घरगुती उपाय त्वचेचे विकार त्वचाविज्ञान आरोग्य

गजकर्णवर ठोस उपाय काय आहेत? प्रत्येकाने नवीन उपाय सांगावे.

5 उत्तरे
5 answers

गजकर्णवर ठोस उपाय काय आहेत? प्रत्येकाने नवीन उपाय सांगावे.

16
कितीही भयंकर आणि जुनाट गजकर्ण, खाज, खरुज मुळा सकट संपवतो हा घरगुती उपाय

त्वचा ही आपल्या शरीराचे संरक्षण कवच आहे. बाहेरून होणाऱ्या जीवाणू आणि जंतूंचा ती बऱ्याच प्रमाणात आपल्या शरीराचे रक्षण करते आणि अश्या वेळेस ती स्वत कधी कधी आजारी होते किंवा तिला संसर्ग होतो. त्वचा लाल होते, डाग पडतात, जळजळ होते किंवा त्वचेचा रंग बदलतो आणि सूज येते या सर्व त्वचेच्या एलर्जीचे संकेत आहेत. ही एलर्जी शरीराच्या कोणत्याही भागाला प्रभावित करू शकते.

या एलार्जीचा हा घरगुती उपायाने सुध्दा केला जाऊ शकतो. यासाठी महागड्या औषधांची आवश्यकता नाही आहे.आज आपण अश्याच घरगुती उपाया बद्दल येथे माहीती घेणार आहोत.

लिंबू विटामिन सी चा एक चांगला स्रोत आहे आणि यामध्ये Bleaching गुण पण असतात ज्यामुळे हे त्वचेच्या उपचारासाठी एक चांगला आणि नैसर्गिक औषधी आहे. याचा वापर करताना सुरुवातीला तुम्हाला जळजळ होईल पण लिंबू खाजेवर प्रभावी उपाय आहे. लिंबू मध्ये साइट्रिक एसिड असते जे एलर्जीला अत्यंत प्रभावी पणे बरे करते.
http://aaosairam.blogspot.com​
साहित्य
एक लिंब किंवा,
लिंबाचा रस

वापरण्याची पध्दत
उपाय करण्यासाठी लिंबाचा रस घ्यावा आणि संसर्ग झालेल्या जागी लिंबाचा रस लावा आणि त्याला तसेच सुकण्यासाठी सोडून द्या. हे लावल्या नंतर तुम्हाला थोडी जळजळ होईल आणि त्वचेला त्रास होऊ शकतो. पण तुम्हाला खाजवायचे नाही आहे. सुकल्या नंतर स्वच्छ पाण्याने धुवावे.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
╔══╗       संकलन: नितीन जाधव  
║██║         स्रोत:- आरोग्यविद्या
╚══╝ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ *+९१८६५५४०७६१९*
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █
              🥀 ᵃᵃºˢᵃi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ
आपण हि व या अधिक माहिती खालील संकेत स्थळाला भेट देऊन पाहु शकता
      *http://aaosairam.blogspot.com​*
*नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.*

    *!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!​​*
उत्तर लिहिले · 4/9/2018
कर्म · 569245
8
गजकर्ण निरनिराळया प्रकारचे असतात. नेहमी दिसणारा प्रकार म्हणजे अंगावर,जांघेत कमरेवर दगडफुलासारखा दिसणारा व पसरणारा गजकर्ण. यांत त्वचा काळवंडते आणि खूप खाज सुटते. हा आजार बुरशीमुळे होतो. याची मुख्य कारणे म्हणजे अस्वच्छता,दमटपणा,पाण्याची टंचाई,एकमेकांचे कपडे वापरणे,इत्यादी.
गजकर्णासाठी उपाय करताना त्वचा कोरडी राहील अशी काळजी घेणे आवश्यक आहे. 
(अ) गजकर्णाच्या भागावर करंजतेलाचा बोळा घासावा.(ब) या बाह्य उपचाराबरोबर कोठा स्वच्छ राहण्यासाठी त्रिफळा चूर्ण (चमचाभर) कोमट पाण्याबरोबररोज रात्री याप्रमाणे10दिवस घ्यावे. गजकर्णसाठी आणखी एक पर्यायी बाह्य उपाय म्हणजे बहाव्याची कोवळी पाने वाटून सकाळ- संध्याकाळ लेप द्यावा.

स्वच्छता ही प्रथम महत्त्वाची आहे. - (रोजआंघोळ करणे,नखे कापणे.)
गजकर्णचाभाग गरम पाणी व साबणाने स्वच्छ धुऊन  मलम (व्हिटफिल्ड, डर्मी) रोज चोळून लावावे. व्हिटफिल्ड मलमाने सुरुवातीला आग होते, पण दोन-तीन आठवडयांत आराम पडतो व चट्टा जातो. नंतर आठवडाभर तरी मलम लावत राहावे. नाही तर गजकर्ण परत उमटतो. व्हिटफिल्ड मलमापेक्षा मायकोल,डर्मी मलम जास्त चांगले आहे. याचा परिणाम लवकर (साधारण 10 दिवसांत) होतो.
उत्तर लिहिले · 5/12/2017
कर्म · 5555
0
गजकर्णावर काही ठोस उपाय खालीलप्रमाणे आहेत:

1. नायट्रिक ऍसिड (Nitric Acid):

उपाय: नायट्रिक ऍसिड गजकर्ण झालेल्या भागावर लावा आणि 2 मिनिटे तसेच ठेवा.

फायदा: गजकर्ण नायट्रिक ऍसिड लावल्याने पूर्णपणे बरा होतो.


2. कापूर (Camphor) :

उपाय: कापूर आणि खोबरेल तेल एकत्र करून गजकर्ण झालेल्या भागावर लावा.

फायदा: कापूर त्वचेला थंडावा देतो आणि खाज कमी करतो.


3. लसूण (Garlic):

उपाय: लसणाची पेस्ट गजकर्ण झालेल्या भागावर लावा.

फायदा: लसणामध्ये ऍন্টিफंगल गुणधर्म असतात, जे संसर्ग कमी करतात.


4. कोरफड (Aloe Vera):

उपाय: कोरफडीचा गर गजकर्ण झालेल्या भागावर लावा.

फायदा: कोरफड त्वचेला शांत करते आणि लवकर बरी होण्यास मदत करते.


5. टी ट्री ऑईल (Tea Tree Oil):

उपाय: टी ट्री ऑईल diluted करून गजकर्ण झालेल्या भागावर लावा.

फायदा: टी ट्री ऑईलमध्ये ऍন্টিसेप्टिक आणि ऍন্টিफंगल गुणधर्म असतात.

संदर्भ: Healthline - Tea Tree Oil for Ringworm


6. ऍपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar):

उपाय: ऍपल सायडर व्हिनेगर diluted करून कापसाने गजकर्ण झालेल्या भागावर लावा.

फायदा: ऍपल सायडर व्हिनेगरमध्ये ऍसिडिक गुणधर्म असतात, जे फंगल इन्फेक्शन कमी करतात.

संदर्भ: Medical News Today - Apple Cider Vinegar for Ringworm


7. हळद (Turmeric):

उपाय: हळदीमध्ये पाणी किंवा तेल मिसळून पेस्ट तयार करा आणि ती गजकर्ण झालेल्या भागावर लावा.

फायदा: हळदीमध्ये ऍন্টিसेप्टिक आणि ऍন্টিइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.


इतर उपाय:

  • स्वच्छता: गजकर्ण झालेल्या भागाला नेहमी स्वच्छ ठेवा आणि कोरडे ठेवा.
  • कपडे: रोज आपले कपडे आणि टॉवेल बदला आणि ते इतरांना वापरण्यासाठी देऊ नका.
  • डॉक्टरांचा सल्ला: जर घरगुती उपायांनी आराम नाही मिळाला, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1660

Related Questions

त्वचा रोगासाठी कोणत्या डॉक्टरांकडे जावे?
केसतोडा यावर औषध कोणते?
चेहऱ्यावर एक किंवा दोन पिंपल्स का येतात?
अंगावर गांधी उठण्याची कारणे?
मुक्का मारावर कायमचा उपाय काय आहे?
कोणत्या ग्रंथी घाम निर्माण करतात?
पित्त गांधी कमी करण्याचे उपाय सुचवा?