रक्त आरोग्य

वयानुसार हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असावे?

2 उत्तरे
2 answers

वयानुसार हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असावे?

0

वयानुसार हिमोग्लोबिनचे प्रमाण खालीलप्रमाणे असावे:

  • नवजात शिशु: 17-22 gm/dL
  • एक आठवड्याचा बाळ: 15-20 gm/dL
  • एक महिन्याचा बाळ: 11-15 gm/dL
  • मुले: 11-13 gm/dL
  • पुरुष: 14-18 gm/dL
  • महिला: 12-16 gm/dL

हे आकडे थोडेफार बदलू शकतात. हिमोग्लोबिनची पातळी तपासण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

टीप: हिमोग्लोबिनचे प्रमाण gm/dL (ग्राम प्रति डेसीलिटर) मध्ये मोजले जाते.

उत्तर लिहिले · 4/4/2025
कर्म · 980
0
*🎴हिमोग्लोबिनचे प्रमाण वयानुसार किती असावे* 




————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
जर शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर थकवा, चक्कर येणे आणि अशक्तपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. https://bit.ly/3FWhCe0 हिमोग्लोबिन हा लाल रक्तपेशींमध्ये (RBCs) असलेला एक महत्त्वाचा घटक आहे, जो शरीराच्या विविध भागांमध्ये ऑक्सिजन पोहोचवतो. यामुळे तो महत्त्वाचा आहे. 
संतुलित आहार, योग्य जीवनशैली आणि नियमित व्यायामाद्वारे हिमोग्लोबिनची लेव्हल राखणं महत्त्वाचं आहे. जर हिमोग्लोबिन लक्षणीयरीत्या कमी झालं तर घरच्या घरीच काही सोपे उपाय करून हिमोग्लोबिनची लेव्हल राखू शकता, ज्यामुळे शरीर निरोगी राहील. यासाठी सर्वप्रथम वयानुसार हिमोग्लोबिनची लेव्हल काय असावी आणि ती नैसर्गिकरित्या कशी वाढवता येईल हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
सामान्य हिमोग्लोबिनची लेव्हल वयानुसार बदलते. १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी, हिमोग्लोबिनची पातळी १२-१५.५ ग्रॅम/डीएल असावी. तर १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये १३.५ ते १७.५ ग्रॅम/डीएल हिमोग्लोबिन असायला हवं.
१४ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सामान्य प्रमाण १०-१५.५ ग्रॅम/डीएल असतं आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये १२.० ते १५.५ ग्रॅम/डीएल असतं.
जर हिमोग्लोबिनची लेव्हल यापेक्षा कमी असेल, तर तुम्ही घरगुती उपाय करा.
🥅हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय
जर तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर तुमच्या आहारात आयर्न, फॉलिक एसिड, व्हिटॅमिन बी १२ आणि व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ समाविष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे.
हिमोग्लोबिन तयार करण्यात आयर्न भूमिका महत्त्वाची असते. शरीराची आयर्न गरज पूर्ण करण्यासाठी पालक, मेथी यासारख्या हिरव्या पालेभाज्या खा. बीट आणि डाळिंब दोन्ही रक्त वाढवण्यासाठी खूप प्रभावी आहेत. अंजीर आणि खजूरही हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतं.
संत्री, लिंबू, आवळा आणि टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. गाजर आणि बीटाचा रस प्यायल्याने हिमोग्लोबिन वेगाने वाढतं. शेवग्याच्या पानांमध्ये आयर्न आणि इतर पोषक तत्वं मुबलक प्रमाणात आढळतात.𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫फॉलिक अ‍ॅसिड नवीन लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करतं. सोयाबीन, ब्रोकोली, शेंगदाणे खा. संत्री आणि पपई हे देखील फॉलिक एसिडचे उत्कृष्ट सोर्स आहेत.
व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊ शकते. दूध, दही, चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ खा.
गूळ आणि भाजलेले चणे खाल्ल्याने हिमोग्लोबिन वेगाने वाढतं. गूळ हा आयर्नचा नैसर्गिक सोर्स आहे आणि चण्यामध्ये प्रोटीन आणि फायबर असतं.https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24




Related Questions

हिमोग्लोबिन मध्ये काय असतं?
मानवी शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात?
What is blood? Name different blood cells with normal values.
शरीराच्या कोणत्या अवयवात लाल रक्तपेशी तयार होतात?
शरीराला होणारा रक्तलाभ कोणत्या क्षमतेवर अवलंबून असतो?
रक्तातील घटक कोणते आहेत? याबाबत सविस्तर लिहा.
प्लेटलेट्स वाढविण्यासाठी काय उपाय?