2 उत्तरे
2
answers
कोर्ट मॅरेज करण्याची प्रोसेस काय आहे?
28
Answer link
देवस्थानच्या ठिकाणी केले जाणारे प्रेमविवाह म्हणजेच कोर्टमॅरेज, असा अनेक जणांचा समज असतो; पण तसे नसते, तर कोणत्याही धार्मिक विधीशिवाय विवाह अधिकाऱ्यासमोर पती-पत्नी आणि ३ साक्षीदार यांच्या स्वाक्षरीने होणारा विवाह म्हणजे "नोंदणी पद्धतीचा विवाह' होय. या विवाहाची नोंदणी १९५४ च्या स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार केली जाते. या ॲक्टनुसार विवाह केल्यावर वेगळ्या विवाह नोंदणीची गरज नसते. नोंदणी पद्धतीच्या विवाहासाठीही तीन साक्षीदार असणे आवश्यक आहे.
प्रक्रिया
नोंदणी पद्धतीने विवाह करण्याची सोय प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलेली असते.ज्या वधू आणि वर यांना नोंदणी पद्धतीने लग्न करावयाचे आहे, त्यांनी विशिष्ट पद्धतीचा अर्ज विवाह अधिकाऱ्याला भरून द्यावा. यालाच नोटीस असेही म्हणतात.नोटीस दिल्यानंतर विवाह अधिकारी, मॅरेज नोटीस बुकमध्ये त्याची नोंदणी करतो.नोटीस बुकमध्ये नोंदणी केल्यानंतर ती नोटीस विवाह अधिकाऱ्याला कार्यालयाच्या सूचना फलकावर लावणे बंधनकारक असते.विवाह करण्यासाठी अर्ज केलेल्या वधू - वर यांच्यापैकी कोणाही एकाचे, नोटीस देण्याअगोदर त्या भागात किमान तीस दिवस वास्तव्य असणे आवश्यक असते.वधू- वर यांनी ज्या ठिकाणी अर्ज केला आहे, ते त्या भागाचे कायमचे रहिवासी नसतील तर तसे त्या नोटिशीत नमूद करून ते ज्या ठिकाणचे रहिवासी आहेत, त्या ठिकाणच्या कार्यालयातदेखील विवाह अधिकारी ती नोटीस लावू शकतो.नोटीस लावल्यानंतर जर कुणाला या विवाहाबद्दल आक्षेप असेल, तर तो आक्षेप लेखी स्वरूपात ३० दिवसांच्या आत नोंदविणे आवश्यक असते. आक्षेप आल्यास विवाह अधिकारी त्याची तपासणी करतो. आक्षेप निर्मूलन पूर्णपणे होत नाही तोपर्यंत विवाहाची नोंदणी करता येत नाही.नोटीस ३० दिवस सूचना फलकावर ठेवली जाते, त्यावर कोणतेच आक्षेप आले नाहीत, तर विवाह नोंदणीची प्रक्रिया केली जाते. विवाह अधिकाऱ्यासमोर वर आणि वधू यांना तीन साक्षीदारांच्या समोर विवाहाची शपथ देण्यात येते. त्यानंतर विवाह अधिकारी विवाह नोंदणी पुस्तिकेत विवाहाची नोंद करतात.नोटिशीवर आक्षेप न आल्यास त्यानंतर ६० दिवसांच्या आत विवाह करणे आवश्यक आहे. त्यापेक्षा जास्त दिवस झाल्यास संबंधित नोटीस बेकायदा मानण्यात येते.विवाह निबंधक कार्यालयात तसेच वधू-वर यांच्या सोयीनुसार कोणत्याही ठिकाणी हे विवाह केले जातात; मात्र ठिकाण बाहेरचे असेल तर नोंदणी करण्यासाठी विवाह अधिकारी प्रत्यक्ष विवाहाच्या वेळी उपस्थित राहणे आवश्यक असते.नोटिशीच्या तीन प्रती सादर कराव्या लागतात. त्यातील एक प्रत वधू-वर यांच्याकडे देण्यात येते. विवाह नोंदणीच्या वेळी ती प्रत सोबत घेऊन यावी लागते.धार्मिक पद्धतीने विवाह करताना जी कागदपत्रे सादर केली जातात, तीच कागदपत्रे नोंदणी पद्धतीने विवाह करताना सादर करावी लागतात.
विवाह प्रमाणपत्र / विवाह दाखला
कोर्ट केसेस, वारसाहक्क, रेशनकार्ड मध्ये नाव समाविष्ट करणे अथवा कमी करणे,पासपोर्ट,गोत्र परिवर्तन आदी कारणांसाठी विवाह प्रमाणपत्राची आवश्यकता असते. विवाहासाठी पुरुषाचे वय २१ व स्त्रीचे वय १८ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे.विवाह नोंदणी विवाह तारखेपासून ९० दिवसांच्या आत करावी.जर ९० दिवसांपेक्षा काही कारणास्तव उशीर झाल्यास दंड रक्कम भरून नोंदणी करता येते.विवाह नोंदणी अधिनियान्व्ये वर किंवा वधू ज्या ठिकाणी राहतात त्यापेकी एक विवाह निबंधकाचे कार्यालयात नोंदवायची आहे.विवाह निबंधकाचे कार्यालय तहशील कार्यालयात असते.
नोंदणीसाठी १०० रु किंवा निश्चीत केलेले शुल्काची कोर्ट फी स्टॅम्प अथवा कार्यालयाच्या पध्दतीप्रमाणे भरावे.विवाह नोंदणीसाठी वर वधू यांच्या सह तीन साक्षीदार ओळखपत्र पासपोर्ट साईज रंगीत फोटो सह सादर करावे.
विवाह नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
वर व वधू यांचा रहिवासी पुरावा ज्यात रेशन कार्ड,दूरध्वनी बिल,वीज बील,पासपोर्ट यांच्या मूळप्रतीसह झेरॉक्स सत्यप्रत वर व वधू यांचा वयाचा दाखला उदा.शाळा सोडल्याचा दाखला,जन्माचा दाखला यांच्या मूळ प्रतीसह सत्यप्रती.लग्नाची निमंत्रण पत्रिका जर लग्नाची निमंत्रण पत्रिका नसल्यास वर वधू तीन साक्षीदार व पुरोहित यांचे ठराविक नमुन्याप्रमाणे जनरल स्टॅम्प रु.१०० वर प्रतिज्ञा पत्र व लग्नविधीचे प्रसंगीचे फोटो.तीन साक्षीदार रहिवासी पुरावे उदा.रेशनकार्ड,पासपोर्ट,मतदान,ओळखपत्र यांची मूळप्रतीसह सत्यप्रत.वर वधू घटस्पोटीत असल्यास कोर्टाचे हुकुमनाम्याची सत्यप्रत.वर वधू विधुर विधवा असल्यास संबंधित मयत व्यक्तीचे मृत्यू दाखला व त्याची सत्यप्रत जोडावी.वरील बाबींची पूर्तता करून विवाह निबंधक यांचेकडून विवाह प्रमाणपत्र नमुना इ.आय मधील मागणी करून घ्यावे.

0
Answer link
कोर्ट मॅरेज करण्याची प्रोसेस (Court Marriage Process) खालीलप्रमाणे आहे:
-
नोटीस देणे:
- कोर्ट मॅरेज करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या विवाह निबंधक कार्यालयात (Marriage Registrar Office) नोटीस द्यावी लागते.
- नोटीसमध्ये तुमचे नाव, पत्ता, जन्म तारीख, वैवाहिक स्थिती (status) आणि इतर आवश्यक माहिती नमूद करावी लागते.
- तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता, त्या जिल्ह्यातील विवाह निबंधक कार्यालयात नोटीस देणे आवश्यक आहे.
-
नोटीसचा कालावधी:
- नोटीस दिल्यानंतर 30 दिवसांचा कालावधी असतो. या काळात विवाह निबंधक कार्यालयात तुमच्या लग्नावर कोणाची काही हरकत आहे का, हे पाहिले जाते.
- जर 30 दिवसांच्या आत कोणाची हरकत नसेल, तर तुम्ही पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरता.
-
कागदपत्रे (Documents):
- अर्जदारांचे ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, इ.)
- पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड, लाईट बिल, पाणी बिल इ.)
- जन्म दाखला (Birth Certificate)
- दोघांचे पासपोर्ट साईझ फोटो
- जर घटस्फोट झाला असेल, तर घटस्फोटाचा दाखला
- जर विधवा/ विधुर असाल, तर मृत्यू दाखला
- प्रतिज्ञापत्र (Affidavit)
-
विवाह नोंदणी:
- 30 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर, तुम्हाला विवाह निबंधक कार्यालयात पुन्हा भेट द्यावी लागते.
- तिथे तुम्हाला आणि तुमच्या साक्षीदारांना (Witness) काही कागदपत्रांवर सही करावी लागते.
- विवाह निबंधक तुमच्या लग्नाची नोंदणी करतात आणि तुम्हाला विवाह प्रमाणपत्र (Marriage Certificate) देतात.
-
साक्षीदार (Witness):
- कोर्ट मॅरेजसाठी तुम्हाला दोन साक्षीदारांची आवश्यकता असते.
- साक्षीदार तुमचे मित्र, नातेवाईक किंवा ओळखीचे कोणीही असू शकतात.
- साक्षीदारांचे ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
टीप: कोर्ट मॅरेजच्या नियमांनुसार, अर्जदार त्याच जिल्ह्यातील रहिवासी असावा जेथे तो अर्ज करत आहे.
अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील विवाह निबंधक कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
Source: Court Marriage Act