4 उत्तरे
4 answers

सायको म्हणजे काय?

9
सायको म्हणजे मनोरुग्ण ....
मानसिक आजार ही एक वैदयकीय अवस्था असून यामध्ये माणसाच्या भावना, विचार, परस्पर सबंध व दैनंदीन जीवनातल्या गोष्टी यावर विपरित परिणाम होतो. ज्याप्रमाणे मधुमेह हा स्वादूपिंडाचा (pancreas) आजार असतो त्याचप्रमाणे मानसिक आजार हा सुध्दा एक वैदयकीय आजार असून दैनंदीन जीवनात विविध नित्यं गरजा पुरविताना त्या मुळे अडचण निर्माण होते.

उदासिनता

थकवा येणे, झोप न येणे, भूक कमी होणे, गळून गेल्यासारखे वाटणे.सतत उदास , निराश वाटणे, सर्व गोष्टीचा कंटाळा येणे.आवडणा-या गोष्टीमध्ये, मन न लागणेशारिरीक लक्षणे उदा. जीव घाबरणे, धडधड होणे किंवा दुखणे.वैयक्तिक सामाजिक कौटुंबिक , व्यावसायिक आणि शैक्षणिक जबाबदा-या पार पाडण्याची असमर्थता येणे.

वेडसरपणा

भ्रामक कल्पना (चुकीची पण ठाम अशी समजूत / संशय)वर्तणुकीतील दोष ( उदा. शरीराची निगा, काळजी न राखणे, असंबंधित बोलणे)भास ( उदा. कानात विविध आवाज येणे, डोळयांसमोर चिञ – विचिञ गोष्टी दिसणे इ. )उन्माद अवस्था ( अतिउत्साही वाटणे, विनाकारण आनंदी होणे, अकारण बडबडत राहणे इ.)

मदयपान

दारूच्याच नशेत असल्याचा अवतार ( चेहरा सुजलेला, डोळे तारवटलेले आणि तोंडाला दारुचा वास इ. )मदयपानाचे दुष्परिणाम ( झोप न येणे उलटी, मळमळ, पोटात आग होणे, डोके जड होणे इ. )दैनंदीन जीवनातील / सामाजिक जीवनातील / कामाच्या ठिकाणी दर्जा घसरणे

स्मृतिभ्रंश

स्मंरणशक्ती कमी होणे, काळ, ठिकाण यांचे भान न राहणे.चिडचिड किंवा भ्रमिष्ट होणेदैनंदीन जीवनात साध्या जबाबदा-या पार पाडू न शकणे.

मुलांच्या वर्तणुकीत दोष

लक्ष न देणे, उतावीळपणा, संयमाचा अभाव.मानसिक चंचलता, एका ठिकाणी बसू न शकणे, अस्वस्थ असणे.इतरांना उपद्रव होईल अशा प्रकारे वागणे ( उदा. हटृी , जिदृीपणा, कठोर वतर्णूक जेष्ठां चा अवमान करणे, आज्ञेचे पालन न करणे )
उत्तर लिहिले · 19/8/2017
कर्म · 458560
3
सायको म्हणजे जो डोक्याने थोडा कमजोर आहे, ज्या व्यक्तीला मस्करी सहन होत नाही, छोट्याशा गोष्टीवरून मोठा वाद करतो त्याला सायको म्हणतात.
उत्तर लिहिले · 19/8/2017
कर्म · 700
0

सायको हा शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो. सामान्यतः, हा शब्द मानसिक आरोग्याच्या समस्यांशी संबंधित असतो.

सायको चा अर्थ:

  • मानसिक रोगी: सायको म्हणजे मानसिक रोगी, ज्याला मानसिक आजार आहे.
  • असामान्य वर्तन: ज्या व्यक्तीचे वर्तन सामान्य नाही, त्याला सायको म्हटले जाते.
  • हिंसक: काहीवेळा, हिंसक किंवा धोकादायक व्यक्तीला सायको म्हणतात.

सायको हा शब्द नकारात्मक अर्थाने वापरला जातो आणि त्याचा वापर समाजात stigmatizing (तिरस्कार निर्माण करणारा) असू शकतो.

जर तुम्हाला मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल अधिक माहिती हवी असेल, तर कृपया एखाद्या मानसिक आरोग्य व्यावसायिकाची मदत घ्या.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 980

Related Questions

भावनाशून्य माणसे असू शकतात का?
खरा आनंद म्हणजे काय? तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे आनंद मिळतो?
सामाजिककरण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे?
आपण एखाद्याबद्दल विचार करत आहात असे वाटते तेव्हा ते देखील आपल्याबद्दल विचार करत असतात का?
आपला कोणीतरी फायदा घेतोय हे कसं समजणार?
जेव्हा जुना मित्र परका वाटू लागतो, तेव्हा दोष नात्याचा असतो की वेळेचा?
खरं सुख कुठे आहे – आपल्या गरजांमध्ये की आपल्या समाधानात?