
मुका मार लागल्यावर करता येणारे उपाय हे खालील प्रमाणे-
1.मुका मार लागलेल्या जागेवर गाठ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मुका मार लागलेल्या जागेवर जास्त सूज येऊ नये यासाठी गच्च कापड बांधावे.
मुका मार लागला तर त्या जागेवर लगेचच साजूक तूप लावावे.
मुका मार लागल्यावर घरगुती उपाय / मुका मार लागल्यावर काय करावे /मुका मार घरगुती उपाय /
आपल्याला जर मुका मार लागल्यावर घरगुती उपाय काय करावे हे समजत नसेल तर आपण आम्ही खालील लेखात सांगितलेले घरगुती उपाय करावेत, ते केल्याने आपल्याला बराच आराम मिळेन आणि आपला त्रास देखील कमी होईल.
/
2.बर्फाने शेकणे
मुका मार लागल्यानंतर लगेचच त्यावर बर्फ लावा. बर्फाने हळुवारपणे सहन होईल तसे मुका मार लागलेल्या भागावर शेका, असे केल्याने त्या भागांवर रक्त जमा होण्याची शक्यता कमी होईल आणि सुज आली असेल तर ती देखील कमी होईल किमान दहा मिनिटे बर्फ असलेली बॅग ही मुका मार लागलेल्या भागांवर ठेवा. जवळपास वीस मिनिट तरी ही प्रक्रीया करत रहावे याने सूज आणि त्रास दोन्ही देखील कमी होईल.
3.कोरफड
कोरफडीत अॅंटी इन्फलेमेटरी घटक असतात यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. कोरफडीचा गर थेट जखमेवर लावल्याने जखम बरी होण्याची प्रक्रिया जलद होते. तसेच रक्ताच्या गाठीही होत नाहीत. त्यामुळे आपल्याला मुका मार लागला तर, लगेचच त्या जागी कोरफड चा गर लावावा. कोरफड मुळातच थंड असल्याने मुका मार लागलेल्या जागेच दाह शांत होतो.

4.अननस आणि त्यांची पाने
अननसाचे सेवन केल्यानंतर देखील जखम लवकर बरी होण्यास मदत होते. अननस च्या सेवन सोबतच, जर आपण अननस ची पाणे मिक्सर करून त्याचा लेप मुका मार लागलेल्या जागेवर लावला तर त्यामुळे देखील मुका मार बरा होण्यास आणि सुज कमी होण्यास बरीच मदत होते. अननसामध्ये ब्रोमेलेन हा एन्झाइम्स असा घटक असतो. त्यामुळे मुका मार लागलेला बरा होतो आणि सूज देखील कमी होते.

5.भुईलोण / शेणाचा लेप – मुका मार लागल्यावर घरगुती उपाय
मुका मार लागल्यावर घरगुती उपाय / मुका मार लागल्यावर काय करावे/ मुका मार घरगुती उपाय / मुक्का मार /
शेणांनी सारवलेल्या जागेवर शेंदीलोन, हळद, पाणी टाकुन त्याचा लेप काढावा आणि तो लेप काढुन गॅसवर शिजवावा आणि तो लेप मुकामार लागलेल्या जागेवर लावावा याने दोन तासांमध्ये आराम मिळतो. हया मिश्रणाल गावराणी भाषेत भुईलोणं असे म्हणतात. मुका मार लागल्यास हा घरगुती उपाय अगदी रामबाण उपाय म्हणून काम करतो. हा उपाय केल्याने मुका मार लागलेल्या जागेवर सूज देखील येत नाही.

6. निरगुंडीचा पाला, हळद आणि शेंदलोण
शेतामध्ये निरगुडी चा पाला मिळतो. तो आणायचा आणि एका पातेल्यामध्ये हळद, पाणी आणि शेंदलोण मिठ टाकुन उकळावे. आणि निरगुडीच्या पाल्याची एका कपडयांमध्ये टाकुन पूरचूंडी करावी आणि हळद व शेंदलोण मीठ टाकलेल्या पातेल्यात ती पुरचुंडी टाकावी व ते चांगले उकळून घ्यावे आणि ते पाणी मुकामार लागलेल्या जागेवर कोमट किंवा जसे सहन होईल तसे लावावे. याने देखील आराम मिळेल.
7.म्हशागुगुळ
मशागुगुळ नावाचे एक आयुर्वेदीक औषध मेडीकल वर भेटते. हे औषध खडा सहानेवरून उगळून घ्यावे थोडे थोडे पाणी टाकून शिजवून घ्यावा आणि हेच मिश्रणाचे गंध तयार होते सहानेवर उगळल्यानंतर हे गॅसवर ठेवून मंद आचेवर उगळून घ्यावे आणि कोमट झाल्यावर मुकामार जेथे लागला आहे तेथे लावावे. या उपयाने काय होते की मुकामार लागल्यावर जे रक्त गोठते काळनिळे पडते. ते कमी होते.
8.वाळू
बारीक वाळू घ्यावी. व ती गरम तव्यावर एका कॉटनच्या कपडयामध्ये टाकून गरम करावी. त्यातील खडे नाही घ्यायचे ते बाजूला काढायचे फक्त बारीक वाळू घ्यावी. आता ही वाळू एका पातेल्यात गरम करावी आणि गरम केलेली वाळूचा कॉटनच्या कपडयांमधील गाठ पाडून त्याचा मुकामार लागलेल्या ठिकाणी हलक्या हातानी शेक घ्यावा याने आराम मिळेन.
9.मोहरीचे तेल, टरफनटाईल तेल, रॉकेल
मोहरीचे तेल, टरफनटाईल तेल, आणि रॉकेल घ्यावे हे सर्व तेल समप्रमाणात घ्यावे जसे की, एक वाटी मोहरीचे तेल एक वाटी टरफनटाईल तेल आणि एक वाटी राॅकेल असे घेऊन एका हवाबंद काचेच्या बाटलीमध्ये स्टोअर करावे. हे तेल असेच चार दिवस ठेवून मुकामार लागलेल्या जागेवर हलकया हाताने चोळावे यानेदेखील आराम मिळेल काम झाल्यावर हया मिश्रणाच्या बाटलीचे तोंड पॅक बंद करून ठेवावे.
10.मोहरीचे तेल, हळद आणि लसूण
मुका मार लागल्यावर घरगुती उपाय / मुका मार लागल्यावर काय करावे/ मुका मार घरगुती उपाय / मुक्का मार /
एका पळीमध्ये 5 ते 6 चमचे मोहरीचे तेल घ्यावे आणि त्यात अर्धा चमचा हळद घालावी आणि लसणाच्या पाच ते सहा पाकळयांची पेस्ट घेउन हे मिश्रण चांगले गरम करून घ्यावे. आणि थंड झाल्यावर या मिश्रणाने मुकामार लागलेल्या ठिकाणी मसाज करावी.

11.शेकणे – मुका मार लागल्यावर काय करावे
हलक्या हाताने एखादे मऊ किंवा कॉटनचे कापड किंवा एखादी शेक देतात ती पिशवी घेऊन जिथे दुखत आहे त्या भागावर गरम पिशवी किंवा गरम कापड याने त्या मुका मार लागलेल्या जागेवर दाब दया, यामुळे मुकामार लागल्यामुळे आलेली सुज ही नक्कीच कमी होईल. गरम कापड किंवा गरम पाणी याने शेकल्यास त्या जागी बराच आराम मिळतो तसेच गाठ देखील होत नाही.म
12.निरगुंडीची पाणे
मुका मार लागल्यावर घरगुती उपाय / मुका मार लागल्यावर काय करावे/ मुका मार घरगुती उपाय / मुक्का मार /
निरगुडीचा पाला
निरगुंडी ची पाणे घ्यावीत ही पाणे पाण्यात उकळुन घ्यावी जेव्हा हे पाणी उकळताना पाण्यातुन वाफ निघेल तेव्हा भांडयावर जाळी ठेवावी. दोन कॉटनचे कपडे पाण्यात भिजवून पिळुन घ्या. नंतर हे एका झाल्यावर एक जाळीवर ठेवुन गरम करून घ्या. सुज किंवा दुखणा-या भागांवर ठेवुन हलक्या हाताने शेकून घ्या यामुळे आराम मिळेल.

13.आक्रोड चे तेल – मुक्का मार उपाय
समजा मुका मार लागल्याने आपल्याला हाडाला दुखापत झाली असेल किंवा सुज आली असेल तर, आपण त्या मुका मार लागलेल्या जागेवर किंवा हाडावर हळुवारपणे कोमट तेल करून त्या आक्रोडाच्या तेलाने मालिश करावी . कोमट आक्रोड च्या तेलाने मालीश केल्याने आखडलेले हात आणि पाय चांगले होतात तसेच हाडावर आलेली सूज देखील उतरते.
14.भाजलेले जिरे – मुका मार घरगुती उपाय
आपल्याला जर शरीरावर ककुठेही मुका मार लागला असेल आणि तो भागा सारखं सारखं अधून- मधून दुखत असेल तर आपल्याला मुका मार लागला त्या जागेचा त्रास आणि दुखणे कमी व्हावे यासाठी आपण थोडे जिरे घ्यावे आणि त्या जिर्याला तव्यावर थोडे भाजून ,शेकून घ्यावे. दिवसभरात 2 ते 3 चमचे असे प्रमाण घेऊन पाण्यासोबत दिवसातुन तीन वेळा सेवन करावे, हे भाजलेले जिरे चावून खाल्ल्याने सुध्दा आराम मिळतो आणि मुका मार लागलेली जागा दुखणे किंवा ठणकणे कमी हे बर्यापैकी कमी होते.
15.दुखदबाव लेप
दुखदबाव पावडर पाण्यात भिजवून मलम सारखे करावे आणि मुका मार लागला आहे त्या जागी मलम सारखे लावावे आणि त्यावर कापूस लावावे दुख कापूस खेचून घेतो दुख कमी झाले कि कापूस आपणच निघत नाही निघाले तर गरम पाणी लावून कापूस काढावा.

16.आपल्या घरात असणारी हळद
मुका मार लागला आहे त्या जागी हळद पटकी(तुरटी) चा लेप लावावा मुका मार लागला आहे तिथे सूज किंवा जागा काळी पडली असेल तर हळद पटकीचा लेप चांगले काम करतो आराम मिळतो.
असे अनेक उपाय आहेत. जास्त गंभीर असेल तर डॉक्टर प्रथमोपचार करावे.
सारांश – मुका मार लागल्यावर घरगुती उपाय / मुका मार लागल्यावर काय करावे /
आपल्याला जर मुका मार लागला असेल किंवा मुका मार लागल्याने शरीराच्या एखाद्या भागावर सूज आली असेल तर मुका मार लागल्यावर घरगुती उपाय / मुका मार लागल्यावर काय करावे/ मुका मार घरगुती उपाय ” या लेखात सांगितलेले उपाय करावेत याने आपल्याला नक्कीच बराच आराम मिळेन.