औषधे आणि आरोग्य
घरगुती उपाय
डोकेदुखी
वैद्यकीय समस्या
आरोग्य
माझ्या डोक्यात मुंग्या आल्यासारखं होत, थोडा वेळ होत नंतर थांबत. परत मुंग्या येतात. डॉक्टरांना दाखवले पण काहीच फायदा नाही झाला. काही उपाय असेल तर सांगा?
4 उत्तरे
4
answers
माझ्या डोक्यात मुंग्या आल्यासारखं होत, थोडा वेळ होत नंतर थांबत. परत मुंग्या येतात. डॉक्टरांना दाखवले पण काहीच फायदा नाही झाला. काही उपाय असेल तर सांगा?
9
Answer link
रक्तदाबामध्ये वाढलेला रक्तदाब किंवा उच्चरक्तदाब हा हृदय व रक्ताभिसरण मधील आजार आहे. उच्चरक्तदाबाची लक्षणे स्पष्ट पणे जाणवत नाहीत... वाढत्या वयाबरोबर उच्चरक्तदाब वाढण्याचे प्रमाण वाढते....आहारात मीठाचे प्रमाण जास्त असेल तर हा आजार उद्भवतो....
सकाळी उठल्यानंतरच्या काही तासात डोके दुखणे, डोळे पुढील किंवा मागील भागात दुखणे तसेच डोके गच्च असल्यासारखे वाटते. डोक्यात ठोके पडल्यासारखे वाटणे. यासह चालतांना तोल जाणे, छातीत धडधड होणे किंवा छाती गच्च झाल्यासारखे वाटणे, थकवा वाटणे, हाता-पायात, डोक्यात मुंग्या येणे, लघवीचे प्रमाण(विशेषता रात्री वाटणे), नाकातून रक्त स्त्राव होणे, मोठा आवाज सहन न होणे.
ही उच्चरक्तदाबाची लक्षणे आढळल्यास रुग्णाने रक्तदाब तपासून योग्य उपचार करुन घेतल्यास रक्तदाब पूर्ववत होतो. परंतू काही कायमस्वरुपी औषधेही द्यावी लागतात. रक्तदाबाचे निदान वेळीच न केल्यास हृदय, किडनी, भेंदूवर त्याचा परिणामही होतो.
तपासण्याः-
1) रक्ताची पुर्ण तपासणी करावी- हिमोग्लोबिन, रक्तातील पांढऱ्या व लाल पेशींचे प्रमाण इ. तपासणी करावी.
2) लघवीची तपासणी करावी.
3) रक्ताची तपासणीत साखरेचे प्रमाण- उपाशी पोटी व जेवल्यानंतर दोन तासांनी करावी.
4) रक्तातील चरबीचे प्रमाण घटक – कोलेस्टा्ेरेल, ट्रॅायग्लिससाईटर
5) मुत्रपिंडाचे कार्य तपासणी करावी त्यात युरिया, क्रियाटिनीन, सोडियम, पोटॅशियम या घटकांचे प्रमाण तपासावे.
6) रक्तातील, लघवीतील संप्रेरके तपासणी करावी.
7) इलेक्ट्रोकॉर्डीओग्राम- यावरुन हृदयाचे ठोके, डावी जवनिका स्नायूतील वृध्दीमुळे जाड झाली आहे काय हे समजते.
8) छातीचा(क्ष-किरण)ः- हृदयाचा आकार वाढलेला आहे काय ते कळते.
9) पोटाची सोनोग्राफीः- मुत्रपिंडाचा आकार, रचना, खडे, इ.कळते.
10) एकोकार्डीओग्राफी ः- हृदयाच्या कप्याविषयी, झडपाविषयी, हृदयांचे स्नायु इ. माहितीचे निदान होणेसाठी तपासणी केल्या जातात.
11) कार्डीओग्राम ः- यात दोष आढळल्यास स्ट्रेस टेस्ट व कोरोनरी एंन्जोग्राफी या तपासण्या केल्या जातात.
रुग्णाच्या उच्चरक्तदाब नियंत्रित राहावे, सामान्यप्रमाणे जीवन जगण्यासाठी अचूक निदान व औषधोपचाराची गरज रुग्णाला असते.
हृदयरोगी, उच्चरक्तदाब असणारे निरामय आयुष्य जगण्यास हातभार लागतो.
रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे उपाय-
1) वजनावर नियंत्रण ठेवावे ः- अतिरिक्त वाढलेेले वजन कमी करावे.
2) अन्नातील मीठावर मर्यादा ः- जेवणात 2 ते 3 ग्रॅम मीठ वापरावे. लोणची, पापड, बेकरीपदार्थ वर्ज्य करावे.
3) पोटॅशियम जास्त असलेले पदार्थ (उदा. नारळ पाणी, फळे, भाज्यांचे) सेवन वाढवावे.
4) मद्यपान, धुम्रपान, चहा, कॉफी यांचे अतिरिक्त प्रमाण टाळावेत.
5) आहारात कोशंबिरी, पालेभाज्या, मोडची कडधान्ये वापर करावा.
6) मासांहारींनी मासे खाण्यास हरकत नाही पंरतु प्रमाणातच.
7) तेल तीन फॅटी ओमगा ऍसडी जास्त प्रमाणात असावे करडई, मोहरीचे तेल, देशी तूप इ. वापरावे.
8) व्यायाम नियमितपणे करावे.
9) ताणतणावरहीत जीवनशैली असावी. जीवनशैलीत सुधारणा करावी.
औषधोपचार हे उच्चरक्तदाबाच्या रुग्णांना जीवनभर लागत असल्याने वयोमानानुसार आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचाराचे योग्य प्रमाण ठरवून घ्यावे. स्वतःच्या मनाने रुग्णाने बदल करु नये.

2
Answer link
जर डॉक्टर काही सांगू शकले नसतील तर मी काय सांगणार? तरीसुद्धा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. उत्तर चूक आहे की बरोबर ते मला माहिती नाही. तुमच्या डोक्यात रक्तप्रवाह नीट होत नसावा व त्यामुळे डोक्यात मुंग्या येत असाव्यात. तरी तुम्ही रोज रात्री झोपताना शीर्षासन केलेत व रोज रात्री झोपतांना डोक्याला मालिश केलेत तर कदाचित काही दिवसांनी तुमचा त्रास कमी होऊ शकतो. वाटल्यास (डॉक्टरांना विचारून) डोक्याचा MRI काढून घ्या व डॉक्टरांना दाखवा. त्यात जर डॉक्टरांना काही Problem दिसला तर ते तुम्हाला सल्ला देतील.
0
Answer link
तुमच्या डोक्यात मुंग्या येतात आणि डॉक्टरांना दाखवूनही काही उपयोग झाला नाही, हे ऐकून मला वाईट वाटले. या समस्येसाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत, पण हे लक्षात ठेवा की ही फक्त माहिती आहे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.
उपाय:
1. जीवनशैलीतील बदल:
* आहार: तुमच्या आहारात व्हिटॅमिन बी 12 (Vitamin B12) आणि लोह (Iron) पुरेसे आहे का ते तपासा. कमतरता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सप्लिमेंट्स (supplements) घ्या.
* व्यायाम: नियमित व्यायाम करणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. रोज 30 मिनिटे व्यायाम करा.
* पुरेशी झोप: दररोज रात्री 7-8 तास झोप घेणे आवश्यक आहे.
* ताण कमी करा: ध्यान (Meditation) आणि योगा (Yoga) केल्याने ताण कमी होतो.
2. घरगुती उपाय:
* Lavender तेल: Lavender तेल लावल्याने आराम मिळतो.
* गरम पाण्याची वाफ: गरम पाण्याची वाफ घेतल्याने डोक्यातील रक्त प्रवाह सुधारतो.
3. डॉक्टरांचा सल्ला:
* दुसऱ्या न्यूरोलॉजिस्टचा (Neurologist) सल्ला घ्या.
* काहीवेळा मायग्रेन (Migraine) किंवा इतर न्यूरोलॉजिकल (Neurological) समस्यांमुळे असे होऊ शकते, त्यामुळे तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
मला आशा आहे की हे उपाय तुम्हाला मदत करतील.