2 उत्तरे
2 answers

विकास म्हणजे काय ?

7
विकास { Development }

विकास (Development) म्हणजे काळानुसार कुठल्याही गोष्टीत होणारे गुणात्मक, प्रकारात्मक किंवा दर्जात्मक अधिक्य होय. विकास शारिरीक किंवा इतर कोणत्याही संस्थेत (abstract/system) उदा. अर्थव्यवस्था, प्रणाली इ. मध्ये होऊ शकतो. सहसा तो ठराविक एककाच्या पटीत मोजता येत नाही. विकासाच्या मोजमापासाठी वेगळे (सहसा अंमूर्त किंवा संकल्पनात्मक) निकष लावावे लागतात.

काळानुसार अधिक्य होणे हे वाढ आणि विकास या दोन्हींमधे समान असले तरी वाढीत प्रमाणात्मक व विकासात गुणात्मक अधिक्य अभिप्रेत आहे.

उदाहरणार्थ:

संतुलित आहारामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढते.
वयाबरोबर (वाढ) माणसाची प्रगल्भता (विकास) वाढते.
गेल्या काही वर्षांत बँकेच्या ग्राहकसेवेत खूपच वाढ झाली आहे.
उत्तर लिहिले · 3/10/2017
कर्म · 44255
0

विकास म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये सकारात्मक आणि प्रगतीशील बदल होणे.

विकासाचे विविध पैलू आहेत:

  • आर्थिक विकास: देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होणे, उत्पन्न वाढणे.
  • सामाजिक विकास: समाजात चांगले बदल होणे, जसे शिक्षण, आरोग्य सुधारणे.
  • शैक्षणिक विकास: शिक्षण प्रणालीत सुधारणा, साक्षरता वाढवणे.
  • तंत्रज्ञान विकास: नवीन तंत्रज्ञान शोधणे आणि वापरणे.

विकासाचा उद्देश लोकांचे जीवनमान सुधारणे आणि त्यांना अधिक चांगले भविष्य देणे आहे.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1040

Related Questions

गंगाजळी म्हणजे काय?
कर्ज खाते किती प्रकारचे असतात?
स्वातंत्र्य कालावधीनंतरच्या औद्योगिक धोरणांचे व पुनरावलोकनाचे वर्णन करा?
स्वातंत्र्यकाळातील औद्योगिक धोरणांचे वर्णन करा.
रमाई टार्गेट आल्यावरच फाईल द्यावी लागते का?
गरज म्हणजे नक्की काय?
गहाणखत म्हणजे काय?