शेती पशुपालन कृषी जलकृषी

हायड्रोपोनिक चारा तयार करण्यासाठी सविस्तर माहिती मिळेल काय?

2 उत्तरे
2 answers

हायड्रोपोनिक चारा तयार करण्यासाठी सविस्तर माहिती मिळेल काय?

3


      हायड्रोपोनिक्‍स तंत्राद्वारे उत्पादित केलेला हिरवा चारा हा पारंपारिक पद्धतीने तयार केलेल्या हिरव्या चाऱ्यापेक्षा सकस असतो. चाराटंचाई परिस्थितीत कमी खर्चामध्ये हिरवा चारा निर्मितीचा हा चांगला पर्याय आहे.

01) हायड्रोपोनिक्‍स चारा तयार करण्यासाठी बांबू, ताट्या, प्लॅस्टिक ट्रे, 50 टक्के क्षमतेचे शेडनेट, मिनी स्प्रिंकलर किंवा फॉगर सिस्टिम व टायमर यांची गरज असते.
02) या साधनसामग्रीचा वापर करून 72 स्क्वेअर फूट जागेत बसेल असा 25 फूट x 10 फूट x 10 फूट आकाराचा सांगाडा अवघ्या 15 हजार रुपये खर्चात तयार होतो.
03) यामध्ये प्रकाश, तापमान, आर्द्रता आणि पाण्याचे नियंत्रण करून दररोज 100 ते 125 किलो पौष्टिक हिरवा चारा तयार करता येतो.
04) चारा तयार करण्यासाठी मका, गहू, बाजरी, बार्ली याचा वापर केला जातो. धान्याला ई.एम.च्या द्रावणात बीजप्रक्रिया करावी लागते.
05) हे धान्य 12 तास भिजत ठेवून, 24 तास गोणपाटात अंधाऱ्या खोलीत ठेवावे.
06) त्यानंतर प्लॅस्टिक ट्रेमध्ये (३ फूट x 2 फूट x ३ इंच ) साधारणतः 1.5 ते 1.75 किलो बी पसरावे.
07) अशा प्रकारे प्रतिदुभत्या जनावरांना दहा ट्रे या प्रमाणे जनावरांच्या संख्येवरून ट्रेची संख्या ठरवावी.
08) हे प्लॅस्टिक ट्रे हायड्रोपोनिक चारा निर्मिती गृहात सात ते आठ दिवस ठेवावेत.
09) एक इंची विद्युत मोटारीला लॅटरलची जोड देऊन फॉगर पद्धतीद्वारे प्रत्येक दोन तासाला पाच मिनिटे याप्रमाणे दिवसातून सात वेळा पाणी द्यावे. एका दिवसासाठी 200 लिटर पाणी लागते. ही यंत्रणा स्वयंचलित आहे. पाण्याची टाकी उंच ठिकाणी ठेवल्यास सायफन पद्धतीने विद्युत मोटारीच्या वापराने हायड्रोपोनिक्‍स चाऱ्यास पाणी देता येते.
10) चाऱ्याची 7 ते 8 दिवसांत 20 ते 25 सें.मी. उंचीपर्यंत वाढ होते. साधारणपणे एक किलो गव्हापासून नऊ किलो, तर एक किलो मक्‍यापासून 10 किलो हिरवा चारा तयार होतो.

चारा देण्याचे प्रमाण :

    01) भाकड जनावरे 6 किलो प्रतिदिवस प्रतिजनावर.
    02) दुभती जनावरे 15 किलो प्रतिदिवस प्रतिजनावर.

हायड्रोपोनिक्‍स चाऱ्याचे फायदे :

    01) चारा टंचाई परिस्थितीत हिरवा चारा निर्मितीचा चांगला पर्याय.
    02) कमी जागेत, कमी पाण्यात, कमी कालावधीत, स्वस्तात हिरवा पौष्टिक चारानिर्मिती.
    03) जनावरांना 90 टक्के चारा पचतो.
    04) पशुखाद्याचा खर्च 40 टक्के कमी.
    05) जनावरांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ.
    06) दुधाच्या फॅटमध्ये वाढ. किमान अर्धा लिटरने दुधात वाढ.
    07) जनावरांची प्रजनन क्षमता सक्षम होते.
    08) जनावरांच्या शरीरात प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वाच्या उपलब्धतेत वाढ.
    09) जमिनीवर चारा उत्पादन घेण्याच्या तुलनेत 5 ते 10 टक्के पाण्याची आवश्‍यकता आहे.
    10) प्रथिने, जीवनसत्त्वे, अँटीऑक्‍सिडंट्‌स, फॉलिक ऍसिड, ओमेगा-३, स्निग्ध पदार्थ हरितद्रव्य मोठ्या प्रमाणात असतात.
उत्तर लिहिले · 7/1/2018
कर्म · 210095
0
हायड्रोपोनिक चारा (Hydroponic Fodder) तयार करण्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:

हायड्रोपोनिक चारा म्हणजे मातीचा वापर न करता फक्त पाण्यात पोषक तत्वे (nutrients) मिसळून चारा पिकवणे.

आवश्यक गोष्टी:
  • बियाणे (Seeds): मका, बाजरी, गहू किंवा इतर धान्यांचे बियाणे.
  • ट्रे (Tray): बियाणे वाढवण्यासाठी ट्रे.
  • पाणी: स्वच्छ पाणी.
  • पोषक तत्वे (Nutrients): आवश्यक पोषक तत्वांचे मिश्रण.
  • सिंचन प्रणाली (Irrigation system): पाण्याची फवारणी करण्यासाठी स्प्रे पंप किंवा ऑटोमॅटिक सिंचन प्रणाली.
प्रक्रिया:
  1. बियाणे निवड: चांगल्या प्रतीचे आणि लवकर वाढणारे बियाणे निवडा.
  2. बियाणे धुणे: बियाणे स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घ्या.
  3. भिजवणे: बियाणे 8-12 तास पाण्यात भिजत ठेवा.
  4. ट्रे मध्ये पसरवणे: ट्रे मध्ये बियाणे समान रीतीने पसरवा.
  5. सिंचन: दिवसातून 2-3 वेळा पाण्याची फवारणी करा.
  6. पोषक तत्वे: आवश्यकतेनुसार पाण्यात पोषक तत्वे मिसळून फवारणी करा.
  7. वाढ: 7-8 दिवसात चारा तयार होतो.
हायड्रोपोनिक चाऱ्याचे फायदे:
  • कमी जागेत जास्त उत्पादन.
  • कमी वेळेत चारा तयार होतो.
  • पाण्याची बचत होते.
  • पौष्टिक आणि आरोग्यदायी चारा मिळतो.
अधिक माहितीसाठी काही उपयुक्त संकेतस्थळे:
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 5300

Related Questions

हायड्रोफोनिक चाऱ्याबद्दल माहिती हवी आहे, त्यासाठी कुठली योजना आहे काय?
हायड्रोपोनिक शेती विषयी माहिती मिळेल का?
हायड्रोपोनिक चारा निर्मिती कशी करावी?
नमस्कार, हायड्रोपोनिक चारा म्हणजे काय आणि त्याचे उत्पादन कसे करावे?