2 उत्तरे
2 answers

लहान बाळाची नजर काढण्यामागे काही शास्त्रीय कारण आहे काय?

7
असं म्हणतात लहान बाळांना लगेच नजर लागते...
हे खरे आहे की मनुष्याची आंतरिक वाईट नजर समोरच्यास लागली तर समोरच्यास वाईट परिणाम होते... बाळाच्या आई किंवा वडिलांचा कुणी शत्रू असेल किंवा तिरस्कार करत असेल किंवा त्या घरावर कुणा वाईट व्यक्तीची वाईट नजर असेल तर नवजात बालकावर त्यांचा क्रोश उफाळून येतो... आणि मनातील वाईट इच्छा इतकी तीव्र असते की समोरच्यास परिणामाला सामोरे जावे लागते...
जेव्हा बाळास नजर लागते तेव्हा बाळ फार रडतं... आणि आई, आजी, मावशी किंवा आत्या असे वरिष्ठ व्यक्ती बाळाची नजर काढ़ते... या मध्ये मी खुद्द एक तर्क लावलेला... जर वाईट व्यक्ति बाळावर वाईट नजर लावतो तर आई , आजी कुणी जर नजर काढतात तेव्हा ते विविध आपापल्या परीने पर्याय क्रिया करून नजर काढतात... परंतु तशी क्रिया करताना त्यांच्यातुन निघणारा जो आत्मिक भाव असतो तो फार सकारात्मकतेने बाहेर येत असतो... कुणा कुणाची नावे घेतात आणि ती नजर निघुन जाउदे असे अगदी आर्ततेने आरोळी घालतात...(बाळ जर रडतच असेल म्हणून फक्त नजर लागली असे प्रत्येकवेळी न समजता प्रथोमचार म्हणून बाळांच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या...)
अर्थात शास्त्रीय दृष्टया पाहिले तर ... जेथे नकारात्मक प्रभाव जर तिव्रतेने येत असेल तर तितक्याच तिव्रतेने आपण सकारात्मक राहिले पाहिजे...
मी माझे वैयक्तिक मत व्यक्त केले आहे... काही चुकले असेल तर क्षमस्व...
धन्यवाद...!
उत्तर लिहिले · 11/2/2018
कर्म · 458560
0
लहान बाळाची नजर काढण्यामागे कोणतेही शास्त्रीय कारण नाही. ही एक पारंपरिक प्रथा आहे. समाजामध्ये लहान बाळांना दृष्ट लागू नये, बाळ आजारी पडू नये किंवा त्याला इतर काही त्रास होऊ नये म्हणून काही उपाय केले जातात. त्यापैकीच ही एक प्रथा आहे. या प्रथेला शास्त्रीय आधार नाही, परंतु काही लोकांचा असा विश्वास आहे की या Pratheमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि बाळाला सकारात्मक ऊर्जा मिळते.
उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1080

Related Questions

गोसावी लागणे म्हणजे काय?
कपाळावर दारिद्र्याचा शाप असलेली?
शाप म्हणजे काय?
झोपलेल्या माणसाला का ओलांडू नये? अशी का मान्यता आहे?
विज्ञान आणि अंधश्रद्धा यावर चर्चा करा?
अंधश्रद्धा हा एक सामाजिक आजार आहे का?
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने जोर धरला, कारणे लिहा?