संविधान बांधकाम रिअल इस्टेट रेरा महाराष्ट्राचा इतिहास

मला महाराष्ट्र बांधकाम क्षेत्रातील नवीन रेरा (RERA) नियम आणि त्यासंबंधित मराठी पीडीएफ फाइल मिळू शकेल का?

2 उत्तरे
2 answers

मला महाराष्ट्र बांधकाम क्षेत्रातील नवीन रेरा (RERA) नियम आणि त्यासंबंधित मराठी पीडीएफ फाइल मिळू शकेल का?

3
⚀सामान्य ग्राहकांची फसवणूक करणाऱया बिल्डरांभोवती फास आवळणारा रिअल इस्टेट रेग्युलेशन ऍण्ड डेव्हलपमेंटऍक्ट म्हणजेच ‘रेरा’ कायदा १ मेपासून लागू झाल्याने आता ग्राहकांनी घर घेताना निर्धास्त राहावे. 
कारण हा कायदा ग्राहकांसाठी फायदेशीरआहे. त्यांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात बिल्डरांकडून येणाऱया अडचणी या कायद्यामुळे दूर झाल्या आहेत. 
☙प्रकल्प नोंदणी शिवाय घरे विक्रीस मनाई 
बिल्डरांना यापुढे निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प उभारायचे असतील तर त्यांची नोंदणी तीन महिन्यांत म्हणजे ३१ जुलैपर्यंत महाराष्ट्र रिअल इस्टेट नियंत्रण प्राधिकरणाकडे करणे ‘रेरा’ कायद्यान्वये सक्तीचे आहे. अन्यथा प्रकल्पाची जाहिरात, विक्री किंवा त्यात गुंतवणूक करता येणार नाही. नोंदणी न केल्यास प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी १० टक्के रक्कम दंडकेला जाणार आहे.  तुरुंगवासाच्या शिक्षेचेही तरतूद केली गेली आहे. याशिवाय बिल्डरला दर तीन महिन्यांनी प्रकल्पाच्या स्थितीची माहिती प्राधिकरणाला द्यावी लागेल.दलालांनाहीचापघर खरेदी-विक्रीचा व्यवहार करणाऱया दलालांना त्यांची नोंदणी प्राधिकरणाकडे करावी लागेल अन्यथा त्यांना व्यवहार केल्याच्या दिवसापासून दर दिवसाला दहा हजार रुपये दंडाची तरतूद आहे. त्यानंतरही कायदा मोडल्यास संबंधित भूखंड, इमारत किंवा प्रकल्पाची पाच टक्के रक्कम दंड स्वरूपात वसूल केली जाईल. 
☙ऑनलाइन माहिती देण्याची सक्ती प्रकल्पाबद्दलची सर्व माहितीबिल्डरांना ग्राहकांसाठी तसेच प्राधिकरणासाठी ऑनलाइन उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. प्रकल्पाच्या जमिनीची किंमत, विकास करार, बांधकाम खर्च, मंजूर झालेल्या योजना, पार्किंग लॉट, मोकळी जागा आदी इत्थंभूत माहिती द्यावी लागेल. प्रकल्प किती कालावधीतपूर्ण होणार त्याची प्रत्येक टप्प्याची माहिती जाहीर करावी लागेल.ग्राहकदेवोभवः*.मंजूर झालेल्या प्रकल्पात दोनतृतीयांश ग्राहकांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय फेरबदल करण्याचा बिल्डरला अधिकार नाही.*.ग्राहकांची जात-धर्म पाहून घरविकता येणार नाही.*.प्रकल्पाला विलंब झाल्यास ग्राहकांना कर्जाच्या हप्त्यांवरील दरमहा व्याज बिल्डरकडून मिळणार.*.बिल्डरला प्रकल्पासाठी ग्राहकांकडून घेतलेली ७० टक्के रक्कम स्वतंत्र बँक खात्यात ठेवावी लागणार आणि तिचा वापर फक्त बांधकामासाठीच करता येणार.*.घरात राहायला आल्यानंतर पाच वर्षांत प्रकल्पात काही चूक आढळल्यास बिल्डरला विनामूल्यदुरुस्ती करावी लागेल. अन्यथाग्राहकांना त्याची भरपाई मागता येईल.तक्रारकशीकरावी?ग्राहक प्राधिकरणाकडे तक्रारकरू शकतात. त्यांच्या तक्रारीचे निरसन ठरावीक मुदतीत करण्याची तरतूदही कायद्यात आहे. प्राधिकरणाने दिलेल्या निर्णयाबद्दलही ग्राहक असमाधानी असतील तर ते लवादाकडे किंवा उच्च न्यायालयातही अपील करू शकतात.घरांच्यादरांवर‘रेग्यूलेशन’गरजेचेकोणतीही रेग्यूलेटरी संस्था ही दर ठरवण्याचे काम करत असते.‘रेरा’ हा कायदा फक्त नावाला ‘रेग्यूलेटर’ आहे. त्यात घरांचे दर ठरवण्याचे अधिकार कायद्याला नाही तर बिल्डरला ठेवले गेले आहेत. बिल्डर करेल त्या करारावर ग्राहकाला स्वाक्षरी करावी लागते, ग्राहकाचे मत विचारात घेतले जात नाही. असा करार बिल्डरने पाळला नाही तरच ‘रेरा’अन्वये कारवाई होणार. मग ‘रेग्यूलेशन’ कसले? असा सवाल ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर प्रभू यांनी विचारला आहे.
उत्तर लिहिले · 13/9/2017
कर्म · 5180
0

महाराष्ट्रामधील बांधकाम क्षेत्रासाठीचे नवीन रेरा (RERA) नियम आणि संबंधित माहिती खालीलप्रमाणे:

रेरा (RERA) म्हणजे काय?

रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (Real Estate Regulatory Authority). हे बांधकाम क्षेत्राला अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी बनवण्यासाठी तयार करण्यात आले आहे.

रेराचे नियम:
  • नोंदणी (Registration): सर्व बांधकाम प्रकल्पांना रेरा अंतर्गत नोंदणी करणे अनिवार्य आहे.
  • पारदर्शकता (Transparency): प्रकल्पाची माहिती, बांधकाम स्थिती आणि इतर तपशील नियमितपणे अपडेट करणे आवश्यक आहे.
  • जबाबदारी (Accountability): विकासकांनी (Developers) वेळेवर प्रकल्प पूर्ण करणे आणि ग्राहकांना वेळेत ताबा देणे बंधनकारक आहे.
  • तक्रार निवारण (Grievance Redressal): ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जलद प्रक्रिया उपलब्ध आहे.
नवीन नियम आणि अद्यतने:

रेरा कायद्यात वेळोवेळी सुधारणा होत असतात. त्यामुळे, नवीनतम नियम आणि बदलांसाठी महाराष्ट्र रेराच्या अधिकृत वेबसाइटला भेट देणे उपयुक्त आहे.

मराठी पीडीएफ फाइल (Marathi PDF File):

महाराष्ट्र रेराच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला मराठीमध्ये माहिती मिळू शकेल. तसेच, तुम्ही खालील संकेतस्थळाला भेट देऊन माहिती मिळवू शकता:

  1. महाराष्ट्र रेरा अधिकृत वेबसाईट:

    तुम्ही महाराष्ट्र रेरा (MahaRERA) च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. MahaRERA

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5060

Related Questions

रेरा कायद्याबद्दल माहिती द्या?
अ‍ॅमिनिटी स्पेस विकता येते का? विक्री झाल्यास त्यावर घर बांधता येते का?
ग्रीन प्रॉपर्टी, येलो प्रॉपर्टी यात काय फरक आहे?
एक एमक्‍यूबी म्हणजे किती?
विमान नगर व कल्याणी नगरमधील फ्लॅटचे भाडे का वाढले आहेत?
नवीन रो-हाऊस किंवा रो-बंगला विकत घेताना कोणती कागदपत्रे तपासावी?
अपार्टमेंट व हाउसिंग सोसायटीत नेमका भेद/फरक काय आहे?