2 उत्तरे
2 answers

अपंग कर्ज योजना माहिती द्या?

5
 अंपग कर्ज योजना माहिती  ‼*

https://m.facebook.com/story.php?story_fbid=939238589807398&id=100011637976439
♿ योजनेचे नाव-मुदत कर्ज योजना(लहानवमध्यमव्यवसायासाठी)

▪️योजनेचा प्रकार
राष्ट्रीय अपंग वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली या  राष्ट्रीय महामंडळाची योजना.

▪️प्रकल्पमर्यादा :  रुपये ५ लाखापर्यंत

▪️व्याजदर (वार्षिक):       रुपये५०,०००/- पर्यंत५%

रुपये५०,०००/- वरील६%

▪️▪️स्त्री लाभार्थींना१% सुटअनुज्ञेय आहे .

तसेचअंध, मुकबधीर व मतीमंद प्रवर्गासाठी व्याजदरात०.५% टक्के सुटअनुज्ञेयआहे.

▪️परतफेडीचा कालावधी:      ५वर्षे

▪️लाभार्थीचा सहभाग  :     ५% (एकलक्षावरीलकर्जप्रकरणाकरीता)

▪️योजनेचा  उददेश
या योजने अंतर्गत अपंग व्यक्ती कोणताही लघुउद्योग, प्रक्रिया उद्योग, वस्तू उत्पादन उद्योग, गृहउद्योग करू शकतो.
▪️योजनेच्या  प्रमुख अटी
लाभार्थी किमान ४०% अपंगत्व असलेला असावा.
❗लाभार्थी किमान १५ वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
❗लाभार्थ्याचे वय १८ ते ६० वर्षे असावे.
❗लाभार्थी कोणत्याही बॅंकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
❗अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा.
❗कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील.
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगांवची पोस्ट
▪️अर्ज  करण्याची  पध्दत▪️
राज्यातील सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत या महामंडळाचे कामकाज पाहण्यात येते. विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावा.
▪️संपर्क  कार्यालयाचे  नाव
https://sjsa.maharashtra.gov.in/mr/maharashtra-state-handicapped-finance-and-development-corporation-mr
▪️संपर्क
💧पुणे
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
बंगला क्र.६ आवार, जिल्हा हिवताप कार्यालयाच्यामागे,
इमारत क्र. डी, शासकीय वसाहत,
येरवडा जेल रोड, येरवडा, जिल्हा-पुणे - ४११००६
020-26612504
💧सातारा
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
६२, पालकर बिल्डिंग, २ रा मजला, मल्हार पेठ,
जिल्हा-सातारा-४१५ ००१
02162-239984

💧सांगली
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
जुना बुधगांव रोड, संभाजी नगर
जिल्हा- सांगली-४१६ ५१६.
0233-2321513

💧सोलापूर
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
७ वा रस्ता, उपलप मंगल कार्यालयाजवळ,
जिल्हा- सोलापूर - ४१३००१
0217-2312595

💧कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
३ रा मजला,खोली क्र.१, विचारे माळ,
कावळा नाका (ताराराणी चौक),
डॉ.बाबर हॉस्पिटल जवळ, जिल्हा- कोल्हापुर-४१६ ००३
0231-2653512



0

अपंग कर्ज योजना माहिती

अपंग व्यक्तींसाठी अनेक कर्ज योजना उपलब्ध आहेत, ज्या त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा त्यांच्याexisting व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मदत करतात. या योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे चालवल्या जातात.

काही महत्वाच्या योजना:

  1. राष्ट्रीय अपंग वित्त आणि विकास महामंडळ (NHFDC):
    • NHFDC अपंग व्यक्तींना व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज देते.
    • शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी देखील कर्ज उपलब्ध आहे.
    • अधिक माहितीसाठी NHFDC च्या वेबसाइटला भेट द्या: NHFDC
  2. राज्य सरकार योजना:
    • प्रत्येक राज्य सरकार अपंग व्यक्तींसाठी वेगवेगळ्या कर्ज योजना चालवते.
    • उदाहरणार्थ, महाराष्ट्र सरकार अपंग व्यक्तींसाठी विशेष कर्ज योजना राबवते.
    • या योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या राज्याच्या समाज कल्याण विभागाच्या वेबसाइटला भेट द्या.
  3. प्रधानमंत्री मुद्रा योजना:
    • ही योजना लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी आहे, ज्यामध्ये अपंग व्यक्ती देखील अर्ज करू शकतात.
    • मुद्रा योजनेअंतर्गत, शिशु, किशोर आणि तरुण अशा तीन प्रकारच्या कर्जांची तरतूद आहे.
    • अधिक माहितीसाठी मुद्रा योजनेच्या वेबसाइटला भेट द्या: मुद्रा योजना

कर्जासाठी पात्रता:

  • अर्जदार अपंग असावा.
  • वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.
  • अर्जदाराकडे वैध अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने कोणताही बँक डिफॉल्ट केलेला नसावा.

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • अपंगत्व प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • पत्त्याचा पुरावा
  • व्यवसाय योजना (Business plan)
  • बँक खाते विवरण

टीप: कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी, योजनेच्या अटी व शर्ती आणि व्याजदर तपासा.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2520

Related Questions

मुद्रा योजनेबद्दल सविस्तर माहिती लिहा?
स्टॅन्ड अप इंडिया योजनेनुसार कोणाला कर्ज दिले जाते?
वसंतराव नाईक महामंडळाकडून कर्ज योजनेबद्दल माहिती मिळेल का?
मुद्रा योजनेचा लाभ कोणी घेतला आहे का?
जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेबद्दल माहिती मिळेल का?
शेतीचे साहित्य घेण्यासाठी काही कर्ज योजना आहेत का?
59 मिनिटांमध्ये 1 कोटी लोन ही केंद्र शासनाची योजना काय आहे आणि त्याच्या अटी काय आहेत?