5 उत्तरे
5 answers

टक्कल पडण्यावर उपाययोजना काय आहेत?

17
तुमचे केस गळत असतील आणि तुम्हांला टक्कल पडत असेल तर घाबरू नका. तुम्हाला आम्ही असे काही उपाय सांगणार आहे त्याने तुमची केस गळती थांबेल.

१. तुमचा खुराक चांगला असला पाहिजे. चांगले केस चांगल्या तब्येतीवर सजलेले दिसतात. प्रोट्रीनयुक्त अन्न खा. दूध, मासे, पनीर खा
२. ओल्या केसांना रगडून पुसू नका. केस सुकल्यानंतर त्यावर कंगवा फिरवा.
३. केसांना तेलाने मसाज करा. मसाज करताना बोटे डोक्याच्या पृष्ठभागावर रगडा, केसांवर नको.
४. पातळ केस असल्यास ऑलिव्ह तेल वापरा. तसेच मोहरीच्या (सरसो) तेलात मेथी गरम करून लावल्यास लाभ होतो.
५. तेल सामान्य तापमान किंवा गरम नसावे. कोमट असावे.
६. कांद्याचा रस लावा. अर्धा तासानंतर धुऊन टाका. यामुळे डोक्याची तब्येत चांगली होतील.
7. शिर्षासन करा.शिर्षासनाने तुमच्या केसांना रक्तपुरवठा चांगला होतो.
8. मुल्तानी माती लावा. केसांचं टेकश्चर चांगलं होण्यास मदत होते. केसांची चमक वाढते.
9. आवळा आणि शिकाकायी लोखंडाच्या कढईत भिजत घाला. दोन दिवसांनी ते काढूण वाटून घ्या. त्यातील बिया काढून टाका. त्यात दही आणि मेंहंदी घाला. ते डोक्याला लावा आणि नंतर चार तासांनी धुवून काढा.
10. कंडिशनिंग आणि डैंड्रफ दूर करण्यासाठी दही लावा.
11. खोट्या जाहिरातींना बळी पडू नका. चांगले प्रोड्क्टस वापरा.
12. बाबा रामदेवच्या म्हणण्यानुसार हातांची नखे एकमेकांवर घासा.
13. व्हिटॅमिन ई गोळ्या घेऊ शकता. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
14. केस कधी कधी धुतल्यावर ते कमीच गळतात अशा भ्रमात राहू नका. अस्वच्छ केस जास्त त्रासदायक ठरतात.

15. डोकंवर करून आणि पद्धतशीर चाला. घाम जास्त आला तर तो सुकण्याची वाट बघु नका ओल्या कपड्याने तो पुसून टाका.
16. अळशीच्या बिया खा.
17. गरम पाण्यात टॉवेल भिजवून तो डोक्यावर ठेवा.
18. केसांमधून सतत हात फिरवू नये.
19. केसांना नेहमी  फणीने विंचरले पाहीजे.
20. जास्त गरम पाण्याने केस धुवू नये.
उत्तर लिहिले · 20/10/2018
कर्म · 569245
17
केस गळत आहे, टक्कल पडतंय आणि अनेक उपाय करूनही फायदा मिळत नाहीये तर हे तेल आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे. याने टक्कल पडलेल्या जागेवरही नवे केस येतील आणि केस दाट होतील. पाहू कसं तयार करायचं हे तेल..

हे तेल तयार करण्यासाठी आपल्याला 5 वस्तूंची गरज आहे ज्या सहजपणे उपलब्ध असतात.

 

1. लसणाच्या पाकळ्या: 6 ते 7

2. ताजा चिरलेला आवळा: 2 ते 3

3. चिरलेला कांदा: 1 लहान

4. एरंडेल तेल: 3 चमचे

5. नारळाचे तेल: 4 चमचे


ह्या पाची वस्तू मिसळून आपण तेल तयार करू शकता:

 

कृती- सर्वात आधी एका वाटीत नारळाचे तेल आणि एरंडेल तेल मिळवून घ्या. आता यात कापलेला लसूण, कांदा आणि आवळा टाका. हे मिश्रण मंद आचेवर 5 मिनिट शिजवून घ्या. आता आचेवर काढून किमान 1 तास हे मिश्रण असंच राहू घ्या.

हे तेल नियमितपणे केसांना लावल्याने, केसांचे गळणे कमी होईल आणि गळलेल्या केसांमुळे डोक्यावरील त्वचा दिसायला लागलीत असेल तर तिथेही नवे केस येतील. याव्यतिरिक्त केसांमध्ये दाटपणा येईल. तर वेळ करू नका, तयार करा आणि ह्या केसांना नवीन जीवन.

उत्तर लिहिले · 22/3/2018
कर्म · 458560
0
टक्कल पडण्याची समस्या कमी करण्यासाठी काही उपाययोजना खालीलप्रमाणे आहेत:
  • आहार:

    प्रथिने (proteins) आणि लोह (iron) युक्त आहार घ्या. यामुळे केसांची वाढ सुधारते.

  • तेल मालिश:

    नियमितपणे तेल मालिश केल्याने रक्त परिसंचरण सुधारते आणि केसांच्या मुळांना पोषण मिळते.

  • औषधे:

    डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मिनोक्सिडिल (Minoxidil) आणि फिनास्टेराइड (Finasteride) सारखी औषधे वापरता येतात.

  • केस प्रत्यारोपण (Hair transplant):

    टक्कल पडलेल्या भागावर शस्त्रक्रियेने केस प्रत्यारोपण करता येते.

  • लेझर थेरपी (Laser therapy):

    या उपचारामध्ये लेझर किरणांचा वापर करून केसांच्या वाढीला उत्तेजन दिले जाते.

  • तणाव व्यवस्थापन:

    तणाव कमी करण्यासाठी योग आणि ध्यान करा.

हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने टक्कल पडण्याची समस्या कमी करता येते.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1440

Related Questions

माझे वय 24 आहे, माझे केस खूप गळत आहेत, काय करावे?
केस गळती वर काही घरगुती upay?
माझ्या आईचे केस पांढरे झाले आहेत आणि गळत आहेत, तर त्याच्यावर काय उपचार केला जाईल?
माझे वय 15 वर्ष आहे, माझे केस सफेद होत आहेत, मी काय करू?
3 वर्षाच्या मुलीच्या केसात कोंडा झाला आहे, उपाय सांगा?
माझे टक्कल पडले आहे आणि माझे वय २७ वर्ष आहे, तरी मी केस येण्यासाठी काय करावे? केसासाठी नॅट्रोलिफाय रिगेन हे टैबलेट कसे राहतील घेण्यासाठी?
केसगळती कशी थांबवावी?