अन्न रसायनशास्त्र विज्ञान

बेकिंग सोडा म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

बेकिंग सोडा म्हणजे काय?

3
सोडियम बाय कार्बोनेट अथवा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट असे याचे इंग्रजी रासायनिक नाव आहे. हे एक लवण म्हणजे एक प्रकारचे मीठ आहे. यास मराठीमध्ये खाण्याचासोडा असेही म्हणतात. तसेच यास बेकिंग सोडा,सोडा बायकार्ब किंवा बाय कार्ब असेही म्हंटले जाते. खाण्याचा सोडा अल्कली गुणधर्माचा असतो. याचे रासायनिक सुत्र NaHCO3 असे आहे. हे पांढऱ्या भुकटीच्या स्वरुपात अथवा पांढऱ्या स्फटिक स्वरुपात पण आढळते.
   हा ढोकळयासारख्याअन्नपदार्थात वापरला जातो. ढोकळ्याला जाळी पडते कारण त्या छिद्रातून कार्बन डाय ऑक्साईड वायू निघून गेलेला असतो. यामुळेढोकळाफुगतो आणि हलका होतो. वायू सुटा होण्याची क्रिया तळताना घडल्याने पदार्थ खुसखुशीत होतात.
उत्तर लिहिले · 16/7/2017
कर्म · 210095
0

बेकिंग सोडा: बेकिंग सोडाला सोडियम बायकार्बोनेट (Sodium Bicarbonate) असेही म्हणतात. हा एक रासायनिक पदार्थ आहे जो अनेक घरांमध्ये वापरला जातो.

रासायनिक सूत्र: NaHCO₃

उपयोग:

  • पाककला: बेकिंगमध्ये खमीर म्हणून वापरतात, ज्यामुळे पदार्थ हलके आणि स्पंजसारखे बनतात.
  • स्वच्छता: घरात स्वच्छता करण्यासाठी एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे.
  • औषध: काही औषधांमध्ये अँटासिड (antacid) म्हणून वापरतात, ज्यामुळे ऍसिडिटी कमी होते.

इतर उपयोग:

  • आग विझवण्यासाठी (fire extinguisher)
  • दातांसाठी टूथपेस्ट म्हणून

बेकिंग सोडा एक बहुउपयोगी आणि सुरक्षित पदार्थ आहे.

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 5220

Related Questions

खेळ सिद्धांताच्या आधारे संतुलन समस्येचे स्पष्टीकरण स्पष्ट करा?
Khalil ohghatakta purn kara Indhane?
ध्वनीचे प्रकार कोणते आहेत?
ग्रहणाचे प्रकार लिहा?
सिमेंटमधील घटक कोणते?
चुंबकीय बलरेषांचे चार गुणधर्म लिहा?
अश्राव्य ध्वनी आणि श्राव्य ध्वनी यांच्यातील फरक स्पष्ट करा?