कर्ज सरकारी योजना अर्थ कर्ज योजना

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना काय आहे?

2 उत्तरे
2 answers

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना काय आहे?

5
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना दिनांक २७/११/१९९८ रोजी केलेली आहे.

राज्यात आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकाचा आर्थिक विकास करणे आवश्यक आहे. त्याकरिता विशेष करून या घटकातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता राज्यशासनाने दिनांक २९ ऑगस्ट १९९८ रोजी निर्णय घेतला व या निर्णयास अनुसरून राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सुरु करून त्यामार्फत स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबतची माहिती, मार्गदर्शन, व आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे.

उद्दिष्टे
१)आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांनपर्यत पोहचून त्यांना सक्षम बनविणे.
२)योजना राबवून रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
३)आर्थिकदृष्ट्या मागासघटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे.

अर्जदारास रु. ५ लाखांपर्यंत प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायांकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. या मध्ये राष्ट्रीयकृत / अधिसूचित बँकेचा सहभाग ६०% असून अर्जदारास ५% रक्कम स्वतःचा सहभाग म्हणून भरावयाची आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी मंजूर केलेल्या प्रकल्प रक्कमेच्या ३५% रक्कम महामंडळामार्फत बीज भांडवल म्हणून देण्यात येते.

महामंडळाच्या मंजूर रक्कमेवर द.सा.द.शे. ४% व्याज आकारण्यात येते. परत फेडीचा कमाल कालावधी ५ वर्षाचा असून त्यासाठी वसुली ही मासिक / त्रैमासिक / सहामाही / वार्षिक प्रमाणे करण्यात येते.
उत्तर लिहिले · 12/2/2018
कर्म · 210095
0

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना ही महाराष्ट्र सरकारची मराठा समाजातील तरुणांसाठी असलेली एक योजना आहे. या योजनेअंतर्गत, मराठा समाजातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विद्यमान व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

या योजनेची काही वैशिष्ट्ये:
  • उद्देश: मराठा समाजातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे.
  • कर्जाची रक्कम: वैयक्तिक कर्ज योजनेत जास्तीत जास्त रु. 15 लाख पर्यंत कर्ज मिळू शकते. गट प्रकल्प कर्ज योजनेत, प्रति लाभार्थी रु. 15 लाख याप्रमाणे जास्तीत जास्त रु. 45 लाख पर्यंत कर्ज मिळू शकते.
  • व्याज दर: व्याज दर बँकेनुसार बदलू शकतात.
  • पात्रता: मराठा समाजातील १८ ते ५० वर्षे वयोगटातील व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत.
  • आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, पॅन कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल आणि इतर आवश्यक कागदपत्रे लागतात.
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 2520

Related Questions

मुद्रा योजनेबद्दल सविस्तर माहिती लिहा?
स्टॅन्ड अप इंडिया योजनेनुसार कोणाला कर्ज दिले जाते?
वसंतराव नाईक महामंडळाकडून कर्ज योजनेबद्दल माहिती मिळेल का?
अपंग कर्ज योजना माहिती द्या?
मुद्रा योजनेचा लाभ कोणी घेतला आहे का?
जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेबद्दल माहिती मिळेल का?
शेतीचे साहित्य घेण्यासाठी काही कर्ज योजना आहेत का?