सौंदर्य घरगुती उपाय त्वचेचे विकार त्वचा काळजी

गोरे होण्यासाठी कुठली क्रीम वापरू?

5 उत्तरे
5 answers

गोरे होण्यासाठी कुठली क्रीम वापरू?

14
गोरे होण्यासाठी कोणतेही क्रीम नाही.स्वत:चा धंदा वाढण्यासाठी गोरे होण्यासाठी अमुक तमुक वापरा अशा जाहीराती सिनेमातील नट नट्याना दाखवून केल्या जातात.आपण गोरे दिसावे असे प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे.परंतु अशा मानसिकतेचा गैरफायदा घेऊन मोठमोठ्या कंपनी स्वत:ची तुंबडी भरतात.आणी अशा प्रकारे गोरे होण्याची लेखी हमी कोणी देते का?गोरे असण्यासाठी आवश्यक असणारे घटक वगैरे शरिरात असतील तरच मूळचा गोरेपणा जन्मत:च प्राप्त होत असतो.किवा असे घटक शरिरात निर्माण करता आले तरच ( उसना ) गोरेपणा मिळवता येऊ शकेल.नाहीतर नाटक सिनेमात "कलर गेला तर पैसे परत " एवढा काळेपणा असणाऱ्या नट नट्यांच्या चेहऱ्यावर पांढरा रंग फासून त्यांना गोरे करतात  त्याप्रमाणे (उसना ) गोरेपणा मिळवता येईल.पण तोंड धुतल्यावर परत जो मूळचा वर्ण आहे तोच येणार.थोडक्यात म्हणजे "आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार"? त्यामुळे गोरे बनण्याच्या नादान भलतेच नुकसान होऊ नये म्हणून फसव्या जाहीरातीना बळी न पडलेले बरे! गोरा रंग असणे म्हणजेच काही सर्वस्व नाही.नाव घेऊन सांगण्याची गरज नाही पण काळेपणातही नेत्रूत्त्व, बौधीकत्त्व, तसेच देवत्त्वही भरलेले असते.
उत्तर लिहिले · 2/3/2018
कर्म · 91085
4
महेंद्र सरांनी सांगितल्या प्रमाणे तुमच्या स्किन वर दिपेंड करत कोणती क्रीम लावायची ते

जर तुमची स्किन oily असेल तर तुम्ही facewash वापरा

जर डेड स्किन असेल तर moisturiser लावून स्कीन ची काळजी घ्या


गोर होण्यासाठी मेडिकल स्टोर मध्ये skinlite क्रीम येते
ती क्रीम 4 महिने दररोज लावावी लागते

त्याचा इफेक्ट नक्की दिसून येतो

पण ती क्रीम लावल्यावर भरपूर काळजी घ्यावी लागते

जसे की उन्हात ती क्रीम लावून गेल्यावर चेहरा आणखी काळा पडू शकतो

म्हणून भरपूर काळजी घ्यावी लागते

नाहीतर तुम्ही 15 दिवसातून एकदा scrub वापर नक्की फरक पडेल..
उत्तर लिहिले · 2/3/2018
कर्म · 38690
0
गोरे होण्यासाठी क्रीम वापरणे त्वचेसाठी हानिकारक असू शकते.

त्वचा गोरी करण्यासाठी क्रीम वापरण्याचे काही संभाव्य धोके:

  • त्वचेला ॲलर्जी (Allergy) होऊ शकते.
  • त्वचेवर पुरळ उठू शकतात.
  • त्वचा लाल होऊ शकते.
  • त्वचेला खाज येऊ शकते.
  • त्वचेचा रंग असमान होऊ शकतो.

नैसर्गिकरित्या त्वचा उजळ करण्यासाठी काही उपाय:

  • भरपूर पाणी प्या.
  • फळे आणि भाज्या खा.
  • नियमितपणे व्यायाम करा.
  • पुरेशी झोप घ्या.
  • धूप आणि प्रदूषण टाळा.

टीप:

जर तुम्हाला तुमच्या त्वचेबद्दल काही समस्या असतील, तर कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 2720

Related Questions

कशा मार्फत त्वचेला पोषक द्रव्ये मिळतात?
चॉकलेट मेन्स बी?
गोरा होण्यासाठी उपाय?
गोरा होण्यासाठी क्रीम?
चेहऱ्यावर पिंपल्स उठले आहेत तर काय करावे?
सुरम्यावर उपाय सांगा?
गोरे कसे होण्यासाठी काय करावे?