3 उत्तरे
3 answers

आम्लपित्तासाठी काय उपाय आहे?

7
अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली, अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात. तीव्र डोकेदुखी, छातीत जळजळ, उलट्या होणे, अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात. मग पित्तावर उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली विविध रूपातील अँटासिड्‌स ही निष्फळ ठरतात. तेव्हा आजीच्या बटव्यातील हे काही घरगुती उपचार नक्कीच आजमावून पहा.

* आरामदायी केळं – केळातून शरीराला उच्च प्रतीच्या पोटॅशियमचा पुरवठा होतो. त्यामुळे पोटात अम्ल निर्मितीची प्रक्रिया मंदावते. तसेच ‘फायबर’ शरीराची पचनक्रिया सुलभ करते. फळांमधील काही विशिष्ट घटकांमुळे अम्लांच्या विघातक परिणामांपासून आपले रक्षण होते.
– पित्त झाल्यास पिकलेले केळ खाल्ल्याने आराम मिळतो. केळातील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करते व पित्ताचा त्रास कमी होतो.
* फायदेशीर तुळस – तुळशीमधील अँटीअल्सर घटक पोटातील/ जठरातील अम्लातून तयार होणार्‍या विषारी घटकांपासून बचाव करते.
– तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर ४-५ तुळशीची पाने चावून खा.
* अमृतरूपी दूध – दुधातील कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक अम्लनिर्मिती थांबते व अतिरिक्त अम्ल दूध खेचून त्याचे अस्तित्व संपवते. थंड दूध प्यायल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते.
– दूध हे पित्तशामक असून ते थंड तसेच त्यात साखर वा इतर पदार्थ न मिसळता प्यावे. मात्र त्याच चमचाभर तूप घातल्यास ते हितावह ठरते.
* बहुगुणी बडीशेप – बडीशेपमधील अँटी अल्सर घटक पचन सुधारते व बद्धकोष्ठता दूर करते. बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते.
– बडीशेपचे काही दाणे केवळ चघळल्यानेदेखील पित्ताची लक्षणे कमी होण्यास मदत होते. तसेच पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास बडीशेपचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी प्यायल्याने आराम मिळतो.
* पाचक जिरं – जिर्‍याच्या सेवनामुळे शरीरात काही लाळ निर्माण होते ज्यामुळे पचन सुधारते, चयापचय सुधारते आणि शरीरातील वायू वा गॅसचे विकार दूर होतात.
– जिर्‍याचे काही दाणे केवळ चघळल्यानेसुद्धा आराम मिळतो. किंवा जिर्‍याचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी थंड करून प्या.
* स्वादिष्ट आणि गुणकारी लवंग – लवंग चवीला तिखट असली तरीही लवंग अतिरिक्त लाळ खेचून घेते, पचन सुधारते आणि पित्ताची लक्षणं दूर करते. लवंगामुळे पोटफुगी व गॅसचे विकार दूर होतात.
– जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा. त्यातून येणारा रस काहीकाळ तोंडात राहू द्या. या रसामुळे पित्ताची तीव्रता कमी होते. लवंगेमुळे घशातील खवखवही कमी होते.
* औषधी वेलची – आयुर्वेदानुसार वेलची शरीरात वात, कफ व पित्त यांमध्ये समतोल राखण्याचे काम करते. स्वादाला सुगंधी व औषधी गुणांनी परिपूर्ण वेलचीच्या सेवनाने पचन सुधारते. पित्ताचा त्रास कमी होतो.
– पित्तापासून आराम मिळण्यासाठी वेलचीचे दोन दाणे ठेचून (सालीसकट/सालीशिवाय) ती पाण्यात टाकून उकळा. हे पाणी थंड झाल्यावर प्यायल्याने तात्काळ आराम मिळेल.
* वातहारक पदिना – पदिना पोटातील आम्लाची तीव्रता कमी करतो. पदिन्यातील वायूहारक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते. पदिन्यातील थंडाव्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते. पित्ताचा त्रास होत असल्यास काही पदिन्याची पाने कापा व पाण्यासोबत उकळा. थंड झाल्यावर हे पाणी प्या. अपचनावरही पदिना गुणकारी आहे. पदिन्यातील मेन्थॉल पचनास जड पदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास, डोकेदुखी तसेच सर्दी दूर करण्यास मदत करतो.
* आल्हाददायक आलं – आलं या औषधी मुळाचा भारतीय स्वयंपाकघरात प्रामुख्याने वापर केला जातो. आल्याच्या सेवनाने पचन सुधारते. तसेच पोटातील अल्सरशी सामना करण्यास आल्याचा फायदा होतो. आल्यातील तिखट व पाचकरसामुळे आम्लपित्त कमी होते.
– पित्तापासून आराम मिळण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत रहा. तुम्हाला जर आलं तिखट लागत असेल ते पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्या. किंवा तुम्ही आल्याचा तुकडा ठेचून त्यावर थोडा गुळ टाकून चघळत रहा.
* पित्तशामक आवळा – तुरट, आंबट चवीचा आवळा कफ आणि पित्तानाशक असून त्यातील विटामिन-‘सी’ अन्ननलिका व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. – रोज चमचाभर आवळ्याची पावडर/ चूर्ण घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही. कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व षड्‌रस मिळतात.

उत्तर लिहिले · 18/12/2017
कर्म · 458580
4

****** प्रतिबंधात्मक उपाय : 

* आपली दिनचर्या नियमित ठेवावी. 
* आपला स्वभाव रागीट तसंच खूप चिंता करणारा असा असल्यास त्यावर नियंत्रण आणावे. 
* व्यसनांपासून सदैव दूर राहावे. 
* उन्हात जाताना छत्री न्यावीच. 
* ज्यांना आम्लपित्ताचा त्रास नेहमी होतो अशांनी रोगाची कारणं शोधून ती टाळण्याचा प्रयत्न करणं हा प्रत्येक रोगाच्या उपचारामधील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, 
* काही उपचार हे तात्पुरता दिलासा देणारे असतात, तर काहींचे दुष्परिणामही (साइड इफेक्ट्स) असू शकतात. उदाहरणच द्यायचं तर सोडय़ाचं देता येईल. आम्लपित्ताचा त्रास होऊ लागला की रोग्यांना ‘सोडा’ पिण्याची सवय असते. सोडय़ामुळे वाढलेल्या पित्ताचं तात्पुरतं उदासीनीकरण होऊन तात्पुरतंच बरं वाटतं. पण ही सवय लावून घेणं चांगलं नाही. यापेक्षा अधिक पित्ताची निर्मिती होणं कसं टळेल, याकडेच अधिक लक्ष पुरविलं पाहिजे. 




***** घरगुती उपाय 

* पाणी प्या : पोटात दुखू लागलं किंवा खाल्ल्यावर त्रास होऊ लागला तर एक ग्लास कोमट पाणी प्यायलं पाहिजं. दिवसभरात कमीत कमी दहा ग्लास पाणी पोटात जाणं आवश्यक आहे. 
* आलं घातलेला चहा करून पिता येईल. कपभर चहात एक चमचा ताजं आलं घालून तो चहा घेणं फायद्याचं ठरतं. 
* छोटी दालचिनी किंवा २-३ वेलदोडे खाल्ल्याने पित्ताचा त्रास कमी होतो. 
जेवल्यानंतर लगेच झोपू नका : झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तास आधी जेवण झालं असलं पाहिजे. 
* ताजी चिरलेली मिंटची पानं गरम उकळत्या पाण्यात घालून काही वेळानंतर ते पाणी जेवणानंतर प्या. 
* लवंग चोखल्याने नैसर्गिकरित्या पित्त कमी होते. 
* जेवानंतर बडीशेप खाणं उत्तम. त्यात अनेक पाचक घटक असल्याने जेवणानंतरच्या सेवनाने अपचनाचा त्रास होत नाही. 
* आम्लपित्ताच्या रुग्णांनी आपल्या जेवणामध्ये साजूक तुपाचा वापर भरपूर प्रमाणात करावा. तूप हे उत्तम पित्तनाशक असल्याने त्याचा या ठिकाणी चांगला उपयोग होतो. 
* कारले, कडवे वाल, मेथीची भाजी या चवीला कडवट असणाऱ्या भाज्याही अधूनमधून खाणे चांगले असते. 
* साळीच्या लाह्या, मनुका, अंजीर, खडीसाखर हे पदार्थ सेवन करणे, 
* फळांमध्ये शहाळ्याचे पाणी, नारळाचे दूध, आवळा, डाळिंब, सफरचंद, केळे, ऊस यांना अधिक प्राधान्य देणे,
* उकळून गार (सामान्य तापमानाचे) पाणी पिणे, पाणी उकळताना त्यात चंदन, वाळा, अनंतमूळ वगैरे शीतल द्रव्ये टाकणे हेसुद्धा पित्त संतुलनास मदत करते. 
* तांदूळ, गहू, मूग ही धान्यं, दुधीभोपळा, पडवळ यांसारख्या भाज्या खाव्यात. 
भाज्यांमध्ये दुधी, तोंडली, घोसाळी, दोडका, भेंडी, कोहळा, पडवळ, परवर, चाकवत, पालक अशा पचायला हलक्‍या व शीतल स्वभावाच्या भाज्या निवडणे;
* भाज्या करताना जिरे, हळद, धणे, कोकम, मेथ्या, तमालपत्र वगैरे मसाल्याचे पदार्थ वापरणे, 
* हिरव्या मिरचीऐवजी शक्‍यतो लाल मिरची, आले वापरणे हेसुद्धा पित्त वाढू नये म्हणून मदत करणारे असते. 
* शेंगदाणे किंवा कूट घातलेले पदार्थ जमल्यास खाऊ नयेत किंवा कमी खावेत. 
* स्थूल असल्यास आधी वजन कमी करा. व्यायाम करा.
* पोट रिकामे असेल तेव्हा आम्लपित्ताची लक्षणे वाढतात. म्हणून सामान्यतः दर तीन तासांनी थोडा का होईना आहार घेणे आवश्यक आहे. पित्ताचा त्रास होत असेल तर त्या काळात आंबट, तिरवट, आंबविलेले पदार्थ वर्ज्य करावे. 
* पित्ताचा त्रास होत असेल तर लाल मटण खाणं कमी केलं पाहिजे. त्याऐवजी चिकन किंवा मासे खाल्ल्याने पित्ताचा धोका टाळता येतो. 
* चहा , कॉफ़ी संपूर्ण बंद. / दरदिवशी फक्त दोनच कप घेऊन कॅफेनच्या सेवनावर नियंत्रण ठेवता येईल. 
* मेथी, वांग संपुर्ण बंद 
* शक्यतो जगरण नाही, झाल्यास, झोपतना १/२ कप गार दुध. सुतशेखर १ गोळी. 
* कमित कमी ४ वेळा आहार. झोपायच्या आधी कमित कमी ३ तास जेवण. 
* प्रत्येक घास नीट चावून खा. 
* शक्यतो मसालेदार पदार्थ कमी प्रमाणात खातो 
* उपासाला जास्त प्रमाणात फ़लाहार. आणि इतर पदार्थ कमी. 
* आंबवलेले पदार्थ ( इडली, उतप्पा ) कमी. डोसा खाउन पित्त वाढत नाही अस लक्शात आलय. 
* vanila icecream ने खुप बर वाटत. जरा त्रास होतोय अस वाटल कि लगेच IceCream 
* नाहिच बर वाटल तर, ३-४ ग्लास कोमट पाण्यात मीठ घालुन प्यायच व उलटी काढायची. एकदा पित्त पडुन गेल कि बर वाटत. ( किमान 3-4 महिने तरी ) 
* तूर डाळीने पित्त होते. त्याऐवजी मूग डाळ वापरावी. 
* सकाळी दुध, जिलबी खाण्याचा पण पित्त कमी होण्यास उपयोग होतो. 
* आहारात पचायला हलके असणारे व त्याचबरोबर चवीला गोड, तुरट, कडू चवीचे लागणारे पदार्थ घ्यावेत. हे सर्व रस पित्त कमी करणारे आहेत. 
* जास्त तिखट, मसालेदार, आंबट पदार्थ वापरू नयेत. 
* खूप पोट भरेल एवढे जेवू नये. जेवल्यानंतर झोपू नये. 
* जास्त मीठ क्षार असणारे असे लोणची, पापड इ. पदार्थ टाळावे. 
* सर्वात महत्त्वाचे म्हणजे दही अजिबात खाऊ नये. दही शरीरावर उष्ण परिणाम करणारं व त्यामुळे पित्ताचा त्रास वाढविणारं आहे म्हणून ते पूर्ण बंद करावं. 
* तळलेले पदार्थ, मसालेदार, मांसाहारी पदार्थ खाऊ नयेत. 
* विरुध्द अन्नाचा, प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा, फास्ट फूडचा, बेकरीच्या पदार्थांचा, हवाबंद डब्यातील पदार्थांचा, कोल्डींक्सचा त्याग करावा. 

* आयुर्वेदातील पंचकर्मापैकी वमन आणि विरेचन या दोन कर्माचा, आम्लपित्तामध्ये चांगला उपयोग होतो 
* आम्लपित्ताचा नेहमी त्रास असणा-यांनी मोरावळा खावा. (आवळ्याच्या मोसमामध्ये आवळा आणि साखरेचा पाक यांचा उत्तम संयोग असलेला हा मोरावळा तयार करून ठेवावा.) आवळा हा थंड गुणधर्माचा, पित्तशामक असल्याने त्याचा आम्लपित्तामध्ये उत्तम उपयोग होतो. 
* आवळा सुपरी, मोरावळा, गुलकंद 
* २-३ आमसुलं/कोकमं खावी किंवा त्याचं सरबत घ्यावं अथवा लिंबाच्या रसातले आल्याचे तुकडे खावे (थोडे कमी कारण आलं उष्ण असतं) 
* पित्तावर तुळशीची पाने चघळणे, लवंगा चघळणे किंवा गुळाचा खडा चघळून खाणे या उपायांचाही उपयोग होतो. 
* मोरावळा, गुलकंद, दाडिमावलेह सेवन करणेही पथ्यकर असते 
* शतावरी, ज्येष्ठमध, दुर्वा या वनस्पती द्रव्यांचा वापर वैद्यांच्या सल्ल्याने केल्यास आम्लपित्तामध्ये लाभ होतो. 
* Gelucil, हे तर आहेच 
* Homeapathy मधील Nux Vomika चा सुद्धा मला चांगला फ़ायदा झाला आहे. 
उत्तर लिहिले · 21/12/2017
कर्म · 45560
0
आम्लपित्तासाठी (Acidity) काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
  • आहारातील बदल:
    • तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा: जास्त तेल आणि मसाले असलेले पदार्थ खाणे टाळा.
    • वेळेवर जेवण करा: नियमित वेळेवर जेवण करा आणि जेवणाच्या वेळांमध्ये जास्त अंतर ठेवू नका.
    • थोड्या-थोड्या वेळाने खा: एकाच वेळी जास्त जेवण करण्याऐवजी थोड्या-थोड्या वेळाने खा.
  • घरगुती उपाय:
    • आले: आल्याचा छोटा तुकडा चघळल्याने आराम मिळतो.
    • तुळस: तुळशीची पाने चघळल्याने आम्लपित्त कमी होते.
    • बडीशेप: जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने आराम मिळतो.
    • जिरे: जिरे पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्याने फायदा होतो.
    • दही: दही खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि आम्लपित्त कमी होते.
  • पेये:
    • नारळ पाणी: नारळ पाणी प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि आम्लपित्त कमी होते.
    • ताक: ताक प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
  • जीवनशैलीतील बदल:
    • धूम्रपान आणि मद्यपान टाळा: धूम्रपान आणि मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि त्यामुळे आम्लपित्ताची समस्या वाढू शकते.
    • वजन नियंत्रित ठेवा: जास्त वजन असल्यास ते कमी करण्याचा प्रयत्न करा.
    • पुरेशी झोप घ्या: दररोज रात्री 7-8 तास झोप घेणे आवश्यक आहे.
    • तणाव कमी करा: तणाव कमी करण्यासाठी योग आणि ध्यान करा.
  • औषधे:
    • जर घरगुती उपायांनी आराम मिळत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या.

टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 2360

Related Questions

पोटात गॅस होणे उपाय सांगा ?
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट म्हणजे काय?
आम्लपित्तावर जालीम उपाय काय आहे?