2 उत्तरे
2
answers
सतीबंदी कायदा कोणी स्थापन केला?
1
Answer link
इ.स. १८१२ मधे राजा राममोहन रॉय यांचे थोरले बंधू जगन्मोहन यांचा मृत्यू झाला. त्याप्रसंगी त्यांच्या कुटुंबियांनी बळजबरीन जगन्मोहन यांच्या पत्नीला सती जायला लावल. राम मोहन यांनी त्याप्रसंगी विरोध केला, पण तो प्रकार थांबवू शकले नाहीत.
त्या काळात स्त्रीया सती जाण्याच प्रमाण प्रचंड होत. तत्कालीन पंडीतांच्या मते पतीच्या मृत्यूनंतर विधवा स्त्रीपुढे दोनच पर्याय असत. एक म्हणजे सर्व सुखांचा त्याग करून अत्यंत कठोर नियमांनी बद्ध अस जीवन जगणे किंवा दुसरा पर्याय म्हणजे सती जाणे. एकदा स्त्रीनं सती जाण्याचा निर्णय घेतला असता तिला त्यापासून परत फिरता येत नसे. अर्थात ज्या समाजात स्त्रीला मूळातच दुय्यम स्थान होत (/आहे) आणि जिला स्वतःचा आवाजच नव्हता ती हा निर्णय स्वतः घेत असेल ही शक्यताही धूसरच आहे.
भावनेच्या भरात एखाद्या स्त्रीन असा निर्णय घेउन नंतर चितेवर गेल्यावर तिथून परत फिरायचा प्रयत्न केला तर तिला मोठ्या मोठ्या बांबूंच्या सहाय्यान आत ढकलंल जात असे. तिचा आक्रोश कोणाला ऐकायला येउ नये यासाठी तिथ मोठ-मोठी वाद्य वाजवली जात.
राम मोहन बाबू स्मशानात जाउन सती जाणार्या स्त्रीयांच मन वळवायचा, त्यांना सती जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत.
ब्रिटीश इस्ट इंडीया कंपनीन १७९८ साली कलकत्त्यामधे सर्वप्रथम सतीबंदी कायदा लागू केला. परंतु हा फक्त कलकत्ता शहरापुरताच लागू होता.
४ डिसेंबर १८२९ रोजी, राजा राम मोहन रॉय आणि इतरांच्या प्रयत्नाला यश येउन, सती प्रथा बंद करण्याविषयीच विधेयक लॉर्ड विल्यम बेंन्टीन्क गव्हर्नर जनरल, व्ह्यायकाऊंट काँबरमीअर कमांडर-इन-चीफ, डब्ल्यू. बी. बेयले आणि सर सी. टी. मेटकाफ यांच्या संयुक्त समीतीन संमत केल.

0
Answer link
येथे तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे:
सतीबंदी कायदा लॉर्ड विलियम बेंटिक यांनी 1829 मध्ये स्थापन केला. त्या कायद्यानुसार, विधवांना जिवंत जाळण्याची प्रथा (सती) भारतात बेकायदेशीर ठरवण्यात आली.
विलियम बेंटिक हे भारताचे गव्हर्नर-जनरल होते आणि त्यांनी भारतातील सामाजिक सुधारणांसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
सती प्रथेच्या निर्मूलनासाठी राजा राममोहन रॉय यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांनी या प्रथेविरुद्ध जनजागृती केली आणि सरकारला कायदा बनवण्यास प्रवृत्त केले.