मध्यरात्रीच भारताला स्वातंत्र्य का दिले गेले? त्या वेळ आणि तारखे मागील इतिहास काय आहे?

4
🇮🇳 *15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्रीच भारताला स्वातंत्र्य का? तारीख, वेळेमागील इतिहास.*

🔰📶 *महा डिजी I स्वातंत्र्यदिन विशेष*

👍 15 ऑगस्ट 1947 मध्यरात्री 12 वाजता भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली. मात्र भारताच्या स्वातंत्र्यदिनाची ही तारीख आणि वेळ अचानक ठरलेली नाही. या तारखेमागे आणि वेळेमागेदेखील इतिहास आहे.

✋ काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जवाहरलाल नेहरू यांनी 1929 साली ब्रिटिश सरकारपासून पूर्णपणे स्वंत्रतेची मागणी केली आणि 26 जानेवारीला स्वांत्र्यदिन साजरा करण्याती घोषणा केली. 1930 नंतरदेखील हा दिवस स्वतंत्रता दिन म्हणून साजराही करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात स्वातंत्र्यदिन होऊ शकला नाही. मग 1950 साली याच दिवशी भारताचं संविधान लागू झालं म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मानला गेला.

📦 1945 साली दुसऱ्या जागतिक युद्धात ब्रिटनची आर्थिक स्थिती खराब झाली होती आणि राजकीय संकटही होतं. 1945 साली झालेल्या मतदानात ब्रिटनची लेबर पार्टी विजयी झाली. लेबर पार्टीने आपलं सरकार बनलं तर ब्रिटिश राजवटीतील देशांना मुक्त केलं जाईल, असं आश्वासन दिलं होतं आणि लेबर पार्टीचं सरकार येतात भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली.

🤝 भारताला हक्क सुपूर्द करण्यासाठी फेब्रुवारी 1947 साली माऊंटबेटन यांची नियुक्ती करण्यात आली. भारताला आपल्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी माऊंटबेटन यांनी एक मसूदा तयार केला.  30 जून 1948 ला सर्व हक्क भारताला सुपूर्द करणार असं या मसुद्यात नमूद होतं. मात्र भारतीय नेत्यांचं यावर एकमत झालं नाही.  त्यांनी जून 1948 ही तारीख ठरवली ज्याला विरोध झाला आणि मग 1947 हेच वर्ष ठरलं.

👌 जून 1947 ठरलं की भारताला ऑगस्टपर्यंत स्वतंत्र करायचं. माऊंटबेटन यांनी 15 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली. या तारखेबाबत माऊंटबेटन म्हणाले, 15 ऑगस्ट हीच तारीख ठरवली कारण याचदिवशी दुसरं महायुद्ध संपताना जपानने आत्मसमर्पण केलं होतं. माऊंटबेटन या तारखेला आपल्यासाठी शुभ मानत होते. तर दुसरीकडे भारतातील ज्योतिष तज्ज्ञ या तारखेला भारतासाठी अशुभ मानत होतं. त्यांनी दुसरी तारीख दिली मात्र माऊंटबेटन आपल्या निर्णयावर ठाम होते.

🟠 *मध्यरात्रीच स्वातंत्र्य देण्याचं का ठरलं?* - ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, 15 ऑगस्ट  तारीख भारतासाठी शुभ नव्हती. त्यामुळे एक शुभे वेळ काढण्यात आली. 14  ऑगस्ट 1947 रात्री 11.51 ते रात्री 12 .39 ही वेळ शुभ होती. इंग्रजी कॅलेंडरनुसार रात्री 12 नंतर 15 ऑगस्ट सुरू होतो. मात्र भारतीय पद्धतीनुसार सूर्योदयानुसार तारीख बदलते. त्यामुळे मध्यरात्री 12 ही वेळ निश्चित झाली.
____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy
उत्तर लिहिले · 15/8/2020
कर्म · 569265
0
१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारताला स्वातंत्र्य देण्यामागे अनेक कारणं होती. त्या वेळेची आणि तारखेची निवड ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची होती. खाली काही प्रमुख कारणं दिली आहेत:
  • लॉर्ड माउंटबॅटन (Lord Mountbatten): लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे व्हाईसरॉय होते आणि त्यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची प्रक्रिया पार पाडली. त्यांनी १५ ऑगस्ट ही तारीख निवडली कारण याच दिवशी दुसरे महायुद्ध संपले होते आणि মিত্র राष्ट्रांनी जपानवर विजय मिळवला होता. लॉर्ड माउंटबॅटन स्वतःला भाग्यवान मानत होते की याच दिवशी त्यांनी जपानच्या আত্মসমर्पणावर सही केली होती, त्यामुळे त्यांनी याच तारखेला भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला.

  • शुभ मुहूर्त: काही ज्योतिष्यांनी असा युक्तिवाद केला की १५ ऑगस्ट हा दिवस शुभ नव्हता. त्यामुळे, मध्यरात्री १२:०० चा मुहूर्त निवडण्यात आला, जेणेकरून नवीन दिवसाची सुरुवात शुभ वेळेत होईल.

  • सत्ता हस्तांतरण: मध्यरात्री सत्ता हस्तांतरण करणे हे ब्रिटिश सरकारसाठी सोपे होते, कारण या वेळेत कोणतीही गडबड होण्याची शक्यता कमी होती.

  • भारतीय नेत्यांची सहमती: भारतीय नेते देखील या वेळेसाठी तयार होते, कारण त्यांना ब्रिटिशांकडून लवकरात लवकर सत्ता मिळवायची होती.
या निवडीमुळे भारताला एक नवीन सुरुवात करण्याची संधी मिळाली आणि भारतीय नेत्यांना देशाच्या विकासासाठी योजना बनवण्यास वेळ मिळाला.
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 4280

Related Questions

भारत देश केव्हा स्वातंत्र झाला?
कोणत्या योजनेच्या आधारे १८ जुलै १९४७ रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला?
स्वातंत्र्यासाठी १५ ऑगस्ट हाच दिवस का निवडला?
गांधीजी भारतात परत आले नसते तर भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याचे स्वरूप कसे असते?