आजार पोषण आरोग्य

अ जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग उद्भवतो?

3 उत्तरे
3 answers

अ जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग उद्भवतो?

4
'अ'जीवनसत्त्वाच्या अभावाने आधी रातांधळेपणा येतो.
डोळयाच्या आरोग्यासाठी'अ'जीवनसत्त्वाचा पुरवठा होणे आवश्यक आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये या जीवनसत्त्वाच्या अभावाचा परिणाम तीव्र असतो. हिरव्या पालेभाज्या,पिवळी व लाल फळे (आंबे,पपई,गाजर),शेवगा,मांसाहारातील यकृत,इत्यादींमध्ये जीवनसत्त्व'अ'भरपूर प्रमाणावर असते. यामुळे रात्री जेवताना हात ताटात चाचपडत राहतो. यापुढे श्वेतपटलावर पांढरे ठिपके (बिटॉट स्पॉट),बुबुळ व नेत्रअस्तराचा कोरडेपणा,बुबुळाचा धुरकटपणा,बुबुळावर जखमा व मग फूलपडणे,नेत्रपटलाची हानी होणे,इत्यादी बदल होतात. रातांधळेपणाच्या अवस्थेतच'अ'जीवनसत्त्वाचा डोस दिला पाहिजे (दोन लाख युनिट).आरोग्य केंद्रातर्फे मुलांना असा प्रतिबंधक डोस दर सहा महिन्यांनी दिला जातो. यामुळे हा आजार आता पुष्कळ कमी झाला आहे. आपली रोगप्रतिकारशक्तीही'अ'जीवनसत्वामुळे टिकून राहते.
उत्तर लिहिले · 19/8/2017
कर्म · 210095
4
डोळ्यांशी निगडित सगळे आजार उदा. चष्मा लागणे, रातांधळेपणा. तसेच हाडांची वाढ, शरीराची जळजळ कमी करणे, श्वासोच्छ्वास सुरळीत ठेवणे, मुत्रपिंडात जळजळ न होऊ देणे असे काम जीवनसत्व 'अ' चे आहेत. त्याचा अभाव झाल्यास या क्रियांवर परिणाम होऊ शकतो.
उत्तर लिहिले · 20/8/2017
कर्म · 28020
0

अ जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा (Night Blindness) हा रोग उद्भवतो.

रातांधळेपणा: या रोगामध्ये व्यक्तीला रात्रीच्या वेळी किंवा कमी प्रकाशात स्पष्टपणे दिसत नाही.

उपाय: अ जीवनसत्वयुक्त पदार्थांचे सेवन करणे, जसे की गाजर, पालक, टोमॅटो, पपई, आणि दूध.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1680

Related Questions

प्रत्येक घास खाताना पोट गच्च व घास अडकल्यासारखे होते का?
खाताना छातीत जळजळ होते?
ताण-तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणत्या प्रभावी पद्धती आहेत?
महिला पाळी आल्यावर कशाचा उपयोग करतात?
वजन वाढवण्यासाठी उपाय व वय ३८ वर्ष?
आहाराव्यतिरिक्त प्रथिने मिळवण्यासाठी काही सप्लिमेंट्स आहेत का?
डाएट प्लॅन कसा करायचा?