Topic icon

कपड्यांची काळजी

5
कपड्यावरील चहाचे डाग काढण्यासाठी, त्या डागावर रात्रभर ग्लिसरीन लावून ठेवावे आणि सकाळी थंड पाण्याने धुवावे.
उत्तर लिहिले · 15/2/2020
कर्म · 458560
4
  • 🥼 _*पांढऱ्या कपड्यांची चमक कायम ठेवण्यासाठी काही खास टिप्स!*_

👔 _पांढरा रंग जवळपास सर्वांनाच आवडतो आणि त्यात पांढऱ्या रंगाचे कपडे म्हटलं की त्यांची बातच और... पण अनेकदा पांढरे कपडे परिधान केल्यानंतर त्यांना खूप सांभाळावं लागतं म्हणून अनेकजण ते परिधान करणं किंवा शक्यतो ते खरेदी करणंच टाळतात. कारण फक्त वढचं नाही हा, अनेकदा या कपड्यांचा रंग पिवळा पडतो आणि त्यांची चमकही नाहीशी होते. त्यानंतर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरिही त्यांची चमक परत येत नाही. तुमचाही आवडता रंग पांढरा आहे तरी तुम्ही या रंगाचे कपडे खरेदी करणं टाळत असाल तर आम्ही तुम्हाला पांढऱ्या कपड्यांची चमक पुन्हा आणण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही पांढऱ्या कपड्यांची चमक आणि त्यांच्यावरील डाग दूर करू शकता._

👉 *पांढऱ्या कपड्यांची चमक पुन्हा आणण्यासाठी काही टिप्स :*
▪ पांढऱ्या कपड्यांची चमक कायम ठेवण्यासाठी एक बादली पाण्यामध्ये व्हिनेगरचे काही थेंब एकत्र करून त्यामध्ये कपडे 15 ते 20 मिनिटांसाठी भिजत ठेवा. यामुळे कपड्यांवर आलेला पिवळसरपणा दूर होण्यास मदत होते.

▪ कपडे 30 मिनिटांसाठी थंड पाण्यामध्ये भिजत ठेवून त्यानंतर त्यामध्ये ब्लीच पावडर एकत्र करा. या ब्लीच असलेल्या पाण्यामध्ये कपडे 15 मिनिटांपर्यंत भिजत ठेवा. या 15 मिनिटांमध्ये ब्लीच कपड्यांवर लागलेले डाग काढून टाकण्यास मदत करतं.

▪ पांढरे कपडे धुतल्यानंतर ते अर्ध्या बादली पाण्यामध्ये अर्धा लिंबाचा रस एकत्र करून काही वेळापर्यंत भिजत ठेवा. यामुळे पांढऱ्या कपड्यांची चमक परत येण्यास मदत होइल.

▪ पांढऱ्या कपड्यांना नेहमी रंगीत कपड्यांसोबत न धुता वेगळं धुवा. रंगीत कपड्यांसोबत पांढरे कपडे धुतल्याने ते पिवळे दिसू लागतात.

▪ कपड्यांचा रंग टिकवण्यासाठी ब्लीचिंग दरम्यान वॉशिंग सोडा आणि दुसऱ्या कोणत्याही डिटर्जंट पावडरचा वापर करू शकता. यामुळे कपड्यांचा रंग टिकून राहण्यास मदत होते.

▪ धुतल्यानंतर कपडे उन्हामध्ये सुकवा. त्यामुळे पांढऱ्या कपड्यांची चमक वाढण्यास मदत होते. तसेच कपड्यांवर पिवळसरपणा येत नाही.

*_👌घरगुती टिप्स : कपड्यांवरील डाग घालविणे_*


◼साडीवर तेलकट डाग पडल्यास त्या डागांवर टाल्कम पावडर चोळावी. एक दिवस तसेच ठेवावे नंतर धुवावे.

◼सायकल ऑईलचे डाग निलगिरी तेलाने निघतात.

◼ग्रीस किंवा वॉर्निशचे डाग टर्पेन्टाईलने जातात.

◼कपड्यावर पानाचे डाग पडले तर लगेचच लिंबू कापून डागावर घासावेत, स्वच्छ पाण्यात धुवावे.

◼कपड्यांवर पडलेल्या डागांवर टूथपेस्ट लावावी आणि ती सुकल्यावर कपडे डिटर्जंटने धुवावे. डाग निघण्यास मदत होते.

◼उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कपड्यांवर घामाचे पिवळसर डाग पडतात. लिंबाच्या रसाने हे डाग घालविता येतात. लिंबाचा रस या डागांवर 10 मिनिटे लावून ठेवावा मग नेहमीप्रमाणे कपडे धुवून टाकावेत.

◼कपड्यांवरचे हळदी डाग घालवण्यासाठी व्हिनेगर अथवा लिंबू लावा, किंवा कपडे धुण्याची कोरडी पावडर त्यावर लावून घासून काढा.

◼चहा, कॉफीचा पडलेला डाग प्रथम स्वच्छ धुवून घ्यावा मग जेथे डाग पडला आहे त्या भागावर बोरॅक्‍स पावडरची पेस्ट लावावी.

◼चिखलाचा डाग पडलेला भाग स्वच्छ धुवून घ्यावा मग डाग पडलेल्या भागावर कच्चा बटाटा लावून थोड्या वेळाने डाग धुवावा.

◼शाईचा डाग पडलेल्या भागावर लिंबू व मीठ चोळावे व मग डाग धुवून टाकावा.
उत्तर लिहिले · 9/3/2019
कर्म · 569225
0

कपड्यांना स्टार्च करण्यासाठी साधारणपणे तांदळाची पावडर किंवा कॉर्नस्टार्च (Cornstarch) वापरले जाते.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1040
0
शर्टवरील प्रिंट काढण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:

प्रिंट काढण्याचे उपाय:

  • ॲसिटोन (Acetone): ॲसिटोन हे प्रिंट काढण्यासाठी प्रभावी solvent आहे. परंतु, ते वापरण्यापूर्वी शर्टच्या एका लहान भागावर test करणे आवश्यक आहे, कारण ॲसिटोनमुळे काही कपड्यांचे रंग उडू शकतात.
  • कसे वापरावे:

    1. एका कापसाच्या बोळ्याला ॲसिटोन लावा आणि प्रिंटवर हळूवारपणे घासा.
    2. प्रिंट पूर्णपणे निघेपर्यंत हे करत राहा.
    3. नंतर शर्ट पाण्याने स्वच्छ धुवा.
  • इस्त्री (Iron): उष्णतेमुळे प्रिंट काढता येऊ शकते.
  • कसे वापरावे:

    1. शर्ट इस्त्री बोर्डवर ठेवा आणि प्रिंटच्या भागावर एक जाड कागद ठेवा.
    2. इस्त्री गरम करा आणि त्या कागदावरुन फिरवा. उष्णतेमुळे प्रिंट कागदाला चिकटून येईल.
    3. जर प्रिंट पूर्णपणे निघाली नाही, तर प्रक्रिया पुन्हा करा.
  • हेअर स्प्रे (Hair spray): हेअर स्प्रेमध्ये असलेले chemicals प्रिंट काढण्यास मदत करतात.
  • कसे वापरावे:

    1. प्रिंटवर हेअर स्प्रे मारा आणि 5-10 मिनिटे तसेच ठेवा.
    2. नंतर ओल्या कपड्याने प्रिंट हळूवारपणे पुसून टाका.
  • लिक्विड डिटर्जंट (Liquid detergent): काही वेळा लिक्विड डिटर्जंट वापरून प्रिंट काढता येते.
  • कसे वापरावे:

    1. प्रिंटवर लिक्विड डिटर्जंट टाका आणि 30 मिनिटे तसेच ठेवा.
    2. नंतर ब्रशने हळूवारपणे घासा आणि पाण्याने धुवा.

टीप: कोणतेही रसायन वापरण्यापूर्वी, शर्टच्या एका लपलेल्या भागावर त्याची चाचणी करा आणि त्यानंतरच मुख्य प्रिंटवर वापरा.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1040
7
आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काम करत
असतांना आपल्या कपड्यांवर काही ना काही
डाग पडतात. अशावेळी कपडे खराब होऊ नये म्हणून कोणती
काळजी घ्याल किंवा कोणते घरगुती उपाय
वापराल ते पाहा.
1)टूथपेस्ट : कपड्यांवर पडलेल्या डागावर टूथपेस्ट लावा
आणि ती सुखल्यानंतर कपडे कोणत्याही डिटर्जेंटनी
धुवा. डाग निघण्यास मदत होते.
2) नेल पॉलिश रिमूव्हर : कपड्यांवरील डाग
काढण्यासाठी देखील तुम्ही नेल पॉलिश
रिमूव्हरचा वापर करू शकता. रिमूव्हर लावून कपडा
पाण्याने धुवा.
3)मीठ : शाई जेव्हा ओली असते तेव्हाच त्यावर मीठ
लावून घासलं आणि पाण्याने धुतल्याने डाग निघून
जातात.
4)दूध : शर्टवर डाग पडल्यास त्याला रात्रभर दुधात
भिजत ठेवा. सकाळी डिटर्जेंटने स्वच्छ करून घ्या.
डाग निघून जातील.
4)सायकल ऑईलचे डाग – कपड्यावर पडलेले डाग
निलगिरी तेल लावून निघतात.
5)रक्ताचे डाग – रक्ताचा डाग पडलेला भाग दुधात
भिजवून ठेवल्यास डाग निघून जातात . किंवा
पाण्यात २ चमचे मीठ घालून ढवळावे व त्यात कपडा
भिजत ठेवावा नंतर धुवावा.
6)पानाचे डाग – कपड्यावर पानाचे डाग पडले तर,
लगेचच लिंबू कापून डागावर घसावेत स्वच्छ पाण्यात
धुवावेत.
7)गंजाचे डाग – लिंबू व दही एकत्र डागावर लावावे ,
नंतर धुवावे. जुन्या गंजाचे डाग असतील तर
ऑक्झॉलिक असिडने कोरडेच घसावे नंतर धुवावेत.
8)रंगाचे डाग – ग्रीस आणि व्हार्निसचे डाग
टर्पेंनटाईनने जातात.
9)कपड्यावरील डांबराचे डाग – प्रथम सुरीने
तासावे, टर्पेंनटाईन टाकावे व गरम पाण्यात धुवावे.
10)फळlचे डाग – डाळिंबाचे डाग – कुठल्याही
औषधाच्या गोळीची पावडर डागावर टाकून
पाण्याने घासणे नंतर धुणे.
11)औषधाचे डाग – ऑक्झॉलिक अॅंसिड घालून घासून
धुणे.
12) नेलपॉलिशचे डाग – अॅिसिटोन व पोटाशियम
परमॅंग्नेट घालुन घासणे.
गॅस स्टोव्ह (शेगडी) वरील तेलकट डाग – थोडेसे
विनेगार कपड्यावर घेवून त्याने पुसावे. नंतर स्वच्छ
धुवावे.
13)चहाच्या कपबश्या व किटलीवरचे डाग – विनेगार
घातलेल्या पाण्यात कपबश्या बुडवून ठेवा नंतर जुन्या
टूथब्रशनी घासाव्यात.
14)दरवाजे व खिडक्यांच्या कांचेच्या तावदानावरचे
डाग – चिखलाचे व धुळीचे डाग विनेगार पाण्यात
घालून पुसल्यास स्वच्छ होतात.
15)कपड्यावरील इस्त्रीचे डाग – डाग पडलेल्या
भागावर लिंबू कापून घासावे व धुवावे.
उत्तर लिहिले · 29/12/2017
कर्म · 11700
1
रिन निरमा पावडर भेटते ती घ्या व पाण्यात ती पावडर टाकून कपडे भिजु घाला आणि नंतर धुवा, डाग निघून जातील.
उत्तर लिहिले · 23/12/2017
कर्म · 13390