शब्दाचा अर्थ विमा अर्थशास्त्र

सागरी विमा म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

सागरी विमा म्हणजे काय?

5
सागरी विमा

सागरी विमा सागरी धोक्यांमुळे उद्भवणाऱ्या जोखमींचा विमा आहे. रेल्वे, रस्ता, समुद्र वा आकाश ह्या मार्गांनी वाहतूक होत असताना होणारी हानी ह्या विमाप्रकाराखाली संरक्षित होते. सामान्यतः सागरी विमा दोन प्रकारे हातळला जातो : (अ) मालाचा विमा, (आ) वाहतूक करणाऱ्या साधनांचा विमा.


सागरी विम्यात विमाकराराची सर्व तत्त्वे अंतर्भूत असतात. विमाहित हे विमित घटना घडण्याच्या वेळी विमेदाराजवळ पाहिजे. बेचन हे संबंधित मालाचे तसेच पॉलिसीवरील लाभाचे होऊ शकते. पॉलिसीची रक्कम त्रयस्थाला द्यावी, अशा तऱ्हेचे बेचनही होऊ शकते. विमेदाराची पॉलिसीवर सही आणि पॉलिसीचे प्रत्यक्षात हस्तांतरण यामुळे बेचन सिद्ध होते. सागरी विमा पॉलिसीमध्ये क्षतिपूर्तीचे तत्त्व तितकेसे लागू पडत नाही. ‘सागरी विमा कायदा १९६३’ च्या अन्वये सागरी विमाकराराचे नियमन होते. जोखमीचा काळ गोदामापासून गोदामापर्यंत असा असतो. संपूर्ण हानी या प्रकारात जहाजावरील सर्व जोखीम धारकांत विभागली जाते. आंशिक हानी त्या त्या विभेदाराला सोसावी लागते. अंतर्गत रेल्वे-रस्ता वाहतुकीसाठी अशाच तऱ्हेच्या पॉलिसी दिल्या जातात. सागरी विमा पॉलिसी देण्यापूर्वी माल पाठविणाऱ्याचे नाव, मालाचे वर्णन, मालाच्या बांधणीचे वर्णन, प्रवासाचा मार्ग, जोखमीचा प्रकार, जहाजाचे (किंवा वाहनाचे) नाव, विम्याची रक्कम, ह्यापूर्वीच्या दाव्यांची माहिती प्रस्तावकाकडून मिळविणे आवश्यक असते.
उत्तर लिहिले · 24/7/2018
कर्म · 10865
0

सागरी विमा:

सागरी विमा म्हणजे समुद्राद्वारे मालाची वाहतूक करताना होणारे नुकसान भरून काढण्यासाठी केलेला विमा होय.

मालाची समुद्राद्वारे वाहतूक करताना अनेक धोके असतात, जसे की जहाज बुडणे, वादळ, आग, चोरी, इत्यादी. या धोक्यांमुळे मालाचे नुकसान होऊ शकते. सागरी विमा या नुकसानीपासून संरक्षण देतो.

सागरी विम्याचे फायदे:

  • आर्थिक नुकसान भरपाई: सागरी विमा मालकीला समुद्रातील धोक्यांपासून संरक्षण देतो आणि नुकसान झाल्यास आर्थिक भरपाई देतो.
  • व्यवसाय सातत्य: नुकसान झाल्यास, विमा कंपनी भरपाई देत असल्याने व्यवसायातील सातत्य टिकून राहते.
  • मनःशांती: सागरी विमा घेतल्यानंतर, व्यापारी आणि मालक यांना मालाच्या सुरक्षिततेची खात्री मिळते.
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 5220

Related Questions

कृषी कर्जाचे विविध स्रोत कोणते आहेत? कृषी कर्ज व्यवस्थेतील समस्या व उपाय सांगा.
टिपा लिहा निर्बंध मुक्त बाजार?
टिपा लिहा मागणी पुरवठ्यास स्वतंत्र?
टिपा लिहा आनंत लवचिक मागणी?
बाजार यंत्रणेचे अपयश म्हणजे काय ते सांगून अपयशाची कारणे स्पष्ट करा?
अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
मक्तेदारीची व्याख्या सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा?