2 उत्तरे
2
answers
पांढऱ्या शुभ्र कपड्यांची चमक कायम ठेवण्यासाठी काय करावे?
4
Answer link
🥼 _*पांढऱ्या कपड्यांची चमक कायम ठेवण्यासाठी काही खास टिप्स!*_
👔 _पांढरा रंग जवळपास सर्वांनाच आवडतो आणि त्यात पांढऱ्या रंगाचे कपडे म्हटलं की त्यांची बातच और... पण अनेकदा पांढरे कपडे परिधान केल्यानंतर त्यांना खूप सांभाळावं लागतं म्हणून अनेकजण ते परिधान करणं किंवा शक्यतो ते खरेदी करणंच टाळतात. कारण फक्त वढचं नाही हा, अनेकदा या कपड्यांचा रंग पिवळा पडतो आणि त्यांची चमकही नाहीशी होते. त्यानंतर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरिही त्यांची चमक परत येत नाही. तुमचाही आवडता रंग पांढरा आहे तरी तुम्ही या रंगाचे कपडे खरेदी करणं टाळत असाल तर आम्ही तुम्हाला पांढऱ्या कपड्यांची चमक पुन्हा आणण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही पांढऱ्या कपड्यांची चमक आणि त्यांच्यावरील डाग दूर करू शकता._
👉 *पांढऱ्या कपड्यांची चमक पुन्हा आणण्यासाठी काही टिप्स :*
▪ पांढऱ्या कपड्यांची चमक कायम ठेवण्यासाठी एक बादली पाण्यामध्ये व्हिनेगरचे काही थेंब एकत्र करून त्यामध्ये कपडे 15 ते 20 मिनिटांसाठी भिजत ठेवा. यामुळे कपड्यांवर आलेला पिवळसरपणा दूर होण्यास मदत होते.
▪ कपडे 30 मिनिटांसाठी थंड पाण्यामध्ये भिजत ठेवून त्यानंतर त्यामध्ये ब्लीच पावडर एकत्र करा. या ब्लीच असलेल्या पाण्यामध्ये कपडे 15 मिनिटांपर्यंत भिजत ठेवा. या 15 मिनिटांमध्ये ब्लीच कपड्यांवर लागलेले डाग काढून टाकण्यास मदत करतं.
▪ पांढरे कपडे धुतल्यानंतर ते अर्ध्या बादली पाण्यामध्ये अर्धा लिंबाचा रस एकत्र करून काही वेळापर्यंत भिजत ठेवा. यामुळे पांढऱ्या कपड्यांची चमक परत येण्यास मदत होइल.
▪ पांढऱ्या कपड्यांना नेहमी रंगीत कपड्यांसोबत न धुता वेगळं धुवा. रंगीत कपड्यांसोबत पांढरे कपडे धुतल्याने ते पिवळे दिसू लागतात.
▪ कपड्यांचा रंग टिकवण्यासाठी ब्लीचिंग दरम्यान वॉशिंग सोडा आणि दुसऱ्या कोणत्याही डिटर्जंट पावडरचा वापर करू शकता. यामुळे कपड्यांचा रंग टिकून राहण्यास मदत होते.
▪ धुतल्यानंतर कपडे उन्हामध्ये सुकवा. त्यामुळे पांढऱ्या कपड्यांची चमक वाढण्यास मदत होते. तसेच कपड्यांवर पिवळसरपणा येत नाही.
*_👌घरगुती टिप्स : कपड्यांवरील डाग घालविणे_*
◼साडीवर तेलकट डाग पडल्यास त्या डागांवर टाल्कम पावडर चोळावी. एक दिवस तसेच ठेवावे नंतर धुवावे.
◼सायकल ऑईलचे डाग निलगिरी तेलाने निघतात.
◼ग्रीस किंवा वॉर्निशचे डाग टर्पेन्टाईलने जातात.
◼कपड्यावर पानाचे डाग पडले तर लगेचच लिंबू कापून डागावर घासावेत, स्वच्छ पाण्यात धुवावे.
◼कपड्यांवर पडलेल्या डागांवर टूथपेस्ट लावावी आणि ती सुकल्यावर कपडे डिटर्जंटने धुवावे. डाग निघण्यास मदत होते.
◼उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कपड्यांवर घामाचे पिवळसर डाग पडतात. लिंबाच्या रसाने हे डाग घालविता येतात. लिंबाचा रस या डागांवर 10 मिनिटे लावून ठेवावा मग नेहमीप्रमाणे कपडे धुवून टाकावेत.
◼कपड्यांवरचे हळदी डाग घालवण्यासाठी व्हिनेगर अथवा लिंबू लावा, किंवा कपडे धुण्याची कोरडी पावडर त्यावर लावून घासून काढा.
◼चहा, कॉफीचा पडलेला डाग प्रथम स्वच्छ धुवून घ्यावा मग जेथे डाग पडला आहे त्या भागावर बोरॅक्स पावडरची पेस्ट लावावी.
◼चिखलाचा डाग पडलेला भाग स्वच्छ धुवून घ्यावा मग डाग पडलेल्या भागावर कच्चा बटाटा लावून थोड्या वेळाने डाग धुवावा.
◼शाईचा डाग पडलेल्या भागावर लिंबू व मीठ चोळावे व मग डाग धुवून टाकावा.
0
Answer link
पांढऱ्या शुभ्र कपड्यांची चमक कायम ठेवण्यासाठी काही उपाय:
- कपडे धुण्यापूर्वी वेगळे करा: पांढरे कपडे इतर रंगांच्या कपड्यां सोबत धुवू नका.
या उपायांमुळे तुमच्या पांढऱ्या कपड्यांची चमक कायम राहण्यास मदत होईल.
अधिक माहितीसाठी: