2 उत्तरे
2
answers
शाप म्हणजे काय?
0
Answer link
शाप म्हणजे काय
अहंकार कोणालाच चुकलेला नाही ,त्याचे पण दोन चेहरे असतात एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व.
अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं.
आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो....आणि त्या अवस्थेत तो कसा वागेल हे सांगता येत नाही....काही वेळा मनुष्य अंर्तबाह्य दुखावला जातो..इतका की त्याच्या ही नकळत काही शब्द उच्चारले जातात..आणि तो हे शब्द ज्या व्यक्तीला उद्देशून म्हणतो ..त्या शब्दांचे परिणाम त्या व्यकीवर त्याच्या घरादारावर होतात...
आणि ते शब्द ठरतात शाप...
तर मग शाप म्हणजे नक्की काय?
1. शाप ही अभद्र वाणी किंवा अपशब्द आहे.
2. एखाद्या व्यक्तीची जेव्हा पिळवणूक होते ,त्याला दिल्या जाणा-या त्रासाचा कहर, अतिरेक , कळस होतो अशा वेळी ती त्रस्त व्यक्ती अभद्र वाणी उच्चरते.
3. यात दोन घटक आहेत. एक त्रास देणारा तर दुसरा त्रास सहन करणारा.
त्रास देणा-याचा हेतू जर एखाद्याला आयुष्यातून पार नेस्तनाबूत करायचा असेल, तर अशा वेळी त्रास सहन करणारी व्यक्ती अभद्र वाणी उच्चारते.
4. अभद्र वाणी चा उच्चार हा शारिरीक व मानसिक अशा दोन स्तरांवर केला जाऊ शकतो.
शूद्र व्यक्तीच्या बाबत हा बहुदा शारिरीक पातळीवर असतो.
वैश्य व क्षत्रीयाच्या बाबतीत हा दोन्ही, शारिरीक/मानसिक पातळीवर तर ब्राह्मणाचा अंतर्मनातून असतो.
5. शापाच्या प्रक्रियेत, त्रास देणारा , त्रास सहन न होऊन अभद्रवाणी उच्चारणार व त्रास देण्यामागील मुख्य हेतू हे तीन महत्वाचे घटक असतात.
6. त्रस्त व्यक्तीने हातात पाणी घेऊन, ते त्रास देणा-या व्यक्तीच्या अंगावर टाकून, जी अभद्रवाणी निघते तिला शाप म्हणतात.
शाप देणा-याने तो जिवंत असेपर्यंत ऊ:शाप दिला तर ठिक.
नाही तर तो शाप , शाप घेणा-याच्या पुढच्या अनेक पिढ्यांना बाधतो.
**ह्यावर फक्त गुरूच मार्ग दाखवू शकतो.
7. जी अभद्रवाणी हातात पाणी न घेता उच्चारली जाते, त्याला तळतळाट म्हणतात.
तळतळाट देणारी आणि तो तळतळाट घेणारी व्यक्ती ह्या समोरासमोर असाव्या लागतात असे बंधनकारक नाही.
हा प्रायश्चित्त घेतल्याने निघू शकतो.
8. या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचा मुद्दा असा आहे की, शाप ज्याला दिला गेला तो आणि त्याच्या पुढच्या कित्येक पिढ्या त्याचा त्रास(शापाची उकल होऊन,शाप देणाऱ्याची क्षमा याचना करून त्याचे परिमार्जन होई पर्यंत) भोगतातच, पण जो शाप देतो तो पण अडकून राहतो.
शाप देणार्याला सुद्धा मेल्यावर पुढची गती मिळत नाही.
9. ज्या व्यक्तीला किंवा घराण्याला शाप दिला गेला आहे त्यांच्या घराण्यात पुढील काही उणीवा आढळून आल्या आहेत...,
सततच्या शारीरिक तक्रारी, आजारपण, संतती सुखाचा आभाव, गृह सौख्याचा आभाव, नोकरीत क्लेश-बदल,व्यवसायात अस्थिरता,सगळे काही आहे पण त्याचा आनंद उपभोगता येत नाही, मुलं आहेत पण लक्ष्य देत नाहीत,कोणत्याही प्रकारचे लाभ, सुख न मिळणे, सतत ची अस्थिरता, ताण, चिंता, याने माणूस बेजार होतो, त्रास कश्या मुळे होतो आहे हेच कळत नाही.
मग या शापमुक्ती साठी काय करावे?...
तर ते आहे नामस्मरण....
नामस्मरण कसे करावे .....
१. नामाचा उच्चार करणे व तो आपल्या कानांनी एेकणे.
२. नामाचा उच्चार करणे व तो करताना उपासनामूर्ती चरणापासून मस्तकापर्यंत पुन्हा पुन्हा पहात राहणे.
३. भगवंत व भगवन्नाम दोन्ही एकच आहेत या बोधात नामस्मरण करणे.
४. टाहो फोडून नामाचा उच्चार करणे- प्रभू कोठेतरी दूर आहे या भावनेने जप करणे.
५. श्वासोश्वासासी नामस्मरण - श्वास आत घेताना राम म्हणणे. दुसरा उच्छवास बाहेर सोडित असताना व तिसरा पुन्हा श्वास घेताना राम म्हणणे.
६. श्वासावर लक्ष देवून नामस्मरण करणे- या प्रकारात नाम घेत रहाणे व श्वासावर फ़क्त लक्ष ठेवणे.
७. स्वरूपाच्या स्मरणात नामाचा उच्चार - देह म्हणजे मंदिर व या मंदिरातील देवाला तळमळीने हाक मारणे.
८.जीव्हेला वेग देवून नामस्मरण करणे- भटकणारया मनाला लगाम घालून त्याला स्थिर करण्याचे सामर्थ्य या नामस्मरणात आहे.
९. भूती भगवंत या भावात नामस्मरण- भगवंत सर्वत्र भरुन राहिलेला आहे. या भावात नामस्मरण करणे.
१०. सद्गुरुंची मूर्ती मन:चक्षुसमोर ठेवून नामस्मरण- या प्रकारच्या नामस्मरणात साधकाची प्रगती त्वरित होते.
११. संख्या ठरवून माळेवर जप करणे- हा प्रकार दिसावयास सोपा पण अनुभवाच्या दृष्टीने फार श्रेष्ठ आहे.।...
म्हणून मुळातच कधी ही कोणाबद्दल वाईट बोलू नये..निदान चांगले बोलता आले नाही तरी वाईट बोलू नये..
0
Answer link
शाप म्हणजे काय?
शाप म्हणजे एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला वाईटdesired घडण्यासाठी दिलेला नकारात्मक आशीर्वाद किंवा इच्छा. असे मानले जाते की शापामुळे दुर्भाग्य, आजारपण किंवा इतर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
- परिभाषा: शाप ही एक नकारात्मक ऊर्जा आहे जी एखाद्या व्यक्तीच्या इच्छेमुळे दुसऱ्या व्यक्तीला हानी पोहोचवण्यासाठी निर्माण होते.
- स्वरूप: शाप अनेक प्रकारचा असू शकतो, जसे की शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक त्रास.
- उद्देश: शाप देण्याचा उद्देश दुसऱ्या व्यक्तीला दुख देणे, शिक्षा देणे किंवा बदला घेणे असतो.
- परिणाम: शापामुळे व्यक्तीच्या जीवनात नकारात्मक बदल घडू शकतात, जसे की आजारपण, आर्थिक नुकसान किंवा नात्यांमध्ये समस्या.
Disclaimer: या माहितीचा उद्देश फक्त सामान्य ज्ञान देणे आहे.