सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्र मधील फरक सांगा?
1) प्रारंभ आणि जनक
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा प्रारंभ अगोदर झाला. अर्थशास्त्राची पद्धतशीर सुरुवात आणि मांडणी ॲडम स्मिथ यांनी केली. त्यामुळे ॲडम स्मिथला सूक्ष्म अर्थशास्त्राचे जनक मानले जाते.
समग्रलक्षी अर्थशास्त्राची सुरुवात व विकास सूक्ष्म अर्थशास्त्रा नंतर झाला. लॉर्ड केन्स यांना समग्र अर्थशास्त्राचा जनक मानले जाते. त्यांनी आपल्या रोजगार व्याजदर व पैसा विषयक सामान्य सिद्धांत या 1936 मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकात समग्रलक्षी अर्थशास्त्राचा पद्धतशीर विकास करण्याचे कार्य केले आहे.
2) स्वरूप.
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ वैयक्तिक उपभोक्ता ,विशिष्ट उत्पादन संस्था, वैयक्तिक किंमती, विशिष्ट उद्योग ,विशिष्ट वस्तू इत्यादी.
संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रित अभ्यास म्हणजेच समग्रलक्षी अर्थशास्त्र होय. उदाहरणार्थ अर्थव्यवस्थेतील सर्व भक्तांच्या आर्थिक वर्तनाचा एकत्रित अभ्यास, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण मागणी ,एकूण पुरवठा, एकूण उपभोग, एकूण गुंतवणूक इत्यादी.
3) किंमत आणि उत्पन्न.
सूक्ष्म आणि समग्रह या दोन्ही विश्लेषणात मागणी पुरवठ्यातील संतुलनाच्या अटींचा अभ्यास केला जातो परंतु सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात बाजाराची मागणी आणि बाजाराचा पुरवठा यांचे संतुलन प्रस्थापित करण्याचे कार्य यात किंमत ही प्रेरणा म्हणून कार्य करत असते.
याउलट समग्रलक्षी अर्थशास्त्रात समग्र मागणी आणि समग्र पुरवठा यांच्या मधील संतुलनाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा संतुलन प्रेरणा म्हणून समग्र उत्पन्न पातळी कार्य करीत असते.
4) परिमाणाची अभिव्यक्ती.
सूक्ष्म अर्थशास्त्रात नियम आणि सिद्धांत यांची चर्चा करताना वास्तव परिमानांचा विचार करणे शक्य असते. आपण जेव्हा घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम किंवा मागणी पुरवठ्याचा नियम अभ्यास असतो तेव्हा आपण वास्तव परिणामांचा विचार करतो किंबहुना मागणी पुरवठ्यातील अंशलक्षी समतोल हाच मुळात वास्तव परिमानातील समतोल असतो.
समग्रलक्षी अर्थशास्त्रात सर्व वस्तू व सेवांची एकत्रित बेरीज करण्याचा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा वस्तू आणि सेवांचे आधी पैशात मूल्य व्यक्त करून मग त्या मूल्यांची बेरीज करावी लागते म्हणून एकूण मागणी ,एकूण पुरवठा, एकूण राष्ट्रीय उत्पादन यासारखे सर्व घटक पैशात व्यक्त केले जातात.
5) व्याप्ती व अभ्यास विषय.
सूक्ष्म अर्थशास्त्र ची व्याप्ती किंवा अभ्यास विषय हा वस्तूंच्या व सेवांचा किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकांचा किंमत निश्चितीचे सिद्धांत व साधनसामग्रीचे विभाजन यांच्या अभ्यासाशी संबंधित आहे.
याउलट समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती किंवा अभ्यास विषय हा राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगार ,सर्वसाधारण किंमत पातळी, आर्थिक वृद्धीचा दर ,एकूण गुंतवणूक, व्यापारचक्र ,सार्वजनिक वित्त व आंतरराष्ट्रीय व्यापार यांच्या अभ्यासाशी संबंधित आहे.
6) गृहितके.
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र अंशिक समतोलाचे विश्लेषण करते. यात अर्थव्यवस्थेतील घटकांचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. प्रत्येक घटक वेगळा करून त्याचा सविस्तरपणे अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो त्यामुळे यासाठी इतर परिस्थिती कायम असते या महत्त्वाच्या गृहीतकाचा आधार घ्यावा लागतो. यात इतर घटकातील बदलांचा मूळ घटकातील बदलांवर परिणाम होत नाही.
समग्रलक्षी अर्थशास्त्रात सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण केले जाते ,समग्रलक्षी अर्थशास्त्र समग्र आर्थिक चला मधील परस्पर संबंध विचारात घेतला जातो त्यासाठी सर्व घटक इतर सर्वांची संबंधित असतात या गृहीतकाचा आधार घेतला जातो.
7) विभाजनाचा सिद्धांत.
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात उत्पादनाचे घटक भूमी ,श्रम ,भांडवल आणि संयोजक यांना दिले जाणारे मोबदला खंड, वेतन ,व्याज आणि नफा यांची निश्चिती कशाप्रकारे होते याचा अभ्यास केला जातो.
समग्र अर्थशास्त्राच्या बाबतीत मात्र राष्ट्रीय उत्पन्न हा मूलभूत आधार आहे .एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचे वेगवेगळ्या सामाजिक गटात विभाजन कसे होते हे समग्रलक्षी विभाजनाच्या सिद्धांत स्पष्ट होते एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड ,वेतन ,व्याज आणि नफा यांचा वाटा कसा निर्धारित होतो याचे विश्लेषण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये होते.
8) मूलभूत आर्थिक प्रश्न.
A) कोणत्या वस्तूचे उत्पादन करावी ते किती प्रमाणात करावे?
B) कोणत्या तंत्राच्या सहाय्याने वस्तूचे उत्पादन करावे?
C) उत्पादित वस्तू व सेवांचे विभाजन कसे करावे?
इत्यादी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आला पडलेले आर्थिक प्रश्न आहेत.
तर समग्रलक्षी अर्थशास्त्रात
A)एका देशातील साधनसामग्रीचा पूर्ण वापर होत आहे का?
B) देशाच्या अर्थव्यवस्थेतील उत्पादनक्षमता वाढली आहे का?
इत्यादी आर्थिक वृद्धीच्या प्रश्नांशी संबंधित विश्लेषण आहे शिवाय पैशाची खरेदी शक्ती स्थिर आहे का? देशाच्या व्यवहारतोल आजची स्थिती देशाला अनुकूल आहे का ?यासारख्या आर्थिक प्रश्नांचा देखील समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या शाखेत अभ्यास केला.
9) दृष्टिकोन.
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे एखाद्या वस्तूची किंमत मागणी पुरवठ्याच्या समतोलातून कशी निश्चित होते या अंशिक समतोलाचे विश्लेषण करते. अंशिक समतोलाचा संबंध एक उत्पादक, एक व्यक्ती, उत्पादन संस्था, उद्योग संस्था यांच्याशी असतो.
समग्रलक्षी अर्थशास्त्र हे सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण करते. सर्वसाधारण समतोलाचा संबंध एकूण मागणी ,एकूण पुरवठा, एकूण राष्ट्रीय उत्पादन एकूण उपभोग, एकूण गुंतवणूक यांच्याशी असतो.
10) विवेचन पद्धती.
सूक्ष्म अर्थशास्त्र व्दारे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शकातून अवलोकन केले जाते. यात सखोल अभ्यासाकरिता अर्थव्यवस्था लहान लहान भागात विभागली जाते. म्हणून सूक्ष्मअर्थशास्त्र ना विश्लेषणाची स्लायसिंग मेथड असेही म्हटले जाते.
समग्रलक्षी अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचे समग्र अवलोकन करते म्हणून संपूर्ण अर्थव्यवस्थेचे एखाद्या पक्षाच्या दृष्टिक्षेपात येणारे दृश्य असल्याचे स्वरूप असते.
सूक्ष्मलक्षी व समग्रलक्षी अर्थशास्त्र मध्ये भेद असले तरी ते परस्परविरोधी नसून परस्परपूरक आहे. सूक्ष्म अगर समग्र दृष्टीकोन एकमेकांच्या मदतीशिवाय पूर्ण होत नाही आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी व अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी समग्र व सूक्ष्म या दोन्ही विवेचन पद्धती आवश्यक असतात.
सूक्ष्म अर्थशास्त्र (Microeconomics) आणि स्थूल अर्थशास्त्र (Macroeconomics) यांच्यातील मुख्य फरक खालीलप्रमाणे:
अर्थ: सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थशास्त्राचा तो भाग आहे जो वैयक्तिक ग्राहक, कुटुंबे आणि कंपन्यांच्या वर्तनाचा अभ्यास करतो. हे विशिष्ट वस्तू आणि सेवांच्या किमती आणि उत्पादनावर लक्ष केंद्रित करते.
लक्ष्य: मागणी आणि पुरवठा, उत्पादन खर्च, बाजारातील स्पर्धा आणि किंमत निश्चिती यांसारख्या घटकांचा अभ्यास करणे.
उदाहरण: एका विशिष्ट कंपनीच्या उत्पादनावर परिणाम करणारे घटक, एका विशिष्ट वस्तूची किंमत कशी ठरते, किंवा एका ग्राहकाच्या खरेदी निर्णयांचा अभ्यास.
अर्थ: स्थूल अर्थशास्त्र हे अर्थशास्त्राचा तो भाग आहे जे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. यात राष्ट्रीय उत्पन्न, बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक वाढ यांचा समावेश होतो.
लक्ष्य: एकूण मागणी आणि पुरवठा, व्याज दर, सरकारी धोरणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यांचा अभ्यास करणे.
उदाहरण: बेरोजगारीची कारणे, महागाई नियंत्रित करण्याचे उपाय, किंवा देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम करणारे घटक.
थोडक्यात फरक: सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक घटकांवर लक्ष केंद्रित करते, तर स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार करते.
ॲक्युरीसी: