सौंदर्य केस घरगुती उपाय केसांची काळजी

माझे केस खूप गळतात आणि खूप पातळ झाले आहेत, तर केस दाट होण्यासाठी काही उपाय आहे का?

3 उत्तरे
3 answers

माझे केस खूप गळतात आणि खूप पातळ झाले आहेत, तर केस दाट होण्यासाठी काही उपाय आहे का?

16
केस गळणे समस्या / उपाय
===================
नवीन केस येण्यासाठी उपाय काय?केस का गळतात?केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय सांगा !केस जाड होण्यासाठी काय करावे ?केस पांढरे आहे ,उपाय काय ? केसातील कोंडा उपाय? केस वाढवण्यासाठी काय करावे ?केस वाढीसाठी उपाय?
असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात

बदलती लाइफ स्लाइल आणि खाणे-पिणे हे अनेक समस्यांचे कारण आहे. जेव

णात मसाल्याच्या पदार्थांचा जास्त उपयोग, अशुध्द तेल, भेसळयुक्त खाद्य पदार्थ आणि प्रदूषणामुळे आरोग्यासबंधीत अनेक समस्या निर्माण होत आहेत.

Loading...
या कारणामुळे आपल्याला केसांसंबधीत समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे डेंड्रफ, हेयर फॉल, दोन तोंडी केस या समस्या उद्भवत आहे.

Loading...
हीच समस्या दूर करण्यासाठी काही हर्बल उपाय सांगत आहोत, ज्याचा वापर केल्याने तुमच्या केसांच्या समस्या दूर होतील…

*लिंब
अवेळी पांढ-या होणा-या आणि केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी पातालकोटचे अदिवासी लिंबाचा वापर करतात.

ते लिंबाच्या बीयांपासुन तेल तयारा करतात, ते तेल रात्री डोक्याला लावुन सकाळी डोके धुतात.

एक महिना नियमित लिंबाच्या तेलाचा वापर केल्याने केस गळीत थांबते. डँड्रफ झाल्यावर 100 मिली खोब-याच्या तेलात 20 ग्राम लिंबाच्या बियांचे चुर्ण चांगल्या प्रकारे मिसळा.

या तेलाने आठवड्यातुन दोन दिवस केसांची मसाज केल्याने कोंडा कमी होतो.

*अमरवेल
अमरवेलाचा रस काढा आणि एक आठवडा हे केसांना नियमित लावा. डँड्रफ नष्ट होईल आणि केस गळती थांबेल.

मानले जाते की, आंब्याच्या झाडावरील अमरवेल पाण्यात उकळुन त्या पाण्याने स्नान केल्याने टकलेपणाची समस्या दूर होते.

*जास्वंद
जास्वंदाच्या फुलांना बारीक करा आणि अंघोळीच्या 10 मिनिट अगोदर हे डोक्यांच्या त्वचेवर घासा. हे केसांना काळे करण्यास मदत करते. सोबतच कंडीशनरचे काम करते.

*शेवगा किंवा मुळा
याच्या पानांना कुस्करुन याचा रस तयार करा. हा रस अंघोळी अगोदर केसांवर लावा. हे केसांतुन कोंड्याची समस्या नष्ट करते. या रसाचा वापर कमीत कमी एक आठवडा करावा.

शेवग्याच्या शेंगांना उकळुन पल्प तयार करा. डोके धुताना या पल्पचा वापर शाम्पू प्रमाणे करा.

हे बाजारातील एखाद्या व्हिटॅमिन र्ई युक्त शाम्पूपेक्षा चांगले आहे.

*जटामासी
जटामासीच्या मुळांना खोब-याच्या तेलात उकळुन घ्या. थंड झाल्यानंतर हे बॉटलमध्ये भरुन ठेवा.

रोज झोपण्याअगोदर या तेलाने मालिश करा. अवेळी पांढ-या होणा-या केसांची समस्या दूर होईल.



*कन्हेर
कन्हेराची पाने दुधात कुस्करून केसांना लावल्याने केस गळती थांबते. सोबतच अवेळी पांढ-या होणा-या केसांची समस्या दूर होते.

*प्राजक्त
प्राजक्ताची पाणे आणि बीजांचे चूर्ण तेलात मिळवुन रोज रात्री झोपताना मालिश करा. केस दाट होतील.

*तिळ
तिळाच्या तेलाने केसांची मालिश करणे चांगले असते. तिळाच्या तेलात थोड्या प्रमाणात गायीचे तुप आणि अमरवेलचे चूर्ण मिळवा. रात्री झोपण्याअगोदर हे तेल लावा. नियमित असे केल्याने केस चमकदार आणि सुंदर होतील.

*बहेडा
याच्या बीजांच्या चूर्णला खोब-याच्या किंवा जैतुनच्या तेलात मिळवुन कोमट करा आणि केसांची मसाज करा. असे केल्याने केस चमकदार होतात. सोबतच केसांची मुळे मजबूत होतात. अदिवासी जानकारांच्या मते केसांच्या समस्येसाठी त्रिफळाचे सेवन हितकारक मानले आहे.

*मेथी
मेथीच्या भाजीचे सेवन निरोगी केसांसाठी फायदेशीर मानले जाते. मेथीच्या बीयांचे चुर्ण तयार करुन पाण्यासोबत मिळवुन पेस्ट बनवा. ही पेस्ट अर्धा तास केसांवर लावुन ठेवा. हा उपाय केल्याने केसांमधील डँड्रफ नष्ट होतो. आठवड्यातुन कमीत कमी दोन दिवस असे करावे.

*टोमॅटो
पिकलेले टमाटे कुस्करुन केसांना लावल्याने कोंड्याची समस्या दूर होते. अंघोळीच्या 15 मिनिट अगोदर असे करणे फायदेशीर असते.

*झेंडू
झेंडूच्या फुलांना कुस्करुन खोब-याच्या तेलात मिळवा. डोक्यात झालेली कोणत्याही प्रकारचे सक्रमन, फोडं दूर करण्यासाठी ह मदत करते.

*ऐरंडी
ऐरंडीच्या बीयांच्या वापराने केस काळे होतात. आठवड्यातुन दोन वेळा हे केसांना लावल्याने फायदा होते.

कमी वयात केस गळणे हे सर्वांसाठी तनाव आणि चिंतेचे कारण असते. केस गळण्याची समस्या जर अनुवांशिक असेल तर त्याला एंड्रोजेनिक एलोसेसिया म्हटले जाते.

अशा वेळी केस गळण्याची समस्या ही किशोरावस्थेपासुनच असु शकते. तर महिलांमध्ये ही समस्या 30 वर्षांनंतर निर्माण होते.

याव्यतिरिक्त खाणे-पिणे, पर्यावरण प्रदुषण आणि औषधींच्या रिअॅक्शन किंवा अशा अनेक कारणांमुळे टक्कल पडण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

जर तुम्हालाही अशीच समस्या असेल तर ही समस्या दूर करण्याचे काही घरगुती उपाय आज सांगणार आहोत.
जटामांसीला खोब-याच्या तेलात उकळुन घ्या. हे तेल थंड करुन एखाद्या बॉटलमध्ये भरा. रोज रात्री झोपण्याअगोदर या तेलाने मालिश करा. केसांचे अवेळी गळणे आणि पांढरे होणे दूर होईल.

मीठाचे अधिक सेवन केल्यानेही टक्कलपणा येतो. मीठ आणि मीरे पावडर एक-एक चमचा आणि पाच चमचे खोब-याचे तेल मिक्स करा. हे टक्कल असलेल्या ठिकाणी लावा. असे केल्याने केस पुन्हा येतील.

कोमट ऑलिव्ह ऑइलमध्ये एक चमचा मध आणि एक चमचा दालचीनी पावडर टाकुन पेस्ट बनवा. अंघोळी अगोदर ही पेस्ट डोक्यावर लावा. 15 मिनिटांनंतर कोमट पाण्याने केस धुवून घ्या. काही दिवसांनंतर केस गळण्याची समस्या दूर होईल.
आवळ्याचे चुर्ण दह्यात मिळवा. ही पेस्ट हलक्या हातांनी केसांच्या मुळांना लावा. एका तासानंतर हे धुवून घ्या. आठवड्यातुन दोन वेळा नियमित असे केल्यास केस गळती कमी होईल.

दोन लीटर पाण्यात थोडा आवळा टाका आणि लिंबाचे पाने टाकुन पाणी उकळुन घ्या. आठवड्यातुन एक वेळा या पाण्याने केस धुवा. केस गळती थांबुन जाईल.

जर तुम्ही मादक पदार्थांचे सेवन किंवा धू्म्रपान करत असाल तर ते कमी करा. केस गळणे लवकर कमी होईल. जास्तित जास्त पाणी प्या. चहा-कॉफीचे सेवन कमी करा.

मोहरीच्या तेलात मेहेंदीची पाने टाकुन गरम करा. हे थंड करुन केसात लावा. नियमित हे लावल्याने केसांचे गळणे कमी होईल.
रात्री मेथीचे बीज पाण्यात भीजवा आणि हे सकाळी बारीक करुन केसांवर लावा. एका तासांनंतर केस धुवून घ्या. असे केल्याने काही दिवसात नवीन केस येतील.

खोब-याच्या तेलात कापूर मिळवा. केस धुन्याच्या एक तास अगोदर हे केसांना चांगल्या प्रकारे लावा. केस गळती थांबेल.

1 शिकाकाईच्या बीयांना पाण्यात टाकुन पेस्ट बनवा. ही पेस्ट रात्रभर तशीच राहु द्या. सकाळी ही पेस्ट केसांना लावा. अर्ध्या तासानंतर केस धुवून घ्या. हे नॅचरल शाम्पूचे काम करते. याचा वापर केल्याने केस गळण्याची समस्या दूर होते. सोबतच केस निरोगी आणि चमकदार होतात.

अमरवेलला बारीक करुन त्याचा रस काढा. हा रस तिळाच्या तेला टाकुन उकळुन घ्या. जोपर्यंत पुर्ण रस तेलात मिक्स होत नाही तोपर्यंत तेल उकळा. रोज रात्री झोपण्याअगोदर हे तेल केसांना लावा. यामुळे टक्करपणाची समस्या दूर होते आणि केस सिल्की होतात.

मेथीच्या भाजीचे जास्त सेवन केसांसाठी चांगले मानले जाते. मेथीचे दाने रात्री पाण्यात भीजवा. सकाळी याची पेस्ट बनवुन घ्या. ही पेस्ट केसांमध्ये लावा. अर्ध्या तासानंतर केस धुवून घ्या. आठवड्यातुन दोनवेळा असे केल्याने केस गळण्याची समस्या दूर होते.

झेंडूच्या फुलांना बारीक करुन त्याचा रस काढा. हा रस खोब-याच्या तेलात मिळवुन उकळुन घ्या. यानंतर हे तेल थंड करुन बॉटलमध्ये भरुन ठेवा. असे केल्याने केस गळण्याची समस्या दूर होईल.

ऑलिव्ह ऑइल थोडे गरम करा. या तेलात बहेडा चूर्ण टाका. हे मिश्रण केसांच्या मुळांना लावा. एक तासांनंतर केस धुवून घ्या. केस दाट होतील.

जास्वंदाच्या फुलांचा रस काढा. या रसाने केसांची मसाज करा. एका तासांनंतर केस धुवून घ्या. केस दाट, काळे आणि मजबूत होतील.
उत्तर लिहिले · 30/8/2018
कर्म · 569225
7
↙दाट केस असणे तुमच्यासाठीच चांगले आहे. चांगल्या केसांसाठी काही सूचना आपण पाहणार आहोत.
♺केस धुणेबऱ्याच पुरुषांचा विश्वास आहे की, केस धुतल्याने केस गळण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे ते आपले केस धूत नाहीत. मात्र त्याचा परिणाम म्हणजे जरी केस चांगले असले तरी तुमचे केस चिकट होतात आणि टाळूमध्ये अंतर दिसायला लागते. रोज शॉवरखाली केस धुवा मात्र गरम पाण्याचा चटका टाळूला लागणार नाही ना याची काळजीघ्या. नाहीतर तुमच्या टाळूची त्वचा कोरडी पडू शकते.केस उत्पादने वापरणेकेस दाट होणारे शॅम्पू, कंडिशनर्स आणि स्प्रेमध्ये  विशेष पॉलिमर असते. जे केसाची रुंदी वाढवून केस जाड बनवतात. हा प्रभाव तात्पुरता आहे. याचा रोज वापर केल्याने केस दाट व्हायला २० टक्के किंवा कधी कधी यापेक्षा जास्तच मदत होते.धुम्रपान करणे बंद कराअसंख्य संशोधकांनी सिद्ध केले आहे की, धुम्रपान केल्याने संप्रेरकांची पातळी वाढते. परिणामी यामुळे केस गळणे वाढते. टाळूला पोषण देणाऱ्या लहान रक्तवाहिन्यांमुळे केस वाढतात. धुम्रपानामुळे या रक्तवाहिन्यांमध्ये अडचण निर्माण होते. ज्यामुळे केसांची वाढ खुंटते.आपल्या केसांवर जोर लावू नकाओले केस कोरड्या केसांपेक्षा तिप्पटीने कमकुवत आहे. खूप केस विंचरण्याने किंवा टॉवेलचा वापर जोर लावून केल्याने केस तुटतात आणि त्यांची घनता कमी होते. नैसर्गिकरित्या केस कोरडे होऊ द्या किंवा ते हलक्या हाताने कोरडे करा. केसांचा पोत बदलण्यासाठी तुम्ही बोटांचा वापरही करू शकता. केसांच्या वाढ होऊन ते जाड होण्यासाठी सांगितलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करा.
0
केस गळणे आणि पातळ होणे ही एक सामान्य समस्या आहे. केस दाट होण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:

आहार:

  • प्रथिने (proteins): केस प्रामुख्याने केराटीन नावाच्या प्रथिनेपासून बनलेले असतात. आहारात पुरेसे प्रथिने घ्या. यासाठी तुम्ही अंडी, चिकन, मासे, डाळी आणि शेंगा खाऊ शकता.
  • लोह (iron): लोहाच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात. त्यामुळे आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा. पालेभाज्या, खजूर आणि मांस हे लोहाचे चांगले स्रोत आहेत.
  • व्हिटॅमिन (vitamins): व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ई केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत.

केसांची काळजी:

  • तेल लावा: नियमितपणे केसांना तेल लावल्याने ते मजबूत होतात. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तेल लावा आणि हलक्या हाताने मसाज करा.
  • शॅम्पू: सौम्य शॅम्पू वापरा आणि केस जास्त वेळा धुवू नका.
  • कंडिशनर: शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर वापरा.
  • केमिकल ट्रीटमेंट टाळा: केसांवर जास्त केमिकल ट्रीटमेंट करणे टाळा, जसे की स्ट्रेटनिंग, कलरिंग आणि पर्मिंग.
  • हेअर ड्रायरचा वापर टाळा: हेअर ड्रायर वापरणे शक्यतो टाळा.

घरगुती उपाय:

  • आवळा: आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे केसांसाठी खूप फायदेशीर आहे. आवळ्याचा रस केसांना लावा किंवा आवळ्याचे चूर्ण खा. संशोधन दर्शवते की आवळा केसांच्या वाढीस मदत करू शकतो.
  • मेथी: मेथीमध्ये प्रथिने आणि लोह भरपूर प्रमाणात असते. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्याची पेस्ट केसांना लावा.
  • कांद्याचा रस: कांद्याच्या रसामध्ये सल्फर असते, ज्यामुळे केसांची वाढ सुधारते. कांद्याचा रस केसांना लावा आणि 30 मिनिटांनंतर धुवा. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की कांद्याचा रस केस गळती कमी करण्यास मदत करतो.
  • कोरफड: कोरफड केसांसाठी खूप चांगली असते. कोरफडीचा गर केसांना लावा आणि 30 मिनिटांनंतर धुवा.

वैद्यकीय उपचार:

जर घरगुती उपायांने काही फरक नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते तुम्हाला योग्य उपचार देऊ शकतील.

टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी, आपली त्वचा संवेदनशील आहे का हे पाहण्यासाठीpatch test करा.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 1040

Related Questions

भाषा शिकण्यासाठी मानवी मेंदू किती मेगाबाइट माहिती साठवतो?
केस काळे राहण्यासाठी काय करावे?
हेल्मेट वापरल्याने केस गळतात का?
केसांच्या समस्येसाठी काही घरगुती उपाय आहेत का?
केस काळे कसे ठेवावे?
रात्री झोपताना केस बांधावे का?
केस वाढीसाठी उपाय काय आहे?