घरगुती उपाय
कपड्यांची काळजी
कपड्याला शाई लागली आहे, स्वच्छ कसा करावा ?
मूळ प्रश्न: पांढऱ्या शर्टवरील शाईचे डाग कसे काढावे?
नेलपॉलिश रिमूव्हर सोल्युशन वापरून शाईचे डाग तुम्ही घालवू शकता. तुमच्या जवळच्या जनरल स्टोअर मध्ये हे सोल्युशन मिळेल.
नेलपॉलिश रिमूव्हर चे सोल्युशन एखाद्या कापसाच्या बोळ्यावर घेऊन डाग साफ करावा. शाईचे डाग निघून गेल्यानंतर शर्ट धुवून टाकल्यास तुम्ही शर्ट पहिल्याप्रमाणे वापरू शकता.
1 उत्तर
1
answers
कपड्याला शाई लागली आहे, स्वच्छ कसा करावा ?
7
Answer link
आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काम करत
असतांना आपल्या कपड्यांवर काही ना काही
डाग पडतात. अशावेळी कपडे खराब होऊ नये म्हणून कोणती
काळजी घ्याल किंवा कोणते घरगुती उपाय
वापराल ते पाहा.
1)टूथपेस्ट : कपड्यांवर पडलेल्या डागावर टूथपेस्ट लावा
आणि ती सुखल्यानंतर कपडे कोणत्याही डिटर्जेंटनी
धुवा. डाग निघण्यास मदत होते.
2) नेल पॉलिश रिमूव्हर : कपड्यांवरील डाग
काढण्यासाठी देखील तुम्ही नेल पॉलिश
रिमूव्हरचा वापर करू शकता. रिमूव्हर लावून कपडा
पाण्याने धुवा.
3)मीठ : शाई जेव्हा ओली असते तेव्हाच त्यावर मीठ
लावून घासलं आणि पाण्याने धुतल्याने डाग निघून
जातात.
4)दूध : शर्टवर डाग पडल्यास त्याला रात्रभर दुधात
भिजत ठेवा. सकाळी डिटर्जेंटने स्वच्छ करून घ्या.
डाग निघून जातील.
4)सायकल ऑईलचे डाग – कपड्यावर पडलेले डाग
निलगिरी तेल लावून निघतात.
5)रक्ताचे डाग – रक्ताचा डाग पडलेला भाग दुधात
भिजवून ठेवल्यास डाग निघून जातात . किंवा
पाण्यात २ चमचे मीठ घालून ढवळावे व त्यात कपडा
भिजत ठेवावा नंतर धुवावा.
6)पानाचे डाग – कपड्यावर पानाचे डाग पडले तर,
लगेचच लिंबू कापून डागावर घसावेत स्वच्छ पाण्यात
धुवावेत.
7)गंजाचे डाग – लिंबू व दही एकत्र डागावर लावावे ,
नंतर धुवावे. जुन्या गंजाचे डाग असतील तर
ऑक्झॉलिक असिडने कोरडेच घसावे नंतर धुवावेत.
8)रंगाचे डाग – ग्रीस आणि व्हार्निसचे डाग
टर्पेंनटाईनने जातात.
9)कपड्यावरील डांबराचे डाग – प्रथम सुरीने
तासावे, टर्पेंनटाईन टाकावे व गरम पाण्यात धुवावे.
10)फळlचे डाग – डाळिंबाचे डाग – कुठल्याही
औषधाच्या गोळीची पावडर डागावर टाकून
पाण्याने घासणे नंतर धुणे.
11)औषधाचे डाग – ऑक्झॉलिक अॅंसिड घालून घासून
धुणे.
12) नेलपॉलिशचे डाग – अॅिसिटोन व पोटाशियम
परमॅंग्नेट घालुन घासणे.
गॅस स्टोव्ह (शेगडी) वरील तेलकट डाग – थोडेसे
विनेगार कपड्यावर घेवून त्याने पुसावे. नंतर स्वच्छ
धुवावे.
13)चहाच्या कपबश्या व किटलीवरचे डाग – विनेगार
घातलेल्या पाण्यात कपबश्या बुडवून ठेवा नंतर जुन्या
टूथब्रशनी घासाव्यात.
14)दरवाजे व खिडक्यांच्या कांचेच्या तावदानावरचे
डाग – चिखलाचे व धुळीचे डाग विनेगार पाण्यात
घालून पुसल्यास स्वच्छ होतात.
15)कपड्यावरील इस्त्रीचे डाग – डाग पडलेल्या
भागावर लिंबू कापून घासावे व धुवावे.