औषधे आणि आरोग्य घरगुती उपाय त्वचेचे विकार त्वचा रोग आरोग्य

गजकर्ण म्हणजे काय, ते कशामुळे होते आणि त्यावर उपाय काय आहे?

3 उत्तरे
3 answers

गजकर्ण म्हणजे काय, ते कशामुळे होते आणि त्यावर उपाय काय आहे?

21
कितीही भयंकर आणि जुनाट गजकर्ण, खाज, खरुज मुळा सकट संपवतो हा घरगुती उपाय

त्वचा ही आपल्या शरीराचे संरक्षण कवच आहे. बाहेरून होणाऱ्या जीवाणू आणि जंतूंचा ती बऱ्याच प्रमाणात आपल्या शरीराचे रक्षण करते आणि अश्या वेळेस ती स्वत कधी कधी आजारी होते किंवा तिला संसर्ग होतो. त्वचा लाल होते, डाग पडतात, जळजळ होते किंवा त्वचेचा रंग बदलतो आणि सूज येते या सर्व त्वचेच्या एलर्जीचे संकेत आहेत. ही एलर्जी शरीराच्या कोणत्याही भागाला प्रभावित करू शकते.

या एलार्जीचा हा घरगुती उपायाने सुध्दा केला जाऊ शकतो. यासाठी महागड्या औषधांची आवश्यकता नाही आहे.आज आपण अश्याच घरगुती उपाया बद्दल येथे माहीती घेणार आहोत.

लिंबू विटामिन सी चा एक चांगला स्रोत आहे आणि यामध्ये Bleaching गुण पण असतात ज्यामुळे हे त्वचेच्या उपचारासाठी एक चांगला आणि नैसर्गिक औषधी आहे. याचा वापर करताना सुरुवातीला तुम्हाला जळजळ होईल पण लिंबू खाजेवर प्रभावी उपाय आहे. लिंबू मध्ये साइट्रिक एसिड असते जे एलर्जीला अत्यंत प्रभावी पणे बरे करते.
http://aaosairam.blogspot.com​
साहित्य
एक लिंब किंवा,
लिंबाचा रस

वापरण्याची पध्दत
उपाय करण्यासाठी लिंबाचा रस घ्यावा आणि संसर्ग झालेल्या जागी लिंबाचा रस लावा आणि त्याला तसेच सुकण्यासाठी सोडून द्या. हे लावल्या नंतर तुम्हाला थोडी जळजळ होईल आणि त्वचेला त्रास होऊ शकतो. पण तुम्हाला खाजवायचे नाही आहे. सुकल्या नंतर स्वच्छ पाण्याने धुवावे.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
╔══╗       संकलन: नितीन जाधव  
║██║         स्रोत:- आरोग्यविद्या
╚══╝ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ *+९१८६५५४०७६१९*
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █
              🥀 ᵃᵃºˢᵃi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ
आपण हि व या अधिक माहिती खालील संकेत स्थळाला भेट देऊन पाहु शकता
      *http://aaosairam.blogspot.com​*
*नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.*

    *!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!​​*
उत्तर लिहिले · 4/9/2018
कर्म · 569225
12
विशिष्ट सूक्ष्मकवकांच्या संसर्गामुळे होणारा त्वचारोग.ट्रायकोफायटॉन रूब्रम, मायक्रोस्पोरमकॅनिस आणि एपिडर्मोफायटॉन फ्लॉकोसम या तीन जातींच्या कवकांमुळे गजकर्ण होतो. प्रामुख्याने डोक्याची त्वचा, हाताचे तळवे, मनगटे, काखा, जांघा, मांड्या, हातापायांच्या बोटांमधील जागा इ. शरीराच्या वेगवेगळ्या भागांत हा रोग होऊ शकतो. या रोगात त्वचेवर वर्तुळाकार किंवा अंगठीप्रमाणे लालसर चट्टे उठतात. हळूहळू त्यावर पांढरे कोंड्यासारखे पापुद्रे तयार होतात. बहुधा त्या भागाला खूप खाज सुटते. शरीराच्या भागानुसार गजकर्णाचे प्रकार ओळखले जातात. उदा. डोक्याच्या गजकर्णाला खवड्या, तर पायाच्या बोटांमधील गजकर्णाला चिखल्या म्हणतात. लहान मुलांमध्ये गजकर्ण होण्याचे प्रमाण अधिक असते. गजकर्णाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीचे कपडे, कंगवा व ब्रश वापरल्यास हा रोग होऊ शकतो. स्नानगृह, तरणतलाव, केशकर्तनालय इ. सार्वजनिक माध्यमांतून त्याचा प्रसार होण्याची शक्यता असते. प्राण्यांमध्येदेखील गजकर्ण आढळतो. कोंबड्या, ससे, गायी, मांजरे, कुत्रे, घोडे इ. प्राण्यांत हा रोग दिसून येतो. मात्र या प्राण्यांच्या पिल्लांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. या प्राण्यांच्या संपर्कामुळेही हा रोग लहान मुलांमध्ये पसरू शकतो. संसर्ग झालेल्या कवकाच्या प्रकारानुसार गजकर्णावर इलाज केले जातात. कोणत्या प्रकारचा कवक आहे हे सूक्ष्मदर्शकाने ठरविता येते. यासाठी गजकर्ण झालेल्या त्वचेचा लहान तुकडा सूक्ष्मदर्शकाखाली पाहतात. आवश्यकता भासल्यास कवक संवर्धन करतात आणि त्याचा प्रकार ठरवितात.
यावर उपचार करताना मलम आणि औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत तसेच स्वछता राखणे महत्वाचे आहे .

उत्तर लिहिले · 26/9/2017
कर्म · 11985
0

गजकर्ण (Ringworm) हा एक त्वचेचा संसर्ग आहे जो बुरशीमुळे होतो. याला 'ringworm' म्हणतात कारण त्यात त्वचेवर लाल रंगाचे गोल चट्टे येतात.

कारणे:

  • बुरशी: गजकर्ण हा ' dermatophytes' नावाच्या बुरशीमुळे होतो.CDC
  • संपर्क: हा संसर्ग दूषित वस्तू, जमीन किंवा प्राण्यांच्या संपर्कात आल्याने होऊ शकतो.
  • ओलावा: घाम येणे आणि ओलावा यामुळे बुरशी वाढते.

लक्षणे:

  • त्वचेवर लाल, गोल चट्टे
  • खाज येणे
  • त्वचा खरखरीत होणे

उपाय:

  1. क्रीम आणि लोशन: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँटीफंगल क्रीम (Antifungal cream) लावा.
  2. स्वच्छता: प्रभावित भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवा.
  3. कपडे: रोज आपले कपडे बदला आणि ते धुवून उन्हात वाळवा.
  4. डॉक्टरांचा सल्ला: गंभीर संसर्गासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करा.

ॲंटी-फंगल औषधे (Anti-fungal medicines):

  • केटोकोनाझोल (ketoconazole)
  • मायकोनाझोल (miconazole)
  • टेर्बिनाफाइन (terbinafine) NHS

टीप: हा लेख केवळ माहितीसाठी आहे. कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 980

Related Questions

त्वचेला रोग होण्याची कारणे काय आहेत?
गजकर्ण जातच नाही, खूप उपाय केलेत?
सोरायसिस कोणता आजार आहे?
गजकर्णावर स्किन स्पेशलिस्टकडून कोर्स पूर्ण केल्यावर गजकर्ण कायमचे बरे होईल का?
गजकर्ण वर काही उपाय आहे का ?
नागीण त्वचा रोगबद्दल माहिती मिळेल का?
माझा फंगल इन्फेक्शनचा प्रॉब्लेम कमी होत नाही? डॉक्टरकडे गेलो की थोडे दिवस कमी होत मग परत येतं, काय करू?