शब्दाचा अर्थ मृत्यू श्रद्धांजली

कोणी मेल्यावर RIP असं का लिहितात, त्याचा नेमका अर्थ काय आहे सांगू शकता का?

2 उत्तरे
2 answers

कोणी मेल्यावर RIP असं का लिहितात, त्याचा नेमका अर्थ काय आहे सांगू शकता का?

28
*Rest of Peace जाणुन घ्या*
====================

सध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी विद्वान-विदुषीसुध्दा या 'फॅशनचे बळी' आहेत. आपण काय *'भयानक'* लिहितोय किती 'विनाशकारी' बोलतोय याबद्दल कुणालाच कसे काही वाटत नाही ? जन्मापासूनच इंग्रजांचे गुलाम असलेल्यांनो तुमचा मृत्यूसुध्दा इंग्रजांचा गुलाम झालाय का ? तुम्हांला गाडतात की जाळतात ?

*कृपया हिंदू माणसाला, त्याच्या मृत्यूवर RIP लिहून श्रध्दांजली वाहू नका.* ज्यांना मृत्यूनंतर जमिनीत गाडले जाते त्या मुस्लिम, ख्रिश्चन धर्माच्या बांधवांत RIP म्हणण्याचा प्रघात आहे. RIP म्हणजे rest in peace. कृपया हिंदू माणसाच्या जाण्यावर असे लिहू नका.

*"जगात कुणीही असो एकदा तो वारला की त्याच्या धर्माप्रमाणे त्याच्यावर शेवटची कर्मे करणे हा त्या 'जाणाऱ्याचा' हक्क आहे."* हे कुणाचे उदगार आहेत ? ठावूक आहे ?

छत्रपती शिवरायांनी अफझल खानाचा कोथळा काढला तेव्हा मेलेल्या अफझल्याच्या देहाला मावळे जाळायला निघाले. अशावेळी शिवरायांनी विरोध केला. अफझल खान मेला तेव्हा त्याची दुश्मनी संपली. आता हा देह एका मुसलमानाचा आहे. त्याच्या मृत शरीराला जाळून त्याची विटंबणा करू नका अशी महाराजांनी सर्वांना समज दिली. मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे छत्रपतींनी अफझल खानाला जमीनीत गाडून त्यावर त्याची मुस्लिम परंपरेप्रमाणे कबर बांधली. छत्रपती शिवराय म्हणत *"प्रत्येक मृत शरीराला त्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे विदाई दिली जावी हा प्रत्येक मृताचा हक्क आहे"* मात्र आपण हे काय करतो आहोत ?

*REST IN PEACE म्हणजे *'शांतपणे पडून रहा.'*  हे मृतात्म्या तुझ्या शरीराला आम्ही जमीनीत 'गाडले' आहे तेव्हा कयामत दिवशी उपरवाला तुझा न्याय करेल.. तर आता तू जमीनीत शांतपणे पडून कयामतच्या दिवसाची वाट पहा.... हे असे का म्हणतात कारण 'गाडणारे' कुणीच पुनर्जन्म मानत नाहीत. कयामतपर्यंत मेलेल्याची... गाडलेल्या जागेतून सुटका नाही असे त्यांचा धर्म सांगतो.

फरक नीट समजून घ्या. हिंदूधर्मात मृत व्यक्तीला गाडत नाहीत. जाळतात. या जन्मातून जाळून आत्मा मुक्त करतात. पुनर्जन्मासाठी. हिंदू त्याला RIP कसे म्हणतील? कारण आत्मा सदगतीस गेला असे आपल्या धर्मात म्हणतात. आत्मा मुक्त झाला. पुढला जन्म प्रवास त्याचा नीट होवो असे म्हणावे. हिंदू आत्मा कोंडून, बांधून, गाडून ठेवत नाहीत... मुक्त करतात. मेलेल्या व्यक्तीने पुढला जन्म घ्यावा म्हणून. पण इतर धर्म जे 'गाडतात' ते मृतात्माला 'जमीनीत शांत पडून रहा' सांगतात. कयामतपर्यंत तुझी सुटका नाही सांगतात.

*हिंदूंनी यासाठी गरूड पुराण वाचावे जे 'मृत्यू' संदर्भात आहे. ते वाचाल तर RIP म्हणायची हिंमत करणार नाही हिंदू.*

हिंदूने 'भावपूर्ण श्रध्दांजली' म्हणावे. देव मृतात्म्यास सदगती देवो म्हणावे. म्हणजे .. ही जी व्यक्ती वारली आहे ती पुण्यगतीस पावावी. त्यांचा पुढील जन्म घेण्याचा प्रवास निर्विघ्न पार पडो. एवढेच कशाला ? एखादा सज्जन, पुण्यवान हिंदू मरतो तेव्हा देवाने त्यांना वारंवार जन्म मरणाचा; पुनर्जन्माचा फेरा न देता 'मोक्ष' द्यावा अशीही प्रार्थना करता येते.

RIP लिहीणे ही आपल्या स्वधर्मीय मृताची 'विटंबना' आहे हे लक्षात घ्या. सावध व्हा. सावध करा. आणि हिंदू माणसाच्या मरणावर RIP लिहायला 'विरोध' करा. *कृपया मेलेल्या हिंदू माणसाला त्याच्या मृत्यूनंतर RIP लिहून, बोलून 'बाटवू' नका. ही हात जोडून कळकळीची विनंती !!!!!!!*
================
उत्तर लिहिले · 25/2/2018
कर्म · 19415
0
sure, here's the information you requested.

जेव्हा कोणी व्यक्ती मरण पावते, तेव्हा RIP असं लिहितात. RIP म्हणजे "Rest in Peace" (रेस्ट इन पीस) ह्या शब्दांचे संक्षिप्त रूप आहे.

RIP चा अर्थ:

  • Rest: आराम करणे किंवा शांत होणे.
  • in: मध्ये.
  • Peace: शांती.

त्यामुळे RIP चा अर्थ 'आत्म्याला शांती मिळो' किंवा 'मृत व्यक्तीला शांती मिळो' असा होतो. ही एक प्रार्थना आहे, जी मृतात्म्याला श्रद्धांजली देण्यासाठी वापरली जाते.

RIP चा वापर विशेषतः ख्रिश्चन धर्मात केला जातो, पण आता तो इतर धर्मांमध्ये आणि लोकांमध्येही सामान्य झाला आहे.

हे शब्द मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी व्यक्त केले जातात.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1040

Related Questions

मरण म्हणजे नेमकं काय होतं?
माणूस मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी सावडण्याचा कार्यक्रम असतो, तिथून घरी आल्यानंतर आंघोळ करावी का?
जगात असे काय आहे, जे करण्यापासून सर्वजण घाबरतात?
मृत्यू आणि महानिर्वाण यात काय साम्य आहे?
मृत्यू म्हणजे नेमकं काय?
मृत्यू आणि महानिर्वाण या शब्दांमधील सारखेपणा आणि वेगळेपणा कोणता आहे? सविस्तर लिहा.
मुत्यू आणि महानिर्वाण?