2 उत्तरे
2 answers

सात्विक म्हणजे काय?

6
सत्वाचा अंगिकार करणारा सात्विक असतो.
आता सत्व म्हणजे काय तर त्रिगुणांपैकी एक गुण आहे.
रज , तम , सत्व हे त्रिगुण आहेत .
रज :
रज म्हणजे अगदी मौजेत राहणे आवडते, खाणे पिणे सगळे मजेशीर , राजेशाही, ऐश आराम जास्त आवडतो;
असे गुण अंगी असणाऱ्याला राजस म्हणतात
तम :
तम म्हणजे अंगी राग , क्रोध, नको ते खाणे पिणे ,नको तिथे जाणे, पर स्त्री गमन, व्यसन करणे , लोभीपणा, स्वार्थी यांसारखे गुण अंगी असणाऱ्याला तामस म्हणतात.
सत्व :
सत्व म्हणजे मनात सर्वांबद्दल अपार प्रेम, भूतदया, सतत इतरांना मदतीची भावना, सर्वांविषयी कळवळा , यथायोग्य आहार ,यथायोग्य विहार,निस्वार्थता,निरपेक्षता, भगवद्भक्तीमध्ये आवड,दिखाऊ भक्तीपेक्षा भगवंताला मान्य असणारी ,मनोभावे भक्ती ,सदगुरू वचनावर विश्वास यांसारखे गुण असणाऱ्याला सात्विक म्हणतात.
🙏जय हरि🙏
उत्तर लिहिले · 21/4/2018
कर्म · 2180
0

सात्विक या शब्दाचा अर्थ शुद्ध, निर्मळ, पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणारा असा होतो.

सात्विक (Sattvic) हा शब्द संस्कृत 'सत्व' (Sattva) या शब्दापासून आला आहे. सत्व म्हणजे 'अस्तित्व', 'सच्चाई', 'शुद्धता' आणि 'सकारात्मकता'.

सात्विक गोष्टींमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:

  • सात्विक आहार: फळे, भाज्या, नट्स आणि संपूर्ण धान्य.
  • सात्विक विचार: सकारात्मक आणि रचनात्मक विचार.
  • सात्विक आचरण: प्रामाणिकपणा, अहिंसा आणि करुणा.

सात्विक जीवनशैली आपल्याला शारीरिक आणि मानसिकरित्या निरोगी ठेवण्यास मदत करते.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5240

Related Questions

स्याद्वाद कशाशी संबंधित आहे?
खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे 1न्याय कर्मावर भर देतो 2मीमासा तर्कावर भर देते 3न्याय तर्कप्रधान आहे 4मीमासा ध्यानप्रधान आहे?
न्याय दर्शनातील संशय कशामुळे निर्माण होतो?
न्याय दर्शनात प्रमाण म्हणजे काय?
जैन तत्त्वज्ञानातील अनेकांतवाद खालीलपैकी काय सूचित करतो?
अद्वैत वेदान्तानुसार जीव आणि ब्रह्म यांचा संबंध कसा आहे?
चर्वाकांनी आत्मा, ईश्वर व परलोक नाकारण्यामागील कारणांचे विश्लेषण करा?