शब्दाचा अर्थ आयुर्वेद औषधी

त्रिफळा चूर्ण म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

त्रिफळा चूर्ण म्हणजे काय?

14
त्रिफळा चूर्ण म्हणजे हिरडा, बेहडा, आवळा अश्या तीन वस्तूंच्या एकत्रिकरणाने केलेली  पावडर...
कोठा साफ ठेवणे, पचन सुधारणे हा उद्देश असतो....
कोमट पाण्याबरोबर घ्यायचे असते...

त्रिफळा चूर्ण सेवन करण्याची पद्धत : शारीरिक स्वास्थ्यासाठी त्रिफळा चूर्ण दैनंदिन जीवनात नित्य वापरता येते. सर्वसाधारणपणे रात्री झोपतांना एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
तुम्ही तुमच्या प्रकृती, वयानुसार या प्रमाणात बदल करू शकता.

1. कृमीची समस्या नष्ट होते
त्रिफळा चुर्णाचे सेवन केल्याने पोटात कृमी (जंत)ची समस्या नष्ट होऊ शकते. शरीरामध्ये रिंगवॉर्म(खरुज) किंवा टेपवॉर्म (बद्धकोष्ठता) झाल्यास त्रिफळा रामबाण उपाय आहे. त्रिफळा, शरीरातील रक्त कोशिका वाढवते, ज्यामुळे इन्फेक्शनशी लढण्याची क्षमता वाढते.

2. श्वसनाशी संबंधित समस्या
श्वसनाशी संबधित आजारांमध्ये त्रिफळा लाभदायक ठरते. याचे सेवन केल्याने श्वास घेण्यात येणारी अडचणी दूर होते.

3. कॅन्सरमध्ये लाभदायक
एका संशोधनानुसार त्रिफळा औषधीने कॅन्सरवर उपचार शक्य आहे. यामध्ये अँटी-कॅन्सर तत्त्व आढळून आले आहेत. त्रिफळाच्या सेवनाने शरीरातील कॅन्सर कोशिकांच्या विकासाला कमी केले जाऊ शकते.

4. डायबिटीवजर रामबाण औषध
डायबिटीज उपचारामध्ये त्रिफळा अत्यंत उपयुक्त औषध आहे. हे पेनक्रीयाजला उत्तेजित करण्याचे काम करते, ज्यामुळे इन्सुलिन निर्माण होते. शरीरात इन्सुलिनची योग्य मात्रा साखरेचा स्तर कायम ठेवण्यात मदत करते.

5. डोकेदुखीमध्ये प्रभावी
जर एखाद्या व्यक्तीला डोकेदुखीची समस्या जास्त प्रमाणात असेल तर डॉक्टरी सल्ल्याने त्रिफळाचे नियमित सेवन करावे. त्रिफळा डोकेदुखी कमी करण्यात सक्षम आहे. डोकेदुखी विशेषतः मेटाबॉलिक गडबडीमुळे होते. याचे सेवन केल्याने ही समस्या नष्टे होते.

6. अ‍ॅनिमियावर प्रभावी ठरते
शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यास अ‍ॅनिमिया रोगाची उत्पत्ती होते. या रोगामध्ये शरीर पिवळे पडते. रुग्णाला चक्कर येते. असे हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे घडते. शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास त्रिफळाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. यामुळे शरीरातील ब्लड सेल्स वाढतात आणि अॅनिमिया आजाराची समस्या दूर होते.

7. पचनक्रियेची समस्या दूर होते
पाचन समस्या दूर करण्यासाठी त्रिफळा रामबाण उपाय आहे. आतड्यांशी संबंधित समस्या त्रिफळा चूर्णाचे सेवन केल्याने दूर होऊ शकतात. याचे सेवन आतड्यातील पित्त रस बाहेर काढतो. पित्तामुळे अपचनाची समस्या निर्माण होते.

8. वजन कमी करण्यात सक्षम
ज्या लोकांना कमी वयातच लठ्ठपणाचा त्रास जाणवत असेल त्यांच्यासाठी त्रिफळापेक्षा दुसरे चांगले औषध नाही. याचे नियमित सेवन केल्यास फॅट कमी होतो. त्रिफळा चूर्ण थेट फॅट कमी करण्याचे काम करते.

9. त्वचेच्या समस्या दूर होतात
कोणत्याही प्रकराची स्किन समस्या निर्माण झाल्यास त्रिफळा उपयुक्त ठरते. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढते आणि रक्त शुद्ध बनवते.

10. दीर्घकाळापर्यंत तरुण राहण्यासाठी
त्रिफळा चुर्णामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट असतात, जे सेल्सच्या मेटाबॉलिझमला नियमित ठेवतात. तसेच त्यांची प्रक्रिया कायम ठेवतात. त्रिफळाने वय वाढवणारे घटक कमी होतात, यामुळे याच्या सेवनाने वय कमी दिसते. त्रिफळा शरीरातील विविध सेल्सला नियमित रुपात चालवण्यास मदत करते, उदा. मायटोकॉन्ड्रिया, गाल्जी बॉडीज आणि न्युकल्स या तिन्ही सेल्सला योग्य पद्धतीने चालवण्याचे कार्य करते.

11. रोगप्रतिकारक क्षमता वाढवते
आयुर्वेदामध्ये त्रिफळा कायाकल्प करणारे औषध मानले जाते. हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. त्रिफळा, शरीरातील अँटीबॉडीचे उत्पादन वाढवते, जे शरीरातील किटाणूंशी लढते आणि बॉडीला बॅक्टीरिया मुक्त ठेवते. हे शरीरातील कोशिका वाढवण्याचे काम करते तसेच शरीराची रक्षा प्रणाली मजबूत ठेवते.

उत्तर लिहिले · 9/3/2018
कर्म · 458560
0

त्रिफळा चूर्ण हे तीन औषधी वनस्पतींचे मिश्रण आहे:

  • आवळा (Emblica officinalis): व्हिटॅमिन सी भरपूर असलेले फळ, रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि एंटीऑक्सिडेंट म्हणून कार्य करते.
  • बिभीतक (Terminalia bellirica): बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्यांवर उपयुक्त.
  • हरितकी (Terminalia chebula): आतड्यांसंबंधी समस्या कमी करते आणि डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करते.

हे मिश्रण पचन सुधारण्यास, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि शरीर शुद्ध करण्यास मदत करते.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 980

Related Questions

ताम्र भस्म चेहऱ्यासाठी वापरता येते का? चेहऱ्याच्या समस्या दूर होतात का?
मूळव्याध (Piles) साठी जाणकारांनी आयुर्वेदिक किंवा घरगुती उपाय सुचवावा? वय ५९
आयुर्वेदात कोणत्या गोष्टींचा विचार केला आहे?
शारंगधर संहिता कोणत्या विषयावर आधारित आहे?
प्रख्यात बौद्ध पंडित नागार्जुन यांनी नागार्जुन रस रत्नाकर बंगालमध्ये देवीच्या रोगावर काय उपाय सांगितले?
फायब्राईडवर आयुर्वेदिक हमखास उपचार आहेत काय? असल्यास पत्ता पाठवा.
Fibromyalgia वर आयुर्वेदिक उपचार कोणते आहे?