Topic icon

श्रद्धांजली

0
भावपूर्ण श्रद्धांजलीचा फॉरमॅट (Format) खालीलप्रमाणे:

!! भावपूर्ण श्रद्धांजली !!

आदरणीय [व्यक्तीचे नाव] यांच्या निधनाने [क्षेत्र] मध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

शोकसंदेश:

[व्यक्तीचे नाव] हे [त्यांचे तुमच्याशी असलेले नाते] होते. ते एक [त्यांचे गुण/विशेषता] होते. त्यांच्या जाण्याने [परिणाम] झाले आहे.

उदाहरण:

कै. [व्यक्तीचे नाव] हे माझे [नाते] होते. ते एक [दयाळू/मनमिळाऊ] स्वभावाचे होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दुःखाच्या या प्रसंगी आम्ही [शोक व्यक्त करणारे/कुटुंब] [मृताच्या कुटुंबियांसोबत] आहोत.

|| ॐ शांती: शांती: शांती: ||

शोककर्ते:

  • [कुटुंबातील सदस्यांची नावे]
  • [इतर नातेवाईक आणि मित्र]

टीप:

आपण आपल्या सोयीनुसार आणि गरजेनुसार या फॉरमॅटमध्ये बदल करू शकता.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1040
1
RIP शब्द का अर्थ होता है "Rest in Peace" (शांती से आराम करो).
उत्तर लिहिले · 19/8/2018
कर्म · 4295
18
जर मृत व्यक्तीवर आपली श्रद्धा असेल तर वाहिली जाते ती श्रद्धांजली आणि जर मृत व्यक्तीचा आपण आदर करत असू, तर वाहतात ती आदरांजली. यात महत्त्वाचे हे की, ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे, त्यांचा आपण आदर करतोच, यात काही वाद नाही. पण ज्यांचा आदर करतो, त्यांच्यावर आपली श्रद्धा असेलच असे नाही. उदाहरणार्थ, आपण डोनाल्ड साहेबांचा आदर करतो, पण आपण त्यांच्यावर श्रद्धा नाही ठेवू शकत.
उत्तर लिहिले · 14/8/2018
कर्म · 17995
2
यासंबंधी याआधी एक उत्तर दिले होते.
खाली क्लिक करा.
हिंदू मध्ये मृत व्यक्तीस श्रद्धांजली वाहताना RIP लिहिणे योग्य आहे का?
उत्तर लिहिले · 30/3/2018
कर्म · 85195
16
नाही, हिंदू मध्ये मृत व्यक्तीस श्रद्धांजली वाहताना RIP लिहिणे योग्य नाही.

कारण RIP या शब्दाचा उपयोग "रेस्ट इन पीस" म्हणजे "शांततेत विश्रांती" असा केला जातो, ज्याचा वापर कबरमध्ये दफन असलेल्या लोकांसाठी केला जातो. कारण ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्मश्रद्धा यांच्यानुसार जेव्हा "ज्युपिटर डे" किंवा "न्यायाचा दिवस" ​​येईल तेव्हा सर्व मृत लोक पुनरुत्थित होतील.

परंतु हिंदू धर्माच्या विश्वासांनुसार, शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे, म्हणून हिंदू शरीर जळला आहे, त्यामुळे "शांततेत विश्रांती" प्रश्न उद्भवत नाही. हिंदू धर्माच्या मते, माणसाच्या मृत्यूनंतर, आत्मा बाहेर पडते आणि दुसर्या नव्या शरीरात प्रवेश करते, नवजात शिशु मध्ये आत्माप्रवेशाच्या प्रवासाला गती देण्यासाठी श्रद्धा कर्माची परंपरा चालवली जाते आणि शांततेचे आयोजन केले जाते. म्हणून हिंदू व्यक्तीच्या मृत्यू नंतर "विनम्र श्रद्धांजली", "श्रद्धांजली", "आत्म्याला शांती" द्यावी.

म्हणजेच मुस्लिम/ख्रिश्चन कुटुंबातील मृत्यूनंतर त्यांच्यासाठी " RIP " म्हणून लिहीले जाऊ शकतात, हिंदू मध्ये नाही.

धन्यवाद.
उत्तर लिहिले · 27/2/2018
कर्म · 85195
28
*Rest of Peace जाणुन घ्या*
====================

सध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी विद्वान-विदुषीसुध्दा या 'फॅशनचे बळी' आहेत. आपण काय *'भयानक'* लिहितोय किती 'विनाशकारी' बोलतोय याबद्दल कुणालाच कसे काही वाटत नाही ? जन्मापासूनच इंग्रजांचे गुलाम असलेल्यांनो तुमचा मृत्यूसुध्दा इंग्रजांचा गुलाम झालाय का ? तुम्हांला गाडतात की जाळतात ?

*कृपया हिंदू माणसाला, त्याच्या मृत्यूवर RIP लिहून श्रध्दांजली वाहू नका.* ज्यांना मृत्यूनंतर जमिनीत गाडले जाते त्या मुस्लिम, ख्रिश्चन धर्माच्या बांधवांत RIP म्हणण्याचा प्रघात आहे. RIP म्हणजे rest in peace. कृपया हिंदू माणसाच्या जाण्यावर असे लिहू नका.

*"जगात कुणीही असो एकदा तो वारला की त्याच्या धर्माप्रमाणे त्याच्यावर शेवटची कर्मे करणे हा त्या 'जाणाऱ्याचा' हक्क आहे."* हे कुणाचे उदगार आहेत ? ठावूक आहे ?

छत्रपती शिवरायांनी अफझल खानाचा कोथळा काढला तेव्हा मेलेल्या अफझल्याच्या देहाला मावळे जाळायला निघाले. अशावेळी शिवरायांनी विरोध केला. अफझल खान मेला तेव्हा त्याची दुश्मनी संपली. आता हा देह एका मुसलमानाचा आहे. त्याच्या मृत शरीराला जाळून त्याची विटंबणा करू नका अशी महाराजांनी सर्वांना समज दिली. मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे छत्रपतींनी अफझल खानाला जमीनीत गाडून त्यावर त्याची मुस्लिम परंपरेप्रमाणे कबर बांधली. छत्रपती शिवराय म्हणत *"प्रत्येक मृत शरीराला त्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे विदाई दिली जावी हा प्रत्येक मृताचा हक्क आहे"* मात्र आपण हे काय करतो आहोत ?

*REST IN PEACE म्हणजे *'शांतपणे पडून रहा.'*  हे मृतात्म्या तुझ्या शरीराला आम्ही जमीनीत 'गाडले' आहे तेव्हा कयामत दिवशी उपरवाला तुझा न्याय करेल.. तर आता तू जमीनीत शांतपणे पडून कयामतच्या दिवसाची वाट पहा.... हे असे का म्हणतात कारण 'गाडणारे' कुणीच पुनर्जन्म मानत नाहीत. कयामतपर्यंत मेलेल्याची... गाडलेल्या जागेतून सुटका नाही असे त्यांचा धर्म सांगतो.

फरक नीट समजून घ्या. हिंदूधर्मात मृत व्यक्तीला गाडत नाहीत. जाळतात. या जन्मातून जाळून आत्मा मुक्त करतात. पुनर्जन्मासाठी. हिंदू त्याला RIP कसे म्हणतील? कारण आत्मा सदगतीस गेला असे आपल्या धर्मात म्हणतात. आत्मा मुक्त झाला. पुढला जन्म प्रवास त्याचा नीट होवो असे म्हणावे. हिंदू आत्मा कोंडून, बांधून, गाडून ठेवत नाहीत... मुक्त करतात. मेलेल्या व्यक्तीने पुढला जन्म घ्यावा म्हणून. पण इतर धर्म जे 'गाडतात' ते मृतात्माला 'जमीनीत शांत पडून रहा' सांगतात. कयामतपर्यंत तुझी सुटका नाही सांगतात.

*हिंदूंनी यासाठी गरूड पुराण वाचावे जे 'मृत्यू' संदर्भात आहे. ते वाचाल तर RIP म्हणायची हिंमत करणार नाही हिंदू.*

हिंदूने 'भावपूर्ण श्रध्दांजली' म्हणावे. देव मृतात्म्यास सदगती देवो म्हणावे. म्हणजे .. ही जी व्यक्ती वारली आहे ती पुण्यगतीस पावावी. त्यांचा पुढील जन्म घेण्याचा प्रवास निर्विघ्न पार पडो. एवढेच कशाला ? एखादा सज्जन, पुण्यवान हिंदू मरतो तेव्हा देवाने त्यांना वारंवार जन्म मरणाचा; पुनर्जन्माचा फेरा न देता 'मोक्ष' द्यावा अशीही प्रार्थना करता येते.

RIP लिहीणे ही आपल्या स्वधर्मीय मृताची 'विटंबना' आहे हे लक्षात घ्या. सावध व्हा. सावध करा. आणि हिंदू माणसाच्या मरणावर RIP लिहायला 'विरोध' करा. *कृपया मेलेल्या हिंदू माणसाला त्याच्या मृत्यूनंतर RIP लिहून, बोलून 'बाटवू' नका. ही हात जोडून कळकळीची विनंती !!!!!!!*
================
उत्तर लिहिले · 25/2/2018
कर्म · 19415
7
एखाद्या व्यक्ती मृत्यु पावतो तेव्हा त्याच्या आसपासची वावरणारी म्हणजेच त्यांना ओळखणारी, त्यांचे नातेवाईक आप्तेष्ट हे सर्व जण त्या मृत्यु पावलेल्या व्यक्तीच्या आत्म्यास शांती मिळू देत..अश्याप्रकारे मनापासून भावुक होऊन प्रार्थना करणे अर्थात श्रद्धाजंली वाहून शोक संदेश देतात...
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
यास भावपूर्ण श्रद्धांजली संबोधले जाते....
उत्तर लिहिले · 27/11/2017
कर्म · 458560