अन्न मांसाहार आरोग्य आहार

मटण खाणे चांगले आहे की वाईट?

4 उत्तरे
4 answers

मटण खाणे चांगले आहे की वाईट?

28
धर्म किंवा इतर कुठला हि आधार न घेता सांगायचं झालं तर मटण खाणे वाईटच. नैसर्गिक रित्या माणसाचे हे खाद्य नाहीच, त्या मुळे ते मानवी शरीरास पचनास जड जाते. आणि दुसरा भाग असा कि प्रत्येक सजीवास आपलं जीवन जगण्याचा अधिकार आहे. जशी माणसांची जीवनात काही स्वप्न असतात तशीच स्वप्न इतर प्राणी पक्षी यांची देखील असतात. त्यांना ठार मारून त्यांची स्वप्न भंग करण्याचा अधिकार माणसाला नाही.
उत्तर लिहिले · 11/4/2018
कर्म · 10450
13
मांसाहार करणे चांगले आहे की वाईट हा प्रश्नच नाही, कारण तो "आहार" आहे.

कसे?

शाकाहार असो वा मांसाहार, निसर्गाने आपल्याला व इतर प्राण्यांना  भूक भागवण्यासाठी वनस्पती, पशु पक्षी, व सागरी जलचर यावर जगण्यास भाग पाडले आहे. म्हणजे इथे भावनिक होण्याचा प्रश्न येत नाही, कारण हे  जीवन चक्र आहे. जेव्हा कोणी प्राणी मांसाहार करतो, तेव्हा तो वाईट होतो, अस नाही.

तर मग निसर्गाला दोषी धराल का तुम्ही? जर "निसर्गाच्या रचनेला" दोषी धरणार असाल, तर मग मांसाहार वाईट आहे.

एखादा प्राणी फक्त शाकाहार करतो, एखादा फक्त मांसाहार, तर एखादा दोन्ही ही करतो, हे ज्या त्या परिस्थिती वर व अन्नाच्या उपलबद्धतेवर अवलंबून आहे. व माणूस हा सर्वात आधी एक प्राणी आहे. उत्क्रांती नंतर माणसाला मांसाहाराची गरज पडली, व तेव्हापासून माणसाचं शरीर हे उत्क्रांत होत आहे.

माणूस जर शाकाहारी प्राणी आहे, तर तो होता, आता नाही आहे.
मांसाहार खाण्यायोग्य आता माणसाचं शरीर विकसित झाले आहे, कारण ह्या मध्ये खूप काळ गेला आहे, व उत्क्रांती ही सतत होणारी प्रक्रिया आहे.

त्यामुळे मांसाहार हा वाईट नाही, व जसा शाकाहार वाईट नाही. माणसाला आता दोघांचेही तितकेच महत्व व गरज आहे.

मांसाहार चांगला आहे की वाईट?
उत्तर लिहिले · 12/4/2018
कर्म · 85195
0

मटण खाणे चांगले की वाईट, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसे की तुमची एकूण आहार योजना, आरोग्य स्थिती आणि तुम्ही किती प्रमाणात सेवन करता.

मटणाचे फायदे:

  • प्रथिने: मटण हे प्रथिनांचा चांगला स्रोत आहे, जे शरीर आणि स्नायूंच्या वाढीसाठी आवश्यक आहे.
  • लोह: मटणामध्ये हिम लोह (heme iron) असते, जे शरीरात सहजपणे शोषले जाते आणि हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते.
  • व्हिटॅमिन बी 12: मटण व्हिटॅमिन बी 12 चा चांगला स्रोत आहे, जे मज्जासंस्थेच्या कार्यासाठी महत्त्वाचे आहे.
  • झिंक: रोगप्रतिकारशक्ती आणि चयापचय क्रियेसाठी आवश्यक जस्त (Zinc) देखील यात असते.

मटणाचे तोटे:

  • चरबी: मटणामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असू शकते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते आणि हृदयविकारांचा धोका वाढू शकतो.
  • प्रक्रिया केलेले मांस: प्रक्रिया केलेले मांस (processed meat), जसे की सॉसेज (sausage) आणि बेकन (bacon), मध्ये सोडियम आणि इतर हानिकारक पदार्थ जास्त असू शकतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात.
  • कॅलरीज: जास्त प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढू शकते.

निष्कर्ष:

moderation मध्ये म्हणजे माफक प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी ठीक आहे. मात्र, जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे.

तुम्हाला काही विशिष्ट आरोग्य समस्या असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम राहील.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 2880

Related Questions

मांसाहार खाल्ल्यास काय फायदा होतो?
भविष्यात नॉनव्हेज खाणे चांगले की वाईट?