शब्दाचा अर्थ तत्त्वज्ञान मृत्यू

मृत्यू म्हणजे नेमकं काय?

2 उत्तरे
2 answers

मृत्यू म्हणजे नेमकं काय?

1

मृत्यू
मृत्यू म्हणजे जीवित प्राण्याच्या शरीरातील त्या सर्व जैविक क्रियांचा अंत ज्या त्याला जिवंत राहण्यास मदत करतात. मृत्यूनंतर शरीराचे कार्य थांबते व प्राणी निष्क्रिय होतो. मृत्यूनंतर शरीराचे हळूहळू विघटन होण्यास सुरुवात होते. जन्म झालेल्या प्रत्येक जीवाला मृत्यू अपरिहार्य आहे.


परम सत्य मृत्यू*
मृत्यू तर नियती आहे. कितीही टाळला तरी तो येणारच आहे. अस थोडच आहे की तुम्ही ऐंशी वर्षाच्या झालात आणि लगेच मेलात? तर नाही ऐंशी वर्षापर्यंत मृत्यू तुमच्या आसपास फिरत असतो. तुमच्या शरीरामध्ये असतो, तुमचा शरीराबरोबर, वयाबरोबर तोही मोठा होत असतो. आणि एक दिवस तुम्हाला पूर्णपणे घेरून तुमच. जीवन संपवून टाकतो. मृत्यु तर धर्मच आहे शरीराचा. जन्म आणि मृत्यू कोणत्याही सजीवाच्या आयुष्यरुपी नाण्याच्या दोन बाजू आहेत.

एखाद्याचा मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते? या प्रश्नाचे तीन दृष्टिकोनांतून विश्लेषण करता येते. :- वैद्यकीय दृष्टिकोनातून, धार्मिक दृष्टिकोनातून आणि तिसरे आध्यात्मिक दृष्टिकोनातून.

वैद्यकीय दृष्टिकोन

’शरीरान्तर्गत सर्व क्रिया बंद पडणे म्हणजे मृत्यू’ अशी ढोबळ व्याख्या करता येते. श्वासोच्छ्‌वास बंद होणे, नाडीचे व हृदयाचे ठोके बंद पडणे, दृष्टी स्थिर होणे, शरीरावरील केस ताठ होणे, शरीराचे तापमान घसरणे व शरीर थंड पडायला लागणे, संपूर्ण मेंदूच्या प्रक्रिया थांबणे, शरीर कुजायला सुरुवात होणे आणि बाह्य जगताशी संपर्क कायमचा तुटणे ही मृत्यूची लक्षणे समजली जातात.

मृत्यूनंतर काही तास शरीरातील पेशी त्यांच्या आंतरिक प्रक्रियेमुळे स्वतंत्रपणे जिवंत राहतात. म्हणूनच मृत्युपश्चात अवयवांचे दान करता येते, आणि दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात ते अवयव बसवता येतात. हे मृत शरीरातले अवयव जिवंत असले तरी तरी त्यांत चेतना वा जाणीव नसते. उदाहरणार्थ मृत्यूनंतर सात-आठ तास डोळ्यांच्या पेशी जरी जिवंत असल्या तरी जाणिवेच्या अभावी बघण्याचे कार्य मात्र घडत नसते. मृत्यूनंतर पचनक्रियाही काही वेळ चालू असते. शरीर कुजण्याची क्रिया मृत्यूनंतर काही तासांनी सुरू होते.

हृदयक्रिया बंद पडणे या लक्षणापेक्षा मेंदू बंद पडणे हे मृत्यूचे सर्वमान्य लक्षण आहे. त्यामुळेच हृदयक्रिया बंद पडलेल्या आणि डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या व्यक्ती, त्यांचे मेंदू बंद पडलेले नसल्याने काही तासांनी जिवंत झाल्याची उदाहरणे आहेत.

मृत्यूची काटेकोर कायदेशीर व्याख्या अजूनही सर्वमान्य झालेली नाही.

 
उत्तर लिहिले · 3/7/2022
कर्म · 53750
0

मृत्यू म्हणजे काय, हा एक गहन आणि गुंतागुंतीचा प्रश्न आहे. याचे उत्तर अनेक दृष्टीकोनातून दिले जाऊ शकते, जसे की जैविक, तात्विक, धार्मिक आणि सामाजिक.


जैविक दृष्टिकोन:

मृत्यू म्हणजे जीवनावश्यक कार्ये थांबणे. श्वासोच्छ्वास, रक्ताभिसरण आणि मेंदूची क्रिया बंद पडल्याने शरीर निष्क्रिय होते. पेशी आणि ऊती हळूहळू खराब होऊ लागतात.


तात्विक दृष्टिकोन:

मृत्यू म्हणजे अस्तित्वाचा शेवट. 'मी' असण्याची जाणीव नाहीशी होणे. जीवन आणि मृत्यू हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असा विचार अनेक तत्वज्ञानी करतात.


धार्मिक दृष्टिकोन:

वेगवेगळ्या धर्मांमध्ये मृत्यूबाबत वेगवेगळी धारणा आहे. काही धर्म पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात, तर काही स्वर्ग आणि नरक या कल्पनांवर आधारलेले आहेत.


सामाजिक दृष्टिकोन:

मृत्यू ही एक सामाजिक घटना आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूने कुटुंबावर आणि समाजावर परिणाम होतो.


मृत्यू एक अटळ सत्य आहे आणि प्रत्येकाला त्याचा सामना करावा लागतो.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2040

Related Questions

विभूती ही नेहमीच प्रतिमारूप असते म्हणजे काय?
आशयाचा वास्तववाद ही संकल्पना स्पष्ट करा?
बुद्धीवाद आणि अनुभववाद यातील फरक स्पष्ट करा?
किंFormatError: Invalid argument(s)वा ची व्याख्या लिहा?
आपल्याला गौतम बुद्ध आणि स्वामी विवेकानंद यांच्यात काय साम्य आढळते?
आपले शरीर पंचतत्त्वांनी बनले असेल, तर आपली ओळख काय? आपण कोण आहोत?
मार्क्स प्रणित परमात्म्याची संकल्पना स्पष्ट करा?