2 उत्तरे
2 answers

लेखापाल म्हणजे काय?

2
प्रत्येक व्यक्ती, संस्था, व्यावसायिक यांना स्वत:च्या आर्थिक व्यवहारांचा चोख हिशेब ठेवणे आवश्यक असते. त्यांच्या आर्थिक आरोग्यासाठी हे गरजेचं असतं. यासाठीच सनदी लेखापालाची म्हणजे अकाउंटंटची गरज भासते.

सनदी लेखापालाची कार्ये -
१) पैशाचा जमा-खर्च, पावत्या, बिलं, यांचं निरीक्षण करतो.
२) योग्य त्या पैशांच्या व्यवहाराची नोंद केली जाते किंवा नाही, यावर लक्ष ठेवतो.
३) संस्था आपले कर, परवाने किंवा परवाने याविषयी भरावे लागणारे पैसे योग्य वेळी भरले जातात किंवा नाही, याची काळजी घेतो.
४) वार्षिक आर्थिक व्यवहाराचा आराखडा तयार करून तो योग्य त्या अधिका-यास त्याच्या माहितीसाठी सादर करतो.
५) अंतिम आर्थिक परिपत्रक तयार करून त्यात जमा व खर्च याविषयी नोंदी करतो.
६) याद्या, रोकड रक्कम, मूळ कागदपत्र यांचे ताळेबंद तपासून पाहून त्याविषयीचा अहवाल योग्य त्या अधिका-याला सादर करतो.
७) दिलेल्या सूचना पाळल्या जातात की, नाही घेतलेल्या आक्षेपांचे निराकरण केले आहे किंवा नाही हे तो पाहतो.
उत्तर लिहिले · 31/5/2017
कर्म · 15545
0

लेखापाल (Accountant):

लेखापाल हा एक व्यावसायिक असतो जो संस्थेच्या आर्थिक नोंदी ठेवतो.

ते वित्तीय विवरणपत्रे तयार करतात, कर भरतात आणि संस्थेला आर्थिक बाबींमध्ये सल्ला देतात.

लेखापालाची कार्ये:

  • आर्थिक नोंदी ठेवणे
  • वित्तीय विवरणपत्रे तयार करणे (balance sheets, income statements, and cash flow statements).
  • करांची गणना आणि भरणा करणे
  • आर्थिक नियोजन आणि विश्लेषण करणे
  • आर्थिक सल्ला देणे
  • लेखा परीक्षण (auditing) करणे

लेखापालाचे प्रकार:

  • सनदी लेखापाल (Chartered Accountant - CA)
  • व्यवस्थापन लेखापाल (Management Accountant)
  • सरकारी लेखापाल (Government Accountant)

अधिक माहितीसाठी:

  1. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI)
  2. लेखापाल व्यवसायाची माहिती (Investopedia)
उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 5220

Related Questions

कृषी कर्जाचे विविध स्रोत कोणते आहेत? कृषी कर्ज व्यवस्थेतील समस्या व उपाय सांगा.
टिपा लिहा निर्बंध मुक्त बाजार?
टिपा लिहा मागणी पुरवठ्यास स्वतंत्र?
टिपा लिहा आनंत लवचिक मागणी?
बाजार यंत्रणेचे अपयश म्हणजे काय ते सांगून अपयशाची कारणे स्पष्ट करा?
अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
मक्तेदारीची व्याख्या सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा?