2 उत्तरे
2 answers

मतलई वारे म्हणजे काय?

2
मतलई वारे – रात्री समुद्राच्या मानाने जमीन लवकर थंड होते आणि समुद्रातील पाणी मात्र उबदार असते. त्यामुळे सागरावर कमी वायुभार व जमिनीवर जास्त वायुभार असतो. परिणामी, जमिनीकडून पाण्याकडे वारे वाहतात. या वाऱ्यांना मतलई वारे असे म्हणतात. हे वारे थंड आणि कोरडे असतात व त्यांचा वेगदेखील मंद असतो.
याउलट खारे वारे असते. दिवसा सूर्याच्या उष्णतेमुळे जमीन लवकर तापते, त्या मानाने पाणी उशिरा तापते, त्यामुळे समुद्रालगतच्या जमिनीवर हवेचा दाब कमी असतो, तर समुद्रावर हवेचा दाब जास्त असतो. त्यामुळे दिवसा समुद्रावरून जमिनीकडे वारे वाहतात. त्यांना खारे वारे म्हणतात.
उत्तर लिहिले · 3/8/2017
कर्म · 210095
0

मतलई वारे म्हणजे जमिनीवरून समुद्राकडे वाहणारे थंड आणि कोरडे वारे.

हे वारे सहसा हिवाळ्यात दिवसा वाहतात, कारण:

  • जमीन समुद्रापेक्षा लवकर थंड होते.
  • त्यामुळे जमिनीवर उच्च दाब क्षेत्र तयार होते.
  • समुद्रावर कमी दाब क्षेत्र तयार होते.
  • वारा उच्च दाबाच्या क्षेत्राकडून कमी दाबाच्या क्षेत्राकडे वाहतो.
उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1820

Related Questions

सर्वात जास्त तिखट फळ कोणते आहे?
जगात सर्वात जास्त स्वच्छ व साफ पाणी कुठे आहे?
जगात सर्वात जास्त गोड पाणी कुठे आहे?
मला गाव नकाशा पाहिजे, ज्यात मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणे असावीत. तो कुठे मिळेल?
कर्नाटकची बॉर्डर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला लागून आहे?
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील. सर्वात मोठा जिल्हा कोणता?
कोणती नदी संपूर्ण देशातून वाहते?