औषधे आणि आरोग्य रक्त गट रक्त आरोग्य

हिमोग्लोबिन बद्दल माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

हिमोग्लोबिन बद्दल माहिती मिळेल का?

2
हिमोग्लोबिन बद्दल उपयुक्त माहिती 

   हिमोग्लोबिन हा रक्तातील अतिशय  महत्त्वाचा घटक असून, तो आयन’ (लोह) आणि प्रोटीन’ (प्रथिने) यापासून बनलेला असतो. रक्‍तामध्ये 12 ते 14.5 मिली इतके हिमोग्लोबिनचे प्रमाण आवश्‍यक असते. मात्र अनेक जणांमध्ये हे प्रमाण कमी असल्याने ते एनिमियाच्या बळी पडतात. मग अनेकदा आयन  आणि प्रोटीन वाढवण्यासाठी डॉक्टर गोळ्या देतात , मात्र त्याने तात्पुरते हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.  पुन्हा हळूहळू हिमोग्लोबिन खाली जाते, अशावेळी तुमच्या  सकस आहारातील काही पदार्थ नैसर्गिकरित्या तुमचे हिमोग्लोबिन वाढवतात पहा कोणते आहेत हे घटक… 
 
१) पालक - 
 पालकचा तुमच्या आहारात समावेश असणे अत्यंत महत्वाचे आहे. पालकमुळे रक्तातील आयन’ (लोह) वाढवण्यास मदत करते . सुप्स , भाजी  ,पालक  वडे , आमटी किंवा सलाड अशा कोणत्याही स्वरूपात पालक खाणे हितावह आहे. पालकवर लिंबू पिळल्याने त्यातील आयन (लोह) अधिक चांगल्याप्रकारे ग्रहण होते. 

 २) संत्र - 
 संत्र्यामधील व्हिटामिन सी आणि  व्हिटामिन बी ६ रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करते . रोज किमान २ ग्लास संत्र्याचा रस प्या मात्र त्यात साखर टाकू नका. 

 3) दुध आणि दुग्धजन्य पदार्थ - 
 आहारात नियमित किमान ग्लासभर दुध व दुग्धजन्य पदार्थ असणं फार महत्त्वाचे आहे. दुधात शरीराला पूरक अनेक मिनरल्स’( खनिजं )व व्हिटामिन्स’ असल्याने दुधाला पूर्णान्न म्हणतात. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील हिमोग्लोबिन  वाढते. 

 4) खजूर 
 काळा  आणि लाल अशा दोन स्वरूपात बाजारात खजूर उपलब्ध आहे. खजूर हे  आयन (लोह) प्रमाणेच 'व्हिटामिन सी' व 'व्हिटामिन बी' वाढवण्यास मदत करते. खजुराच्या सेवनाने  लाल रक्तपेशींची निर्मिती  वाढते , परिणामी हिमोग्लोबिन वाढते.खजूर नुसताच  खाण्याबरोबरीने त्यापासून तयार केलेली बर्फी , लाडू किंवा चटणी असे विविध पदार्थांमार्फत तुम्ही खजूर खाऊ शकता . 

 5) गूळ - 
 भारतीय स्वयंपाकघरात अगदी सहजतेने गूळाचा वापर केला जातो .आयुर्वेदात गुळाला औषधीय शर्करा’ म्हणून संबोधलं जाते.   गूळ लोह्वर्धक  असून उत्तम स्वास्थ्यासाठी  अतिशय  उपयुक्त आहे. गूळाच्या नियमित सेवनाने रक्तातील  हिमोग्लोबिन तर वाढते त्याचबरोबर शरीरात रक्ताचं प्रमाण वाढते आणि त्वरित उर्जा मिळते .  दररोजच्या जेवणात साखरेऐवजी  गूळ वापरणे अधिक हितावह आहे. 
 
6) डाळींब - 
 शारीरिक स्वस्थ्याप्रमाणेच सौदर्य खुलवण्यासाठी डाळींबाचा प्रामुख्याने आहारात  वापर केला जातो. डाळींबातील लोह्वर्धक व मुबलक प्रमाणात आढळणारे  व्हिटामिन सी चे प्रमाण रक्तातील  हिमोग्लोबिन वाढवते.  आठवड्यातून तीन ते चार वेळेस  डाळींबाचा रस घेतल्यास तुमचे हिमोग्लोबिन नक्कीच वाढेल . 

 7) फरसबी 
 प्रोटीन, कॅल्शियम, आयन (लोह), सल्फर (गंधक), फॉस्फरस तसंच व्हिटामिन ए’ असलेली फरसबी ही पोषकतेच्या दृष्टीने उत्तम भाजी आहे.यामधील फॉलिक अॅसिडमुळे रक्तातील  हिमोग्लोबिनचे योग्य प्रमाण राखण्यास मदत होते. फरसबीची भाजी अथवा कोशिंबिरीत  फरसबीचा वापर आठवड्यातून दोनदा केल्याने  तुमचे  हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात राहील. 

 8) मांसाहार - 
 शाकाहाराबरोबरीने  मांसाहारानेदेखील तुमचे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवता येते . चिकन , मटण , अंडी , मासे यामधील व्हिटामिन 'बी १२' व व्हिटामिन 'बी ६' रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात. मात्र मांसाहार करताना ते योग्य प्रकारे शिजवा व योग्य प्रमाणात खा . 
 
9) पिस्ता - 
 सुक्या  मेव्यात  व्हिटामिन 'बी ६' चे प्रमाण अधिक असते, मात्र विशेषतः 'पिस्ता' सर्वाधिक प्रमाणात शरीराला  व्हिटामिन पुरवते. त्यामुळे लाडू , शिरा ,हलवा खीर यांसारख्या गोड पदार्थांमध्ये  पिस्त्याचा वापर वाढवा. पिस्त्यातील  व्हिटामिन 'बी ६' रक्तातील हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात राखण्यास मदत करतात. 
 
10) गरम मसाला - 
 भारतीय  खाद्यसंस्कृतीचे खरे वैभव आहे यामध्ये वापरले जाणारे 'मसाले' ! तुमच्या जेवणात तमालपत्र , कोथिंबीर , पुदिना , तुळशीची पाने यांचा योग्य वापर ठेवा . हे मसाले आहारातील 'लोह' योग्य प्रमाणात ग्रहण करतात त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण राखण्यास मदत होते. 
उत्तर लिहिले · 2/12/2017
कर्म · 5980
0

हिमोग्लोबिन (Haemoglobin) एक महत्वाचे प्रथिन आहे जे लाल रक्तपेशींमध्ये (Red Blood Cells) आढळते. याचे मुख्य कार्य शरीरातील अवयवांना ऑक्सिजन (Oxygen) पुरवणे आहे.

हिमोग्लोबिनची रचना:

  • हिमोग्लोबिन हे चार प्रोटीन युनिट्स (Protein Units) पासून बनलेले असते, ज्याला ग्लोबिन म्हणतात.
  • प्रत्येक ग्लोबिन युनिटमध्ये एक हेम् (Heme) नावाचा रेणू असतो, ज्यात लोह (Iron) असतो.
  • हे लोह ऑक्सिजनला बांधून ठेवते आणि त्याचे वहन करते.

हिमोग्लोबिनचे कार्य:

  • ऑक्सिजन वहन: हिमोग्लोबिन फुफ्फुसातून ऑक्सिजन घेऊन शरीरातील सर्व पेशींपर्यंत पोहोचवते.
  • कार्बन डायऑक्साईड वहन: हे पेशींमधून कार्बन डायऑक्साईड परत फुफ्फुसांपर्यंत आणते, ज्यामुळे तो श्वासाद्वारे बाहेर टाकला जातो.

हिमोग्लोबिनची पातळी:

  • पुरुषांमध्ये: 13.5 ते 17.5 ग्राम प्रति डेसिलीटर (g/dL)
  • स्त्रियामध्ये: 12.0 ते 15.5 ग्राम प्रति डेसिलीटर (g/dL)

हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्यास अॅनिमिया (Anemia) होऊ शकतो, ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपाय:

  • लोहयुक्त आहार घ्या: पालेभाज्या, डाळिंब, बीट, मांस आणि फळे खा.
  • व्हिटॅमिन सी (Vitamin C) घ्या: लिंबू, संत्री आणि इतर आंबट फळे खा, ज्यामुळे लोह शोषण्यास मदत होते.

हिमोग्लोबिन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि त्याची योग्य पातळी राखणे महत्वाचे आहे.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 2220

Related Questions

वयानुसार हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असावे?
हिमोग्लोबिन मध्ये काय असतं?
मानवी शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात?
What is blood? Name different blood cells with normal values.
शरीराच्या कोणत्या अवयवात लाल रक्तपेशी तयार होतात?
शरीराला होणारा रक्तलाभ कोणत्या क्षमतेवर अवलंबून असतो?
रक्तातील घटक कोणते आहेत? याबाबत सविस्तर लिहा.