2 उत्तरे
2
answers
गणित म्हणजे काय?
5
Answer link
मोजणी, संरचना, अवकाश आणि बदल या संकल्पनांवर आधारित असलेली आणि त्यांचा अभ्यास करणारी गणित ही ज्ञानाची एक शाखा आहे. गणित हे निरपवाद निष्कर्ष काढण्याचे शास्त्र आहे असे विद्वान मानतात. हे प्रतिमानांचे (पॅटर्न) शास्त्र असून संख्या, अवकाश, विज्ञान, संगणक, अमूर्त कल्पनाआणि अशाच काही तत्सम विषयांमध्ये गणिताच्या साह्याने प्रतिमाने शोधता येतात.
नवीन संकल्पना(थिअरी) मांडून तिला, तिच्यातील तथ्ये, मूळवाक्ये आणि व्याख्यांपासून कठोर तर्काद्वारे सिद्ध करण्यासाठी गणिती अशा संकल्पनेचा धांडोळा घेतात.
इतिहास ÷अमूर्तता आणि तर्क यांच्या वापराने मोजणी, आकडेमोड, मापन यांपासून भौतिक जगतातील आकार आणि कृती यांच्या शिस्तबद्ध अभ्यासातून गणितशास्त्र विकसित पावले. गणिताचे ज्ञान व वापर हा नेहेमीच व्यक्ती आणि समाज या दोन्ही पातळींवर जीवनाचा अविभाज्य भाग होता. मूळ कल्पनांचा विकास होतांना प्राचीन भारत, प्राचीन ग्रीस, इजिप्त, मेसोपोटॅमिया, प्राचीन चीन, इत्यादी संस्कृतींमध्ये सापडलेल्या गणितावरील ग्रंथांत दिसून येतो. पाश्चात्य इतिहासलेखकांना गणिताची कठोर तर्कट चालवण्याची पद्धत लिखित स्वरूपात युक्लिडच्या एलिमेंट्स या ग्रंथात सर्वप्रथम मिळाली. सोळाव्या शतकाच्या रेनैसन्स चळवळीच्या काळापर्यंत गणिताचा विकास कमी-अधिक मगदुराने झालेला दिसतो. रेनैसन्स ही एक बौद्धिक चळवळ होती. तिच्यात गणित आणि विज्ञानातील नवीन शोधांची सुयोग्य सांगड यशस्वीरीत्या घालण्यात आली होती. अशा चळवळीमुळे संशोधनाचा वेग वाढण्याचा घटनाक्रम आजवरही अबाधित राहिला आहे.
आज गणित हे विज्ञान, अभियांत्रिकी, औषधशास्त्र, तसेच अर्थशास्त्र आणि समाजशास्त्रासारख्या ज्ञानाच्या विविध शाखांमध्ये जगभर वापरले जाते. या शास्त्रात गणिताचा वापर करणारी गणिताचीच उपयोजित गणित ही शाखा नवीन गणिती शोधांना प्रेरणा देते आणि त्यांचा वापर करते. त्यामुळे ज्ञानाच्या सर्वस्वी नवीन शाखाही उदयास येतांत. कलेसाठी कला या न्यायाने केवळ गणितासाठी गणित अशा ध्येयाने शुद्ध गणिताचा अभ्यास करणारे गणितीही आहेत. अशा शुद्ध गणितातील शोधांचा कालांतराने उपयोजित गणितात वापर कसा करावा त्या पद्धतींचा शोध बहुधा लागतोच.
■व्युत्पत्ती°■
गणिताशी संबंधित Mathematics या इंग्रजी शब्दाची व्युत्पत्ती ग्रीक भाषेतून तर, मराठीतील गणित या शब्दाची व्युत्पत्ती "गण्" या संस्कृतधातूपासून झाली आहे.
◆इतिहास◆
गणिताविषयी एक संस्कृत श्लोक असा आहे :
यथा शिखा मयूराणां, नागानां मणयो यथा |
तथा वेदांगशास्त्राणां गणितं मूर्धनि स्थितम् ||
अर्थ: ज्याप्रमाणे मोराचा तुरा त्याच्या शरीराच्या सर्वात वर असतो त्याप्रमाणेच वेदांच्या सर्व अंगांपेक्षा गणित हे सर्वात वर(उच्च) आहे

0
Answer link
गणित हे एक अमूर्त आणि तार्किक प्रणाली आहे जी संख्या, आकार, रचना, अवकाश आणि बदलांचा अभ्यास करते.
गणितामध्ये, आपण नमुने शोधतो, संबंध प्रस्थापित करतो आणि अनुमान काढण्यासाठी तर्क वापरतो.
गणिताचा उपयोग विज्ञान, अभियांत्रिकी, अर्थशास्त्र आणि संगणक विज्ञान यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये समस्या सोडवण्यासाठी आणि मॉडेल बनवण्यासाठी होतो.
गणिताच्या काही प्रमुख शाखा:
- अंकगणित: संख्या आणि त्यांच्यावरील क्रियांचा अभ्यास.
- बीजगणित: चिन्हे आणि अक्षरे वापरून संबंध आणि समीकरणे व्यक्त करणे.
- भूमिती: आकार, आकारमान आणि अवकाशाचा अभ्यास.
- त्रिकोणमिती: त्रिकोणांचे गुणधर्म आणि बाजू यांच्यातील संबंधांचा अभ्यास.
- कलनशास्त्र: बदल आणि गतीशील प्रणालींचा अभ्यास.
- सांख्यिकी: डेटाचे विश्लेषण आणि अर्थ लावणे.
गणित हे केवळ आकडेमोड नाही, तर ते विचार करण्याचे एक साधन आहे. हे आपल्याला तार्किकदृष्ट्या विचार करण्यास, समस्यांचे विश्लेषण करण्यास आणि प्रभावीपणे तोडगा काढण्यास मदत करते.
अधिक माहितीसाठी: