जलकृषी
0
Answer link
हायड्रोफोनिक चारा (Hydroponic Fodder)
हायड्रोफोनिक चारा म्हणजे मातीशिवाय फक्त पाण्यात पोषक तत्वे वापरून चारा वाढवणे. यात जनावरांसाठी मक्का, गहू, बाजरी, आणि इतर धान्यांचा चारा तयार केला जातो.
फायदे
- पाण्याची बचत होते.
- कमी जागेत जास्त उत्पादन.
- कमी वेळ लागतो.
- पौष्टिक आणि जनावरांसाठी आरोग्यदायी.
योजना
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत हायड्रोफोनिक चारा निर्मितीसाठी योजना आहेत. या योजनेत शेतकऱ्यांना हायड्रोफोनिक चारा युनिट (Hydroponic fodder unit) उभारण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
अधिक माहितीसाठी
- तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील कृषी विभाग किंवा पशुसंवर्धन कार्यालयात संपर्क साधा.
- महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वेबसाइटला भेट द्या: krishi.maharashtra.gov.in
3
Answer link
हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे उत्पादित केलेला हिरवा चारा हा पारंपारिक पद्धतीने तयार केलेल्या हिरव्या चाऱ्यापेक्षा सकस असतो. चाराटंचाई परिस्थितीत कमी खर्चामध्ये हिरवा चारा निर्मितीचा हा चांगला पर्याय आहे.
01) हायड्रोपोनिक्स चारा तयार करण्यासाठी बांबू, ताट्या, प्लॅस्टिक ट्रे, 50 टक्के क्षमतेचे शेडनेट, मिनी स्प्रिंकलर किंवा फॉगर सिस्टिम व टायमर यांची गरज असते.
02) या साधनसामग्रीचा वापर करून 72 स्क्वेअर फूट जागेत बसेल असा 25 फूट x 10 फूट x 10 फूट आकाराचा सांगाडा अवघ्या 15 हजार रुपये खर्चात तयार होतो.
03) यामध्ये प्रकाश, तापमान, आर्द्रता आणि पाण्याचे नियंत्रण करून दररोज 100 ते 125 किलो पौष्टिक हिरवा चारा तयार करता येतो.
04) चारा तयार करण्यासाठी मका, गहू, बाजरी, बार्ली याचा वापर केला जातो. धान्याला ई.एम.च्या द्रावणात बीजप्रक्रिया करावी लागते.
05) हे धान्य 12 तास भिजत ठेवून, 24 तास गोणपाटात अंधाऱ्या खोलीत ठेवावे.
06) त्यानंतर प्लॅस्टिक ट्रेमध्ये (३ फूट x 2 फूट x ३ इंच ) साधारणतः 1.5 ते 1.75 किलो बी पसरावे.
07) अशा प्रकारे प्रतिदुभत्या जनावरांना दहा ट्रे या प्रमाणे जनावरांच्या संख्येवरून ट्रेची संख्या ठरवावी.
08) हे प्लॅस्टिक ट्रे हायड्रोपोनिक चारा निर्मिती गृहात सात ते आठ दिवस ठेवावेत.
09) एक इंची विद्युत मोटारीला लॅटरलची जोड देऊन फॉगर पद्धतीद्वारे प्रत्येक दोन तासाला पाच मिनिटे याप्रमाणे दिवसातून सात वेळा पाणी द्यावे. एका दिवसासाठी 200 लिटर पाणी लागते. ही यंत्रणा स्वयंचलित आहे. पाण्याची टाकी उंच ठिकाणी ठेवल्यास सायफन पद्धतीने विद्युत मोटारीच्या वापराने हायड्रोपोनिक्स चाऱ्यास पाणी देता येते.
10) चाऱ्याची 7 ते 8 दिवसांत 20 ते 25 सें.मी. उंचीपर्यंत वाढ होते. साधारणपणे एक किलो गव्हापासून नऊ किलो, तर एक किलो मक्यापासून 10 किलो हिरवा चारा तयार होतो.
चारा देण्याचे प्रमाण :
01) भाकड जनावरे 6 किलो प्रतिदिवस प्रतिजनावर.
02) दुभती जनावरे 15 किलो प्रतिदिवस प्रतिजनावर.
हायड्रोपोनिक्स चाऱ्याचे फायदे :
01) चारा टंचाई परिस्थितीत हिरवा चारा निर्मितीचा चांगला पर्याय.
02) कमी जागेत, कमी पाण्यात, कमी कालावधीत, स्वस्तात हिरवा पौष्टिक चारानिर्मिती.
03) जनावरांना 90 टक्के चारा पचतो.
04) पशुखाद्याचा खर्च 40 टक्के कमी.
05) जनावरांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ.
06) दुधाच्या फॅटमध्ये वाढ. किमान अर्धा लिटरने दुधात वाढ.
07) जनावरांची प्रजनन क्षमता सक्षम होते.
08) जनावरांच्या शरीरात प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वाच्या उपलब्धतेत वाढ.
09) जमिनीवर चारा उत्पादन घेण्याच्या तुलनेत 5 ते 10 टक्के पाण्याची आवश्यकता आहे.
10) प्रथिने, जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स, फॉलिक ऍसिड, ओमेगा-३, स्निग्ध पदार्थ हरितद्रव्य मोठ्या प्रमाणात असतात.
9
Answer link
पोषकद्रव्ये आणि पाणी यांचा वापर करून मातीच्या वापराशिवाय रोपटे वाढविण्याची ही पद्धत आहे.
यात पाण्याचा पुरवठा थेट रोपट्याच्या मुळाशी केला जातो.
हिरव्या चाऱ्यासाठीचे वरदान – हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान
बदलते हवामान आणि पाण्याची कमतरता यामुळे जनावरांना १२ महिने दर्जेदार चारा उपलब्ध करून देणे हि समस्या ठरू लागली आहे. पण आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास या समस्येवर तोडगा निघू शकतो. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामुळे हे शक्य आहे. पारंपारिक पद्धतीपेक्षा या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी वेळेत सकस चारा उपलब्ध होऊ शकतो. मुळात या तंत्रज्ञानाने चारा तयार केल्यास खर्च आणि वेळ दोन्ही गोष्टी नियंत्रणात राहतात.
हायड्रोपोनिक्स चारा म्हणजे काय?
हायड्रोपोनिक्स चारा म्हणजे मातीशिवाय मका, गहू, बाजरी, ज्वारी, बार्ली किंवा तत्सम पिकांपासून हायड्रोपोनिक्स तंत्राचा वापर करून कमी जागेत व कमी पाण्याच्या मदतीने हिरवा चारा निर्माण करणे. हायड्रोपोनिक्स चारा तयार करण्यासाठी हायड्रोपोनिक्स यंत्र (हरितगृह) चारापिके ( मका,गहू,बाजरी, इत्यादी), प्लास्टिक ट्रे (साधारण ३ x २ फूट) पाणी देण्याची यंत्रणा(मिनी स्पिंकलर किंवा ऑगर सिस्टम व टाईमर) ची आवश्यकता असते. या पद्धतीत फक्त ७ ते ८ दिवसात (20 ते 25 से. मी. उंचीचा) चारा तयार होतो. साधारण ५० चौ. फूट जागेत एक वर्षात ३६ हजार ५०० किलो चारा तयार होतो. यासाठी वर्षाला ३६ हजार ५०० लिटर पाणी लागते. जनावरांच्या गोठ्याजवळ युनिट असल्यास खर्च अत्यल्प होऊ शकतो. या तंत्रज्ञानाअंतर्गत चारा निर्मिती करताना कमी मजूर लागतात तसेच मशागतीची आवश्यकता भासत नसल्यामुळे लागवडीवर कमी खर्च होतो. ट्रेमध्ये पाण्याचा वापर करून चारापिक घेणे शक्य असल्यामुळे कमी जागेत अशाप्रकारे चारा निर्मिती करणे शक्य होते. यामुळे शेत जमिनीवर इतर नगदी पिक घेणे शक्य होते.
हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती:
हायड्रोपोनिक्स चारायंत्र हे परदेशी बनावटीचे व महागडे असल्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना परवडणारे नाही. परंतु ते भारतीय बनावटीनुसार उपलब्ध साधन – सामग्रीचा (बांबू, तट्ट्या, प्लास्टिक ट्रे, ५० टक्के शेडनेट व प्लास्टिक ट्रे यांचा वापर करून साधारण ७२ चौ. फूट जागेत बसतील अशा २५ x १० x १० फूट अवघ्या १५ हजार रुपये खर्चात हे सांगाडा यंत्र तयार करता येते. याद्वारे दररोज १०० ते १२५ किलो पौष्टिक हिरवा चारा निर्मिती करता येते. यामध्ये प्रकाश, तापमान, आर्द्रता आणि पाण्याचे नियंत्रण करून जास्तीत जास्त हिरवा चारा उत्पादन घेतले जाते.
असा तयार करा हिरवा चारा :
१. चारा तयार करण्यासाठी मका, गहू, बाजरी, बार्ली इत्यादी वापर होतो. या धन्याला सोडीअम हायपोक्लोराईड किंवा ई.एम. च्या द्रावणात बीजप्रक्रिया करून घेतले जाते. नंतर हे धन्य १२ तास भिजत ठेवून, २४ तास तरटाच्या पोत्यात किंवा गोन्पातात अंध्र्या खोलीत ठेवले जाते.
२. त्यानंतर प्लास्टिक ट्रेमध्ये ( ३ x २ फूट x ३ इंच उंची) पसरून ठेवले जाते. प्रती दुभत्या १० ट्रे या प्रमाणे जानावरांच्या संख्येवरून ट्रे ची संख्या ठरवावी.
३. प्लास्टिक ट्रे हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती यंत्रात पुढील ७ ते ८ दिवस ठेवावेत. १ इंची विद्युत मोटारीला लॅटरलचे कनेक्शन देऊन फोंगर सिस्टीम द्वारे प्रत्येक न्दोन तासाला ५ मिनिटे या प्रमाणे दिवसातून ६ ते ७ वेळा पाणी दिले जाते. एकूण २०० लिटर पाणी दिवसभर वापरले जाते.
४. हि यंत्रणा स्वयंचलित आहे, पाण्याची टाकी उंच ठिकाणी ठेवल्यास सायफन पद्धतीने विद्युत मोटारीचा वापर न करता पाणी देता येते. फक्त पाण्यावरच या चाऱ्याची ७ ते ८ दिवसात २० ते २५ सें. मी. पर्यंत वाढ होते.
या पद्धतीचा अवलंब केल्यास जनावरांना चारा कसा उपलब्ध करून द्यावा हि चिंता कमी होईल. आणि दुभत्या जनावरांना १२ महिने चारा उपलब्ध होईल. गरज आहे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची.

☙हायड्रोपोनिक्स चारा म्हणजे काय?हायड्रोपोनिक्स 🌿चारा म्हणजे मातीशिवाय मका, गहू, बाजरी, ज्वारी, बार्ली किंवा तत्सम पिकांपासून हायड्रोपोनिक्स तंत्राचा वापर करून कमी जागेत व कमी पाण्याच्या मदतीने हिरवा चारा निर्माण करणे. 🌿हायड्रोपोनिक्स चारा तयार करण्यासाठी🌿 हायड्रोपोनिक्स यंत्र (हरितगृह) चारा पिके ( मका,गहू,बाजरी, इत्यादी), प्लास्टिक ट्रे (साधारण ३ x २ फूट) पाणी देण्याची यंत्रणा(मिनी स्पिंकलर किंवा ऑगर सिस्टम व टाईमर) ची आवश्यकता असते. या पद्धतीत फक्त ७ ते ८ दिवसात (२५ते ३० से. मी. उंचीचा) चारा तयार होतो. साधारण ५० चौ. फूट जागेत एक वर्षात ३६ हजार ५०० किलो चारा तयार होतो. यासाठी वर्षाला ३६ हजार ५०० लिटर पाणी लागते. जनावरांच्या गोठ्याजवळ युनिट असल्यासखर्च अत्यल्प होऊ शकतो. या तंत्रज्ञानाअंतर्गत चारा निर्मिती करताना कमी मजूर लागतात तसेच मशागतीची आवश्यकता भासत नसल्यामुळे लागवडीवर कमी खर्च होतो. ट्रेमध्ये पाण्याचा वापर करून चारापिक घेणे शक्य असल्यामुळे कमी जागेत अशाप्रकारे चारा निर्मिती करणे शक्य होते. यामुळे शेत जमिनीवर इतर नगदी पिक घेणे शक्य होते.हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती:हायड्रोपोनिक्स चारायंत्र हे परदेशी बनावटीचे व महागडे असल्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना परवडणारे नाही. परंतु ते भारतीय बनावटीनुसार उपलब्ध साधन – सामग्रीचा (बांबू, तट्ट्या, प्लास्टिक ट्रे, ५० टक्के शेडनेट व प्लास्टिक ट्रे यांचा वापर करून साधारण ७२ चौ. फूटजागेत बसतील अशा २५ x १० x १० फूट अवघ्या१५ हजार रुपये खर्चात हे सांगाडा यंत्रतयार करता येते. याद्वारे दररोज १०० ते १२५ किलो पौष्टिक हिरवा चारा निर्मिती करता येते. यामध्ये प्रकाश, तापमान, आर्द्रता आणि पाण्याचे नियंत्रण करून जास्तीत जास्त हिरवा चारा उत्पादन घेतले जाते.🌿
5