शब्दाचा अर्थ माणुसकी

स्वाभिमानी म्हणजे काय?

3 उत्तरे
3 answers

स्वाभिमानी म्हणजे काय?

2
आपल्या स्वाभिमानाकडे सकारात्मकतेने पाहतो त्या वेळेस आपण स्वतः किती महत्त्वपूर्ण व्यक्ती आहोत याची सकारात्मक जाणीव होत असते आणि आपण आपला स्वाभिमान उंचावत जातो. जेव्हा आपण स्वतःकडे नकारात्मकतेने पाहतो त्या वेळेस आपण स्वतःला हीन, कमनशिबी मानू लागतो. आपला स्वाभिमानही कमकूवत होत जातो. आपल्या व्यक्तीमत्वात स्वाभिमान महत्त्वाची भूमिका बजावतो व त्याचा खरा आकार वयाच्या सुरवातीलाच घडत जातो. जीवनात घडत जाणा-या प्रत्येक सकारात्मक किंवा नकारात्मक परिस्थितीनुरुप स्वाभिमान बळकट किंवा कमकूवत बनत जातो.

उदाहरणार्थ, आपला स्वाभिमानाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर त्याचे मुल्यांकन ठरत असते.

भांड्यात पाणी जर अर्ध्या पातळीपर्यंत भरलेले असेल तर आपण दोन्हीप्रकारे विचार करु शकतो. भांड्यात फक्त अर्ध्या पातळीपर्यंतच पाणी आहे. हा नकारात्मक विचार ठरेल पण जर आपण असा विचार केला की भांड्यात अद्यापही अर्ध्या पातळीपर्यंत पाणी शिल्लक आहे तर हा आपला सकारात्मक विचार ठरतो.

आपला स्वाभिमान हा भाड्यातील पाण्याप्रमाणेच असतो. जीवनात घडणा-यागोष्टींमुळे त्याची पातळी कमी जास्त होत असते. आपल्याला महत्व देऊन एखादी व्यक्ती आपल्याशी संवाद साधत असेल किंवा आपल्या कामावर खूष होऊन दिलेल्या शाबासकीमुळे त्याची पातळी उंचावत असते. इतरांची स्वाभिमानाची पातळी वाढवण्याचे खूप मार्ग असतात. जसे मित्रांशी सलोख्याने पत्र व्यवहार ठेवणे. तसेच वेळोवेळी त्याची आठवण येत असल्याचे नमूद करणे यामुळे त्या व्यक्तीच्या स्वाभिमानाची पातळी उंचावत असते.

परंतु याच बरोबर आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की स्वाभिमान कमकुवत करण्याचेही अनेक मार्ग असतात. उदाहरणार्थ, लहान मुलांच्या भावना न समजता त्यांना फटकारणे (तुला काय हवे आहे आणि काय करायचे आहे याच्याशी माझे काही घेणे देणे नाही), त्यांना घालून पाडून बोलणे (किती मुर्ख विचार आहेत तुझे), त्याच्या क्षमतेवर प्रश्न चिन्ह उभे करणे (तू कोणतीही गोष्ट व्यवस्थित करु शकत नाहीस) अशा संवादामुळे स्वाभिमानाची पातळी खालावत जाऊन तो संपुष्टात येतो. या गोष्टी आपल्या बरोबरही घडण्याची शक्यता अधिक असते. कारण लोक बोलताना त्याचे परिणाम काय होणार आहेत याचा विचार करतच नाहीत.

जेव्हा एखाद्या व्यक्तीची पातळी पूर्णतः खालवते. त्यावेळेस तो इतरांपेक्षा वेगळा दिसत व वागत असतो. कोणत्याही गोष्टीचा स्विकार न करता बचावात्मकरित्या त्यांना टाळत असतो. आपला आयुष्यात उंचसखल असे अनेक खडतर मार्ग येत असतात. पण या जीवनात आपण जर इतराम्च्या स्वाभिमानाची पातळी उंचावत असू तर आपल्या स्वतःच्या पातळीवर काहीच परिणाम होत नाही पण आपण जर इतरांची पातळी खालावण्यात कार्यशील राहीलो तर आपली पातळी किंचित प्रमाणात खालावत असते.

ब-याच कारणामुळे लोक इतरांच्या स्वाभिमानाची कदर करत नाहीत व जीवनातील आनंद गमावून बसतात. ते कधीच आनंदी, समाधानी व इतरांना आनंद देणारे बनू शकत नाही. या अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्या आत खोलवर झाकून पाहिले. इतरांच्या भावनांची कदर करायला शिकले पाहिजे.

स्वाभिमान हा एका अर्थाने आपले स्वतःचे एक मतच असते
आपला स्वतःचा आत्मविश्वास, स्वतःचे मुल्यांकन आणि स्वतःची कदर यांची गोळाबेरीज म्हणजेच स्वाभिमान होय. आपल्या स्वाभिमानाचे स्वरुप आपल्या समजूतदारपणावर, स्विकार क्षमतेवर आधरित असते. स्वाभिमान बळकट असणा-या व्यक्तीचे व्यक्तीमत्व, त्याचे चांगले विचार, त्याच्या भावना वर्तनातून व्यक्त होत असतात.

आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनाने किंवा वागण्याने खालील बाबी लोकांसमोर प्रकट होत असतातव्यक्ती म्हणून आपले मुल्यांकन.आपले काम जे आपण करतो.आपण गाठलेली उद्दीष्टे.इतरांचे आपल्याबाबतीत कोणता दृष्टिकोन आहे. याबाबतीत आपले स्वतःचे मत.आपल्या आयुष्याचे ध्येय.जगातील आपले स्थान.यशासाठी आपली क्षमता.आपल्या जमेच्या व कमकूवत बाजू.आपली सामाजिक पातळी व आपले इतरांबरोबरचे संबंध.आपले स्वातंत्र्य व आपली स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता.स्वाभिमानात बळकटी असणे हे आपल्या आयुष्यासाठी फार महत्त्वाचे ठरते कारण आपले आयुष्य हे आव्हानांनी भरलेले असते.

स्वाभिमानाची पातळी खालावलेली असणे म्हणजे काय?
एका किंवा त्याहून अधिक व्यक्तीसमोर आपल्या स्वतःच्या नकारात्मक दृष्टिकोनाने स्वतःची प्रतिमा ढासळवणे म्हणजेच स्वाभिमानाची पातळी खालावणे. उदाहरणार्थ, आपण आपल्या आयुष्यात आव्हानात्मक असे कोणतेच काम केलेले नाही किंवा आपल्या आयुष्यात कोणतेही ध्येय नाही असा विचार केल्याने याचा परिणाम आपल्या स्वाभिमानाच्या पातळीवर होऊ लागतो. परिणामी जीवनात नैराश्य येत जाते. आपल्या आयुष्याकडे बगण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होत जातो. विश्वासहीनता व दुखीतावस्था सतत येत राहते. हळूहळू सर्वच गोष्टी अशक्य होऊन बसतात. कोणत्याही आव्हानाला सामोरे जाता येत नाही.

आपण जेव्हा व्यसन करत होतो तेव्हा आपण नेमके कोणत्या स्वरुपाचे व्यक्ती होतो?
एकदा एक तरुण व्यक्ती ध्यानसाधना शिकण्यासाठी एका साधुकडे गेला. त्या तरुण व्यक्तीचा स्वभाव उर्मट असा होता. जगातील सर्व गोष्टीचे त्याला ज्ञान आहे असे तो दर्शवत असे. त्याच काळात एकदा त्याने त्या साधुंना प्रश्न विचारला," गुरुजी ध्यानसाधना म्हणजे काय?" साधुंनी त्याचा स्वभाव जाणला होता. त्यांनी त्या तरुणाकडे शांतपणे पाहिले व कोणतेच उत्तर दिले नाही. तरुणाने पुन्हा तोच प्रश्न विचारला. त्यावर साधु म्हणाले,"आता आपल्या चहाची वेळ झाली आहे. आपण चहा घेऊ मग ध्यानसाधने विषयी चर्चा करुया. दोघेही चहा घेण्यासाठी गेले. साधुंनी चहा तयार केला. चहा कपात भरत असताना. तरुण साधुंकडे पाहत होता. साधु कप भरुन देखील चहा ओततच होते. तरुण म्हणाला, "गुरुजी कप भरला आहे." त्यावर साधुमहाराज म्हणाले,"बाळा या कपाप्रमाणेच तुझ्या मनात अनेक वेगवेगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत. त्यात तुझ्या स्वतःच्या संकल्पना आहेत, स्वतःचे तर्कवितर्क आहेत आणि स्वतःचे अनेक ठरवलेल्या गोष्टी आहेत. अशात मी तुला ध्यानसाधने विषयी काय शिकवू. हे शिकण्यासाठी आधी तुला स्वतःचे मन पूर्णतः रिकामे करावे लागेल.

या तरुण माणसाप्रमाणेच आपणही अशाचप्रकारच्या संकल्पनांनी, तर्कवितर्कांनी, विचारांनी आपले मन भरले आहे. ह्याच कारणामुळे आपल्यापासून बरेच लोक दुरावले आहेत. आपल्या स्वाभिमानाची पातळी अत्यंत खालावलेली होती. नातेसंबंधाच्या बाबतीत व यशस्वी होण्याच्या बाबतीत आपण आपली प्रतिमा फारच ढासळवली होती. आपण स्वतःच्या हाताने आपले मुल्य शून्य करुन घेतले होते.

फक्त स्वतःला केंद्रीत करणे
आपण फक्त आपल्या स्वतःच्या गरजांना, भावनांना व आवडी निवडीला प्राधान्य दिले. आपण इतरांचा कधी विचारच केला नाही.

अतिशय गंभिरावस्था
आपण फारच गंभीर आणि चिडक्या स्वभावाचे बनलो होतो. आपण दर वेळेस इतरांच्या वर्तनाचा नकारात्मक अर्थ व नकारात्मक तर्क लावत गेलो. या क्रिया आपण आपले वर्तन व चुका झाकण्यासाठी किंवा त्याचे समर्थन करण्यासाठी केल्या जात होत्या. जरी इतरांनी भरपुर मेहनत घेतलेली असली तरी आपण त्यात समाधानी होत नव्हतो. इतर कोणीही योग्य वर्तन करत नसल्यावर आपला ठाम विश्वास होता. इतरांना आपण समजण्यात चुका करत गेलो. आपल्या वर्तनामुळे आपण स्वतःला व इतरांना दुखीतावस्थेत ढकलत होतो. संकोची मनोवृत्ती
आपण संकोची मनोवृत्तीचे बनलो होतो व छोट्या अपयशाचेही भांडवल करुन अपर्याप्तता सिध्द करु पाहत होतो. त्यावेळेस आपणास आपल्या सकारात्मक क्षमतेविषयी जाण नव्हती. आपण कोणत्याही जबाबदा-या स्विकारण्यास तयार नव्हतो. आपण इतरांनी आपल्या जबाबदा-या पार पाडाव्या अशी अपेक्षा धरत होतो. तसे न केल्यास इतरांच्या कोणत्याही चुका ग्राह्य धरल्या जात होत्या. आपण अशात इतरांनाच अपयशाला कारणीभूत मानत होतो.

बळकट स्वाभिमान पातळी असणा-या व्यक्तीत कोणते गुणविशेष दिसतात?
आत्मविश्वासू
बळकट आत्मविश्वास असणा-या व्यक्तीस आपली क्षमता किती आहे हे ओळखता येते व तो व्यक्ती आपल्या मर्यादेतच स्वतःला सुरक्षित समजतो. समस्यांना हाताळण्यात त्याच्यात भरपुर आत्मविश्वास असल्याचे दिसून येते.

आत्मविश्वास हा माणसाला जयापराजयात विजयी पाठिंबा देत असतो. संकटे माणसाला यशासाठी नवे धडे शिकवत असतात. पण यशस्वी झाल्यानंतर त्याचे रुपांतर अतिआत्मविश्वासात होणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

सतत ध्येयवादी असणे
स्वाभिमान बळकट असलेला माणूस व्यवस्थित व शक्य असे ध्येय स्वतःसमोर ठेवत असतो. जेव्हा तो जेव्हा आपले तन मन ध्येयासाठी एकाग्रतेने लावण्यास सुरवात करतो तेव्हा ते ध्येय गाठण्यासाठी कोणतीही किंम्मत मोजण्यास सदैव तयार असतो. अपार मेहनतीची तयारी त्याने केलेली असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा स्वाभिमान सकारात्मक असतो तेव्हा मेहनत ही कधीच अडथळा ठरत नाही. तसेच तो व्यक्ती अपयशाची जबाबदारी सर्वस्वाने घेण्यास तयार असतो.

उत्तम प्रशंसक
बळकट स्वाभिमान असणा-या व्यक्तीच्या भावना स्वच्छ व सुंदर असतात. ती व्यक्ती इतरांना व्यवस्थित समजून घेते. तो स्वतःविषयी ज्याप्रमाणे चांगला विचार करतो त्याचप्रमाणे इतरांच्याबाबतीतही चांगलाच विचार करत असतो. हाच स्वभाव अर्थपूर्ण नातेसंबंध बनवण्यासाठी व टिकवण्यासाठी फायदेशीर ठरतो.

महाभारतातली खालीलनमूद गोष्ट संबंधित विषय समजण्यास मदत करते
श्रीकृष्णाने युधिष्ठिर व दुर्योधनाला बोलावले होते. ते येताच त्याने युधिष्ठिरास जगाला प्रदक्षिणा घालून एक दुर्बळ व वाईट अवस्थेत असलेला व्यक्ती घेऊन ये व त्याच वेळेस दुर्योधनालाही चांगल्या व प्रतिष्ठित व्यक्तीला घेऊन येण्यास सांगितले.

काही दिवसांनी ते दोघेही परतले युधिष्ठिर म्हणाला श्रीकृष्णा किती छान धरती बनवली आहेस तू या जगात कोणीही दुःखी असलेले मला दिसले नाही.

काही वेळाने दुर्योधन श्रीकृष्णाकडे येत म्हणला, "या जगाचा सर्वनाश होत आला आहे. प्रत्येक व्यक्ती खूपच दुष्ट व कठोर हृदयाची बनलेली आहे. मला या संपूर्ण विश्वात एकही चांगला व्यक्ती अढळला नाही.

हे जग हे आपले प्रतिबिंबच असते. आपल्या मनात ज्याप्रमाणे भावना तयार होतात त्याचप्रमाणे जग आपल्याला दिसत असते. म्हणूनच आपले मन युदिष्ठिराप्रमाणेच सुंदर व मृदु ठेवावे. दुर्योधनाप्रमाणे रागिट व द्वेष करत राहण्याने जगही आपला द्वेषच करत राहते.

संतुष्ट राहणे
स्वाभिमानी व्यक्ती आपल्या मर्यादांचा व कमकूवततेचा स्विकार करत असते. त्याच बरोबर आपल्या क्षमतांचीही त्याला जाण असते. स्वतःमधील त्रुटींचा स्विकार करुन त्यावर मात करण्याचा प्रयत्न करत असतो. थोडक्यात म्हणजे तो आपल्या स्वतःकडे नसलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत न करता स्वतः त्यागोष्टी कशा आत्मसात करु शकतो यावर भर देत असतो.

स्वतःच्या स्वाभिमानाला बळकटी आणणे आता शक्य आहे का?
जर आपला स्वाभिमान कमकुवत होत चालला असेल तर त्याला बळकटी आणणे गरजेचे आहे पण ही एक प्रक्रिया असून एखाद दुस-या प्रयत्नांनी काही साध्य होत नाही. तो स्वाभिमान टिकवणेही तितकेच महत्वाचे असते. यासाठी आपल्यात संयम आणि अफाट मेहनतीची तयारी असावी लागते. तसेच प्रयत्न हेच आपल्या स्वाभिमानाचे मुल्य निश्चित करणार असतात.

टिना पॅसेफिक सागरातील एका बेटावर राहत होती तिच्या स्वाभिमानाची पातळी अत्यंत खालावलेली होती. तिच्या वडलांचीदेखील तिच अवस्था होती. तिचे वडील नेहमी तिला घालून पाडून बोलत असत. "तू फार वाईट आहेस. तुला जेवण बनवता येत नाही. तुला आपली घर गृहस्थी सांभाळता येतच नाही. त्यामुळे तुझ्याशी कोणीही लग्न करणार नाही.

त्याच गावामधे एक प्रथा प्रचलित होती. लग्नाच्या वेळेस नवरदेवाकडून नवरीच्या वडलांना एक गाय द्यावी लागत असे. मुलींच्या उपलब्धीनुसार गायींची संख्या बदलत असे.

तिचे वडील तिला वारंवार हिणवत असत की,"तुझ्याबदल्यात कोणी एक गायही देणार नाही. उलट मलाच लग्न करणा-याला दोन गायी द्याव्या लागतील." टिना खूपच दुःखी झाली होती. ती ईतकी समाजाला घाबरु लागली की स्वतःच्या सावलीकडे पाहूनही ती दचकत असे.

त्याच बेटापासून काही अंतरावर असलेल्या दुस-या बेटावर जॉनी नावाचा एक तरुण राहत होता. तो खूपच स्वाभिमानी होता. टिना बरोबर लग्न करण्याची त्याची ईच्छा होती. तो ताबडतोब तिच्या वडलांकडे गेला व लग्नासाठी टिनाचा हात मागितला. टिनाच्या वडलांनी जॉनीच्या परिस्थितीकडे पाहता पाच गायींची मागणी केली. गावकरी हसायला लागले. त्यावर जॉनी म्हणाला मी तिच्यासाठी अकरा गायी द्यायला तयार होतो. मी उद्या तुम्हाला भेटतो.

टिनाचे वडील घरी येत असताना विचार करत होते आपण उगाच पाच गायींची मागणी केली. तसे केले नसते तर तो थट्टामस्करीत निघून गेला नसता. घरी आल्यावर पुन्हा त्यांनी टिनावर राग काढला.

दुस-या दिवशी जॉन आपला शब्द पाळत अकरा गायी घेऊन आला. लग्न झाल्यानंतर टिना सासरी निघून गेली. जवळ जवळ वर्षभरानंतर ती जेव्हा परत आली तेव्हा तिचा स्वाभिमान खूपच उंचावला होता. तिला कोणीच ओळखत नव्हते ईतका बदल तिच्यात झालेला होता. ती सर्वांशी बोलली. सगळे तिच्याकडे पाहतच राहीले.

टिनाच्या वडलांनी तिला पाहिले व मनातल्या मनात म्हणले,"जर माहित असते की माझी मुलगी ईतकी गुणवान आहे मी आणखी दोन गायी मागितल्या असत्या.

खरतर टिना स्वाभिमानाचे रिकामे भांडे घेऊन गेली होती. त्यावेळेस तिला तिची किम्मत माहिती नव्हती. पण हळुहळू तिला तिची किम्मत कळायला लागली होती. ती आता परतली तेव्हा तिचा आत्मविश्वास शंभरपटीने दुणावला होता. स्वाभिमान आपल्या जीवनात आनंद, आत्मविश्वास व तेज भरत असतो. त्याच प्रमाणे खालावलेल्या स्वाभिमानामुळे आपले जीवन नैराश्याकडे झोकले जाते.

आपण आपल्या स्वाभिमानाची पातळी कशा प्रकारे उंचावू शकतो?
आपल्या स्वतःमधे झाकून स्वतःला ओळखून स्वतःची किंम्मत ओळखणे म्हणजेच आपल्या स्वाभिमानाची पातळी वाढवणे होय. इतर लोक आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतात हे यात महत्वाचे ठरत नाही. खालील नमूद केल्या गोष्टींचे पालन करुन आपण आपल्या स्वाभिमानाची पातळी वाढवू शकतोस्वतःवर विश्वास ठेवणेजुन्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत इतरांना माफ करणे महत्वाचे ठरते.कोणतीही अट न ठेवता स्वतःचा स्विकार करावा व स्वतःवर प्रेम करावे.योजनाबद्धरित्या आपल्या जीवनात ध्येय निश्चित करावे.आपण आपले ध्येय गाठत आहोत किंवा यशस्वी झालेलो आहोत याची कल्पना करावी. त्यादिशेने क्रियाशील ही रहावे.सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने व पृष्टिकरणाने स्वतःवर विश्वास ठेवण्यास मदत होते.

« Start  Prev  1  2  3  Next  End »


उत्तर लिहिले · 19/7/2017
कर्म · 4405
1
आत्मभिमान म्हणजे स्वाभिमान होय. जसे की आपण काहीही झालं तरी चिनी वस्तू वापरणार नाहीच, हा झाला स्वाभिमान.
उत्तर लिहिले · 19/7/2017
कर्म · 1485
0

स्वाभिमानी म्हणजे स्वतःच्या अस्मितेचा, आत्मसन्मानाचा आदर करणारा.

स्वाभिमानी व्यक्तीची काही वैशिष्ट्ये:

  • आत्मविश्वास: स्वतःच्या क्षमतांवर विश्वास असतो.
  • आत्मनिर्भरता: स्वतःची कामे स्वतःच करण्याची वृत्ती असते.
  • सत्यनिष्ठा: नेहमी सत्य बोलणे आणि त्याचे पालन करणे.
  • स्वातंत्र्य: आपले विचार आणि निर्णय स्वतंत्रपणे घेण्याची क्षमता.
  • नम्रता: इतरांचा आदर करणे आणि त्यांच्याशी आदराने वागणे.

उदाहरण: एखाद्या स्वाभिमानी व्यक्तीला जर कोणी अपमानित केले, तर तो गप्प बसणार नाही, तर त्याSituएशनला योग्य प्रकारे Handle करेल.

अधिक माहितीसाठी: तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून अधिक माहिती मिळवू शकता:

मला आशा आहे की हे उत्तर तुम्हाला मदत करेल.

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 860

Related Questions

माणुसकी हरवत चाललेला समाज यावर मराठी भाषण?
आपल्यामध्ये माणुसकी असणे म्हणजे नक्की काय असणे?
माणुसकी दाखवणाऱ्या लोकांना नेहमी त्रास का होतो?
पैसा महत्त्वाचा की माणुसकी?
जगात जो श्रीमंत आहे त्याला लोक जास्त ओळखतात आणि गरिबाला कमी, असे का? श्रीमंत तर कुणाला पैसे वाटत नाही, माणुसकी पण नसते, तरी लोक त्यांना अधिक ओळखतात. गरिबाला जास्त माणुसकी असते, तरी त्याला कोणी विचारत नाही, असे का?
माझ्या गावात समाज मंदिर आहे. ते समाज मंदिर बौद्ध धर्माचे आहे. मी कोणाचे मन दुखवत नाही. त्या समाज मंदिराचा इतर लोक पण उपयोग करतात. ते लोक म्हणतात उपयोग करायचा नाही. इथेच आपली माणुसकी धर्म मागे आहे. आपला देश पुढे कसा येईल? आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेदभाव करायला सांगितले नाही?
तुमच्या मते माणुसकी म्हणजे काय? तुम्हाला त्याचा अनुभव आला आहे काय?