2 उत्तरे
2 answers

मानसशास्त्र म्हणजे काय ?

8
मानसशास्त्र (इंग्लिश: Psychology, सायकॉलजी ;) हे मन व वर्तणूक यांचा अभ्यास करणारे विज्ञान आहे. हा शब्द इ.स.च्या १६ व्या शतकात तयार केला गेला. या ग्रीकशब्दाचा अर्थ आत्म्याचे शास्त्र असा आहे. यावरून त्या काळातला या शास्त्रावरचा धार्मिक प्रभाव लक्षात येईल. परंतु काही तत्त्वज्ञांनी यास आक्षेप घेतला. 'आत्मा' ही एक गूढ, अमूर्त, सिद्ध न करता येण्याजोगी संकल्पना आहे. त्यामुळे 'आत्म्याचा' शास्त्रशुद्ध अभ्यास करणे शक्य नाही. हा विचारप्रवाह विकसित होऊन मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून अभ्यास व्हायला १९ वे शतक उजाडावे लागले. त्यावेळी 'मनाचे शास्त्र' किंवा 'मानसिक जीवनाचे शास्त्र'(the science of mental life) अशी त्याची व्याख्या केले गेली. या काळात मानसशास्त्रज्ञ स्वयंसेवकांना त्यांच्या मानसिक अनुभवांचे (उदा. संवेदना, विचार, भावना इ.)वर्णन करावयास सांगत. परंतु इ.स.च्या २० व्या शतकाच्या सुरुवातीला पुढे आलेल्या मतानुसार शास्त्रात केवळ दृश्य आणि मापनीय अशाच घटकांचा अभ्यास करता येतो. मन ही अदृश्य संकल्पना आहे तिचे मापन करता येत नाही. हाच विचार पुढे वर्तनवाद (beheviourisim)या नावाने प्रसिद्ध झाला. त्यामुळे या काळात मानसिक अनुभवांऐवजी बाह्यवर्तनांचा अभ्यास करण्यावर भर दिला गेला. कारण बाह्यवर्तन दृश्य स्वरूपाचे आहे. त्यामुळे इ.स. १९२० च्या सुमारास मानवी वर्तनांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केली गेली. ही व्याख्या इ.स. १९६० च्या दशकापर्यंत स्वीकारली जात होती; परंतु त्यांनंतर मनाच्या अभ्यासात मानशास्त्रज्ञांना परत रस निर्माण झाला. 'मन' हा शब्द मानसशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात दिसू लागला. आणि मानसशास्त्राची व्यापक व्याख्या अशी केली गेली - वर्तनांचा आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र. यात मानसिक प्रक्रियांचाही शास्त्रीय अभ्यास करता येतो असे गृहीत धरले आहे. उदाहरणार्थ, मुलाखतसारख्याव्यक्तिमत्त्व चाचण्यांवरून माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो. मनात निर्माण झालेल्या भावनांमुळे जे शरीरांतर्गत बदल घडून येतात, त्यांचे मोजमाप करता येते. थोडक्यात अदृश्य अश्या मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय अभ्यास करता येतो, हे आता सर्वमान्य झाले आहे. वर्तन हे दृश्य व मापनीय असते. त्यामुळे वर्तनाचाही शास्त्रीय अभ्यास शक्य आहे.

'मानसशास्त्र' म्हटल्यानंतर मनासारख्या गूढ गोष्टींचा अभ्यास करणारे शास्त्र अशी अनेकांची समजूत असते. मानसशास्त्र शिकलेल्या व्यक्तीला काही प्रश्न नेहमी विचारले जातात. उदाहराणार्थ, तुम्हाला लोकांच्या मनातले सगळे कळते का? तुम्ही लोकांच्या मनातले कसे काढू्न घेतां? तुम्ही लोकांना मोहनिद्रेत (हिप्नोटाइज)कसे आणता? तुम्ही मनकवडे आहात का? इत्यादी.

उत्तर लिहिले · 4/8/2017
कर्म · 2910
0
उत्तर:

मानसशास्त्र म्हणजे मानवी मन आणि वर्तन यांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे.

हे शास्त्र मानवी अनुभव, विचार, भावना आणि कृती समजून घेण्याचा प्रयत्न करते.

मानसशास्त्राच्या अभ्यासात खालील गोष्टींचा समावेश होतो:

  • संज्ञानात्मक प्रक्रिया: स्मरणशक्ती, विचार, समस्या- निराकरण.
  • भावनिक प्रक्रिया: आनंद, दु:ख, राग, भीती.
  • वर्तणूक: सामाजिक वर्तन, व्यक्तिमत्व, सवयी.
  • विकास: बालपण, पौगंडावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था या टप्प्यांवर होणारे बदल.
  • मानसिक आरोग्य: मानसिक विकारांचे निदान आणि उपचार.

मानसशास्त्र हे एक व्यापक क्षेत्र आहे आणि ते शिक्षण, आरोग्य, व्यवसाय आणि क्रीडा यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये उपयोगी आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइट्सला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2220

Related Questions

आशा टीपा लिहा?
माझे मित्र मला माझ्या रंगावरून वाईट बोलतात आणि त्यामुळे मी स्वतःबद्दल खूप नकारात्मक विचार करतो?
सामाजिक परिपक्वता कशी निर्माण करावी?
हजरजबाबीपणा नसल्यामुळे दुसऱ्यांसमोर कमजोर ठरतो का?
आपण शिस्त का पाळत नाही?
मी एका मुलीवर खूप प्रेम करतो, ती पण माझ्यावर खूप प्रेम करते, पण आमचं बोलणं दोन-तीन महिन्यांनी होतं. मग मला वाटतंय हे सगळं संपून टाकावं, कारण मला तिची सारखी आठवण येते?
दोन-तीन दिवसांपूर्वी एक जण मला खूप वाईट बोलला, त्या दिवसापासून माझ्या डोक्यात तेच चालू आहे की तो मला असं का बोलला?